नवोदित अनुदिनीकारांसाठी यशाचा राजमार्ग
सक्षम प्रशिक्षण, प्रामाणिक प्रयत्न, सुयोग्य व्यवस्थापन, आणि एकात्मिक विपणन प्रणाली ही ब्लॉगिंगमधील यशाची चतुःसूत्री आहे. जर आपल्याला ब्लॉगिंग या क्षेत्रात यश संपादन करायचे असेल, तर आमची ब्लॉग कन्सल्टिंग सेवा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
आजमितीला ब्लॉगिंग या विषयावर मार्गदर्शन करणारे असंख्य लेख, ऑडिओ व व्हिडिओ आंतरजालावर उपलब्ध आहेत. परंतु सुरुवात कुठे करावी, आपल्यासाठी योग्य विषय, ब्लॉगिंग व्यासपीठ, व विपणन पर्याय कसे निवडावे, आणि ब्लॉगिंगला करिअरच्या दृष्टीने पाहत अर्थार्जन कसे करावे याबद्दल सुसंगत माहिती फारशी आढळत नाही.
चुकीची किंवा अर्धवट माहिती ग्रहण करणे आपले आर्थिक नुकसान देखील करू शकते. याखेरीज ब्लॉगिंग या क्षेत्राविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते जे योग्य नाही.
मी आतापर्यंत अनेक ब्लॉगर्सना यशस्वीरीत्या त्यांचा प्रथम ब्लॉग सुरु करण्यासाठी साहाय्य केले आहे. ज्यामध्ये योग्य विषयाची निवड, संशोधन, ब्रॅण्डिंग, ब्लॉग निर्मिती व तांत्रिक बाजू, साहित्य निर्मिती व प्रकाशन, विपणन, लीड जनरेशन, व ग्राहकसेवा या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.
जर आपल्याला ब्लॉगिंगमधील यशाची रहस्ये जाणून घेऊन लवकरात लवकर यश संपादन करायचे असेल तर खालील बटनावर क्लिक करून ब्लॉग कन्सल्टिंग साठी आपले नाव नक्की नोंदवा.
ब्लॉग कन्सल्टिंग कोणासाठी उपयुक्त ठरू शकेल?
- सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिक
- फ्रीलान्सर्स
- साईड इन्कमच्या शोधात असणारा नोकरदार वर्ग
- १८ वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी
- गृहीणी
- निवृत्त कर्मचारी
ब्लॉग कन्सल्टिंगमध्ये समाविष्ट मॉड्युल्स
- ब्लॉगिंग माईंडसेट तयार करणे.
- योग्य विषयाची निवड करण्यास मदत
- मार्केट रिसर्च करणे व साईट स्ट्रक्चर तयार करणे.
- प्रोफेशनल ब्लॉग निर्मिती व कस्टमाइझेशन
- उच्च दर्जाचे साहित्य प्रकाशित करणे
- वेबसाईट ट्रॅफिक जनरेशन
- अर्थार्जनाचे योग्य पर्याय निवडण्यास साहाय्य करणे
बोनस मॉड्युल्स
- एसईओ
- पिंटरेस्ट हॅकिंग
- ई-मेल मार्केटिंग
प्रीमियम मेंबर्स कम्युनिटीमध्ये एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस
ब्लॉग कन्सल्टिंग सेवा विकत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ३-महिने अनुदिनीकार प्रीमियम कम्युनिटीचा ॲक्सेस दिला जाईल.
अनुदिनीकार प्रीमियम कम्युनिटीची खास वैशिष्ट्ये:
- मंथली लाईव्ह सेशन्स
- ब्लॉगिंग अपडेट्स
- कस्टमाईझ्ड ब्लॉगिंग प्लॅनर्स आणि वर्कशीट्स
- सीक्रेट मार्केटिंग टूल्स व टेक्निक्स
- १-तास वैयक्तिक मार्गदर्शन
वापरकर्त्यांचे अनुभव जाणून घ्या.
आम्ही शिफारस केलेली ब्लॉगिंग साधने
ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी आपण निरनिराळ्या साधनांचा व सेवांचा वापर करतो. मागील ६+ वर्षे ब्लॉगिंग करताना आम्हांला उपयुक्त वाटणारी काही ब्लॉगिंग साधने खाली नमूद केली आहेत.
ब्लॉगिंग मध्ये यशस्वी व्हायचे आहे, तर आजच ब्लॉग कन्सल्टिंगसाठी आपली नोंदणी करा.