अनुदिनीकार गोपनीयता धोरण (Privacy Policy)

तुम्ही आमच्या सेवा वापरता तेव्हा, तुमच्या माहितीविषयी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता. आम्हाला समजते की ही एक मोठी जबाबदारी आहे आणि तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी कठोर परिश्रम करतो आणि नियंत्रण तुमच्याकडे ठेवतो.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो, आम्ही ती का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती कशी अपडेट, व्यवस्थापित, निर्यात करू आणि हटवू शकता हे तुम्हाला समजण्यात मदत होण्यासाठी हे गोपनीयता धोरण आहे.

अनुदिनीकार गोपनीयता धोरणाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता.

अनुदिनीकार गोळा करत असलेली माहिती

तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना आम्ही कोणती माहिती गोळा करतो हे आम्हाला तुम्हाला समजवायचे आहे.

आमच्या सर्व वापरकर्त्यांना चांगल्या सेवा प्रदान करण्‍यासाठी आम्‍ही माहिती गोळा करतो जसे की तुम्ही कोणती भाषा बोलता यासारख्या साधारण आशयापासून ते अधिक जटिल गोष्‍टी जसे की तुम्हाला कोणत्या जाहिराती सर्वाधिक उपयुक्त वाटतात, तुमच्यासाठी ऑनलाइन सर्वाधिक महत्त्वाचे असणारे लोक किंवा कोणते लेख व साहित्य तुम्हाला आवडू शकतात.

अनुदिनीकार गोळा करत असलेली माहिती आणि ती माहिती कशी वापरली जाते हे तुम्ही आमच्या सेवा कशा वापरता आणि तुम्ही तुमची गोपनीयता नियंत्रणे कशी व्यवस्थापित करता यावर आधारित आहे.

तुम्ही अनुदिनीकार मध्ये साइन इन केलेले नसताना, आम्ही ब्राउझरशी संबंधित युनिक आयडेंटिफायर, ॲप्लिकेशन किंवा तुम्ही वापरत असलेले डिव्हाइस सह माहिती स्टोअर करतो. सर्व ब्राउझिंग सेशनमध्ये तुमची भाषा प्राधान्ये टिकवण्यासाठी हे आम्हाला मदत करते.

तुम्ही साइन इन केलेले असताना, आम्ही तुमच्या अनुदिनीकार खात्यासह स्टोअर केलेली माहिती देखील गोळा करतो, ज्याला आम्ही वैयक्तिक माहिती म्हणून हाताळतो.

तुम्ही तयार करता किंवा आम्हाला प्रदान करता अशा गोष्टी

तुम्ही आम्हाला वैयक्तिक माहिती प्रदान करता ज्यामध्ये तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस, पासवर्डचा समावेश आहे. याखेरीज फोन नंबर, पत्ता, किंवा पेमेंट माहिती देखील वैयक्तिक माहितीमध्ये समावेश होतो.

आमच्या सेवा वापरत असताना तुम्ही तयार, अपलोड किंवा इतरांकडून प्राप्त केलेला आशय देखील आम्ही गोळा करतो. यामध्ये ईमेल, तुम्ही अपलोड केलेले लेख, फोटो, व्हिडिओ, आणि तुम्ही केलेल्या टिप्पण्यांचा समावेश आहे.

तुम्ही आमच्या सेवा वापरत असताना आम्ही गोळा करत असलेली माहिती

तुमचे ॲप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस

तुम्ही अनुदिनीकार सेवा ॲक्सेस करण्यासाठी वापरत असलेली ॲप्स, ब्राउझर आणि डिव्हाइस विषयी आम्ही माहिती गोळा करतो जी आपल्याला नवनवीन व उपयुक्त वैशिष्ट्ये देण्यासाठी आम्हाला मदत करते.

आम्ही गोळा करत असलेल्या माहितीमध्ये युनिक आयडेंटिफायर, ब्राउझरचा प्रकार आणि सेटिंग्ज, डिव्हाइसचा प्रकार आणि सेटिंग्ज, ऑपरेटिंग सिस्टिम, वाहकाचे नाव आणि फोन नंबर आणि ॲप्लिकेशन आवृत्ती नंबरसह मोबाईल नेटवर्क माहितीचा समावेश आहे. आम्ही तुमची ॲप्स, ब्राउझर आणि आमच्या सेवांसह डिव्हाइसच्या सुसंवादाविषयीची माहिती देखील गोळा करतो ज्यामध्ये आयपी ॲड्रेस, क्रॅश अहवाल, सिस्टिम ॲक्टिव्हिटी आणि तारीख, वेळ आणि तुमच्या विनंतीच्या रेफरल URL चा समावेश आहे.

तुमची ॲक्टिव्हिटी

तुमच्या ॲक्टिव्हिटी विषयीची माहिती आम्ही गोळा करतो, ज्यामुळे आपल्याला आवडणाऱ्या साहित्याची शिफारस करणे आम्हाला शक्य होते. आम्ही गोळा करत असलेल्या ॲक्टिव्हिटी माहितीमध्ये याचा समावेश आहे:

  • तुम्ही शोधत असलेल्या संज्ञा
  • तुम्ही पाहत असलेले व्हिडिओ
  • आशय आणि जाहिरातींसह व्ह्यू आणि सुसंवादीपणा
  • तुम्ही ऑडिओ वैशिष्ट्ये वापरत असताना व्हॉइस आणि ऑडिओ माहिती
  • खरेदी ॲक्टिव्हिटी
  • तुम्ही संप्रेषण करत असलेले किंवा आशय शेअर करत असलेले लोक
  • तृतीय पक्षीय साइटवरील ॲक्टिव्हिटी आणि आमच्या सेवा संलग्न असलेली ॲप्स
  • तुमचा बाउझिंग इतिहास

तुम्ही कॉल करण्यास आणि प्राप्त करण्यास आणि संदेश पाठवण्यास आणि प्राप्त करण्यास आमच्या सेवा वापरल्यास, फोन नंबर, कॉल केलेल्या-पक्षाचा नंबर, प्राप्त करणार्या पक्षाचा नंबर, फॉरवर्डिंग नंबर, कॉल आणि संदेश करण्याची वेळ आणि तारीख, कॉलचा कालावधी, मार्ग माहिती आणि कॉलचे प्रकार यासारखी टेलिफोनी लॉग माहिती आम्ही गोळा करू शकतो.

तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी माहिती शोधण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या अनुदिनीकार खात्याला भेट देऊ शकता.

तुमची स्थान माहिती

तुम्ही आमच्या सेवा वापरल्यावर आम्ही तुमच्या स्थानाविषयी माहिती गोळा करतो, यानुसार अचूकतेच्या विविध प्रमाणांत तुमचे स्थान निर्धारित केले जाऊ शकते:

  • GPS
  • IP पत्ता
  • तुमच्या डिव्हाइसमधील सेन्सर डेटा
  • तुमच्या डिव्हाइसच्या जवळपासच्या गोष्टींविषयीची माहिती, जसे की वाय फाय ॲक्सेस पॉइंट, सेल टॉवर आणि ब्लूटूथ सुरू केलेली डिव्हाइस

आम्ही गोळा करत असलेल्या स्थान डेटांचे प्रकार तुमच्या डिव्हाइस आणि खाते सेटिंग्जवर अंशतः अवलंबून असतात. उदाहरणार्थ, डिव्हाइसचे सेटिंग्ज ॲप वापरून तुम्ही तुमच्या अँड्रॉईड डिव्हाइसचे स्थान सुरू किंवा बंद करू शकता. तुम्ही तुमच्या साइन इन केलेल्या डिव्हाइससह कुठे जाता याचा तुम्हाला खाजगी नकाशा तयार करायचा असल्यास स्थान इतिहास देखील सुरू करू शकता.


काही परिस्थितींमध्ये, अनुदिनीकार सार्वजनिकरित्या ॲक्सेसिबल स्रोत मधून तुमच्याविषयीची माहिती गोळा करते. आम्ही विश्वसनीय भागीदारांकडून तुमच्याविषयीची माहिती गोळा करू शकतो, ज्यामध्ये आमच्या व्यवसाय सेवेच्या संभाव्य ग्राहकांविषयीची माहिती आम्हाला देणारे विपणन भागीदार आणि गैरवापरापासून संरक्षण करण्याची माहिती आम्हाला देणार्या सुरक्षा भागीदारांरांचा समावेश आहे. त्यांच्या वतीने जाहिरात आणि संशोधन सेवा पुरवणार्या जाहिरातदार कडून देखील आम्ही माहिती मिळवतो.

माहिती गोळा करण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी आम्ही विविध तंत्रज्ञान वापरतो, ज्यामध्ये कुकी, पिक्सेल टॅग, स्थानिक स्टोरेज यांचा समावेश आहे जसे की ब्राउझर वेब स्टोरेज किंवा ॲप्लिकेशन डेटा कॅशे, डेटाबेस आणि सर्व्हर लॉग इत्यादींचा समावेश होतो.

अनुदिनीकार डेटा का गोळा करतो

आम्ही अधिक चांगल्या सेवा तयार करण्यासाठी डेटा वापरतो.

आम्ही खालील कारणांसाठी आमच्या सर्व सेवांमधून गोळा करतो ती माहिती वापरतो:

आमच्या सेवा प्रदान करणे

आमच्या सेवा वितरित करण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरतो, जसे की परिणाम कळवण्यासाठी तुम्ही शोधत असलेल्यया संज्ञांवर प्रक्रिया करणे किंवा तुमच्या संपर्कांमधून प्राप्तकर्ते सुचवून आशय शेअर करण्यात तुम्हाला मदत करणे.

आमच्या सेवा नियंत्रित ठेवणे आणि सुधारणे

आमच्या सेवा उद्देशानुसार कार्य करत असल्याची खात्री करण्यासाठी देखील आम्ही तुमची माहिती वापरतो, जसे की कालबाह्यतेचा मागोवा घेणे किंवा तुम्ही आम्हाला तक्रार नोंदवलेल्या समस्यांचे निवारण करणे. आणि आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरतो — उदाहरणार्थ, कोणती शोध संज्ञा सर्वाधिक चुकीची लिहिली आहे हे समजल्याने आम्हाला आमच्या सेवांमध्ये वापरलेली स्पेल चेक वैशिष्ट्ये सुधारण्यात मदत होते.

नवीन सेवा विकसित करणे

आम्हाला नवीन सेवा विकसित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही अस्तित्त्वातील सेवांमध्ये गोळा केलेली माहिती वापरतो.

आशय आणि जाहिरातींसह, पर्सनलाइझ केलेल्या सेवा पुरवणे

तुमच्यासाठी आमच्या सेवा कस्टमाइझ करण्यासाठी आम्ही गोळा केलेली माहिती वापरतो, ज्यात शिफारशी, पर्सनलाइझ केलेला आशय आणि कस्टमाइझ केलेले शोध परिणाम पुरवणे यांचा समावेश आहे.

तुमच्या सेटिंग्जवर आधारित, आम्ही तुमच्या स्वारस्यावर आधारित तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही “माउंंटन बाइक” शोधल्यास, तुम्ही Google द्वारे समर्थित जाहिराती दाखवणार्‍या साइट ब्राउझ करत असताना तुम्ही क्रीडा उपकरणाची जाहिरात पाहू शकता. तुमच्या जाहिरात सेटिंग्जला भेट देऊन तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी आम्ही कोणती माहिती वापरतो ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

  • संवेदनशील वर्गवाऱ्या वर आधारित आम्ही तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवत नाही, जसे की जात, धर्म, लैंगिक प्राधान्य किंवा आरोग्य.
  • जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत जाहिरातदारांसह तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखणारी माहिती आम्ही शेअर करत नाही जसे की तुमचे नाव किंवा ईमेल, उदाहरणार्थ, तुम्हाला जवळपासच्या फ्लॉवर शॉपची जाहिरात दिसल्यास आणि तुम्ही “कॉल करण्यासाठी टॅप करा” बटण निवडल्यास आम्ही तुमचा कॉल कनेक्ट करू आणि फ्लॉवर शॉपसह तुमचा फोन नंबर शेअर करू शकतो.

परफॉर्मन्स मोजणे

आमच्या सेवा कशा वापरल्या आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही विश्लेषण आणि मापनासाठी डेटा वापरतो. उदाहरणार्थ, उत्पादन डिझाइन ऑप्टिमाइझ करणे यासारख्या गोष्टी करण्यासाठी आमच्या साइटला तुम्ही दिलेल्या भेटीं विषयी आम्ही डेटाचा विश्लेषण करतो.

आणि जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरात मोहिमांची कामगिरी समजावून घेण्यात मदत करण्यासाठी तुम्ही संवाद साधत असलेल्या जाहिरातींचा डेटा देखील आम्ही वापरतो. हे करण्यासाठी आम्ही विविध साधने वापरतो, ज्यामध्ये गुगल ॲनॅलिटीक्सचा समावेश आहे.

तुमच्याशी संप्रेषण करणे

तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आम्ही गोळा केलेली माहिती वापरतो जसे की तुमचा ईमेल ॲड्रेस. उदाहरणार्थ, असामान्य स्थानावरून तुमच्या अनुदिनीकार खात्यामध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करणे यासारखी संशयास्पद ॲक्टिव्हिटी आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला सूचना पाठवू शकतो किंवा आम्ही आमच्या सेवांमधील आगामी बदल किंवा सुधारणांविषयी तुम्हाला कळवू शकतो.

तुम्ही अनुदिनीकारशी संपर्क साधल्यास, तुम्हाला येत असणार्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या विनंतीची नोंद ठेवू.

अनुदिनीकार, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे

आमच्या सेवांची सुरक्षा आणि विश्वसनीयता सुधारण्यात मदत करण्यासाठी आम्ही माहिती वापरतो. यामध्ये फसवणूक, गैरवापर, सुरक्षा जोखीम आणि यांत्रिकी समस्या ओळखणे, प्रतिबंधित करणे आणि त्यास प्रतिसाद देणे यांचा समावेश आहे, ज्या अनुदिनीकार, आमचे वापरकर्ते किंवा लोकांना नुकसान पोहोचवू शकते.


या उद्देशांसाठी तुमच्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वेगळे तंत्रज्ञान वापरतो. आम्ही ऑटोमेटड सिस्टिम वापरतो जी कस्टमाइझ केलेले शोध परिणाम, पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती किंवा अन्य वैशिष्ट्ये यासारख्या गोष्टी प्रदान करण्यासाठी तुमच्या आशयाचे विश्लेषण करते.

अनुदिनीकार व संबंधित सेवांचा गैरवापर ओळखण्यात मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या आशयाचे विश्लेषण करतो, जसे की स्पॅम, मालवेअर आणि बेकायदेशीर आशय. डेटामधील पॅटर्न ओळखण्यासाठी देखील आम्ही अल्गोरिदम वापरतो.

अन्य वापरकर्त्यांकडे आधीपासून तुमचा ईमेल ॲड्रेस आणि तुम्हाला ओळखणारी अन्य माहिती असल्यास, आम्ही त्यांना तुमचे नाव आणि फोटो यासारखी, तुमची सार्वजनिकपणे दृश्यमान माहिती दाखवू शकतो. उदाहरणार्थ, हे तुमच्याकडून येणारा ईमेल ओळखण्यात लोकांची मदत करते.

या गोपनीयता धोरणामध्ये समाविष्ट न केलेल्या उद्देशाने तुमची माहिती वापरण्यापूर्वी आम्ही तुमची संमती घेऊ.

तुमची गोपनीयता नियंत्रणे

आम्ही गोळा केलेल्या माहिती संबंधित आणि ती कशी वापरली जाते या संबंधित तुमच्याकडे निवडी आहेत.

तुमची माहिती व्यवस्थापित करणे, तिचे पुनरावलोकन करणे आणि अपडेट करणे

तुम्ही साइन इन केल्यावर, कधीही तुमच्या माहितीचे पुनरावलोकन करू शकता आणि अपडेट करू शकता.

तुमच्या अनुदिनीकार खात्यामध्ये सेव्ह केलेल्या माहितीचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि ती नियंत्रित करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

गोपनीयता नियंत्रणे

ॲक्टिव्हिटी नियंत्रणे

तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी सेव्ह करायची आहे ते ठरवा.

जाहिरात सेटिंग्ज

तुम्हाला दाखवलेल्या जाहिरातींविषयी तुमची प्राधान्ये व्यवस्थापित करा. तुम्ही तुमची स्वारस्ये सुधारित करू शकता, जाहिराती तुम्हाला अधिक संबंधित बनवण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती वापरावी की नाही ते निवडा आणि विशिष्ट जाहिरात सेवा सुरू किंवा बंद करा.

तुमच्या माहितीचे पुनरावलोकन आणि ती अपडेट करण्याचे मार्ग

तुम्ही तुमच्या अनुदिनीकार खात्यामध्ये लॉगिन करून किंवा आम्हाला संपर्क साधून आपल्या माहितीचे पुनरावलोकन करू शकता, व्यवस्थापित करू शकता किंवा ती माहिती संपूर्ण हटवू शकता.


तुम्ही तुमच्या अनुदिनीकार खात्यामध्ये साइन इन केले असल्यास किंवा नसल्यास अनुदिनीकार किंवा विश्वसनीय भागीदारांकडून (उदा. Google) गोळा करत असलेली माहिती नियंत्रित करण्यासाठी त्यामध्ये अन्य मार्ग आहेत, ज्यात यांचा समावेश आहे:

  • ब्राउझर सेटिंग्ज: उदाहरणार्थ, Google ने तुमच्या ब्राउझरमध्ये कुकी कधी सेट केली आहे हे सूचित करण्यासाठी तुम्ही तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. विशिष्ट डोमेन किंवा सर्व डोमेनधून सर्व कुकी ब्लॉक करण्यासाठी देखील तुम्ही तुमचा ब्राउझर कॉन्फिगर करू शकता. पण लक्षात ठेवा की आमच्या सेवा योग्यरित्या कार्य करण्यासाठी कुकींवर अवलंबून असतात जसे की तुमची भाषा प्राधान्ये लक्षात ठेवणे यासारख्या गोष्टी.
  • डिव्हाइस-स्तरीय सेटिंग्ज: तुमच्या डिव्हाइसवर नियंत्रणे असू शकतात जे आम्ही कोणती माहिती गोळा करतो हे निर्धारित करते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या Android डिव्हाइसवर स्थान सेटिंग्ज सुधारित करू शकता.

तुमची माहिती शेअर करणे

तुम्ही तुमची माहिती शेअर केल्यावर

आमच्या अनेक सेवा तुम्हाला अन्य लोकांसह माहिती शेअर करू देते आणि तुम्ही कसे शेअर करता त्यावर तुमचे नियंत्रण असते. उदा., तुम्ही सार्वजनिकरित्या माहिती शेअर करता, तेव्हा तुमचा आशय शोध इंजिनद्वारे ॲक्सेसिबल होऊ शकतो.

तुम्ही साइन इन केल्यावर, जसे की एखाद्या लेखावर टिप्पणी केल्यावर तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या बाजूला तुमचे नाव आणि फोटो दिसतो. आम्ही कदाचित ही माहितीदेखील प्रदर्शित करू.

अनुदिनीकार तुमची माहिती शेअर करतो तेव्हा

आम्ही खालील परिस्थितींशिवाय अनुदिनीकार बाहेरील कंपन्या, संस्‍था, व्‍यक्तींसह वैयक्तिक माहिती शेअर करत नाही:

आपल्या संमतीसह

आम्हाला तुमची संमती मिळाल्यावर आम्ही अनुदिनीकार बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू. परंतु कोणतीही संवेदनशील वैयक्तिक माहिती शेअर करण्यासाठी आम्ही तुमची स्पष्ट संमती घेऊ.

बाह्य प्रक्रिया करण्यासाठी

आम्ही आमच्या संबंधितांना किंवा इतर विश्वासू व्यवसायांना किंवा आमच्यासाठी तिची प्रक्रिया करणार्या व्यक्तींना, आमच्या सूचनांवर आधारित आणि आमच्या गोपनीयता धोरणांचे आणि इतर कोणत्याही योग्य गुप्ततेच्या आणि सुरक्षिततेच्या मापदंडांचे पालन करण्याच्या मुद्यावर वैयक्तिक माहिती प्रदान करतो.

कायदेशीर कारणांसाठी

ॲक्सेस, वापर, जतन करणे किंवा माहितीचे प्रकटन हे यासाठी वाजवी आवश्यक आहे याविषयी आम्हाला सद्भावना असल्यास आम्ही अनुदिनीकार बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू:

  • कोणताही लागू कायदा, नियमन, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणी करण्यायोग्य शासकीय विनंतीची पूर्तता करा. आमच्या पारदर्शकता अहवाल मध्ये आम्हाला सरकारकडून मिळालेल्या नंबर आणि विनंत्यांच्या प्रकाराविषयीची माहिती शेअर करतो.
  • संभाव्‍य उल्‍लंघनांच्‍या तपासणीसह लागू करण्‍यायोग्‍य सेवा अटींची सक्ती करा.
  • शोधण्‍यासाठी, प्रतिबंधित करण्‍यासाठी किंवा अन्‍यथा पत्ता फसवणूक, सुरक्षितता किंवा तात्रिक समस्‍यांसाठी.
  • हक्कांच्‍या, मालमत्तेच्‍या किंवा अनुदिनीकारच्‍या, आमच्‍या वापरकर्त्‍यांच्‍या किंवा लोकांच्या सुरक्षिततेसाठी किंवा कायद्याद्वारे आवश्‍यक किंवा परवानगी असते तेव्‍हा हानीविरूद्ध संरक्षण करण्‍यासाठी.

आम्‍ही वैयक्‍तिकरित्‍या-न ओळखण्‍यायोग्‍य माहिती सार्वजनिकपणे आणि प्रकाशक, जाहिरातदार किंवा कनेक्‍ट केलेल्‍या साइट – यासारख्‍या आमच्‍या भागीदारांसह सामायिक करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही विशिष्ट भागीदारांना देखील त्यांच्या स्वतःच्या कुकी किंवा समान तंत्रज्ञान वापरून जाहिराती आणि मापनासाठी तुमच्या ब्राउझर आणि डिव्हाइसमधून माहिती गोळा करण्याची देखील अनुमती देतो.

अनुदिनीकारचा विलीनीकरणात, संपादन करण्‍यात किंवा मालमत्ता विक्री करण्‍यात समावेश असल्‍यास, आम्‍ही कोणत्‍याही वैयक्तिक माहितीची गोपनीयता सुनिश्‍चित करणे सुरू ठेवू आणि प्रभावित वापरकर्त्‍यांना वैयक्तिक माहिती स्‍थानांतरित केली जाण्‍यापूर्वी किंवा एका भिन्न गोपनीयता धोरणाच्‍या अधीन होण्‍यापूर्वी सूचना देऊ.

तुमची माहिती सुरक्षित ठेवणे

तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी आम्ही आमच्या सेवांमध्ये सुरक्षा निर्माण करतो

सर्व अनुदिनीकार उत्पादने मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह तयार केली आहेत जी सातत्याने तुमची माहिती संरक्षित करतात. आमच्या सेवांची देखरेख करण्यापासून आम्हाला मिळालेला इनसाइट आम्हाला सुरक्षा धोक्यांना ओळखण्यास आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून आपोआप ब्लॉक करण्यास मदत करतात. आणि तुम्हाला माहीत असावे असे काही धोकादायक आम्हाला आढळल्यास आम्ही तुम्हाला सूचित करू आणि अधिक चांगल्याप्रकारे संरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात मदत करू.

तुम्ही आणि अनुदिनीकारचे अनधिकृत प्रवेशापासून किंवा अनधिकृत बदलांपासून, उघड करण्‍यापासून किंवा आमच्‍याकडे असलेली माहिती नष्‍ट करण्‍यापासून संरक्षण करण्‍यात आम्ही कठोर परिश्रम करतो.

  • ट्रांझिट करताना तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी आम्ही एन्क्रिप्शन वापरतो
  • तुम्हाला तुमचे खाते संरक्षित करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही विविध सुरक्षा वैशिष्ट्ये देतो, जसे की सुरक्षित ब्राउझिंग, सुरक्षा तपासणी आणि २-टप्पी पडताळणी
  • आम्ही सिस्टीमवरील अनधिकृत ॲक्सेसविरूद्ध संरक्षण करण्यासाठी शारीरिक सुरक्षा उपाययोजनांसह, आमच्या माहिती संकलनाचे, संचयनाचे आणि प्रक्रिया पद्धतींचे पुनरावलोकन करतो.
  • आम्ही अनुदिनीकार कर्मचारी, कंत्राटदार आणि एजंटसाठी वैयक्तिक माहिती ॲक्सेस करणे प्रतिबंधित करतो ज्यांना प्रक्रिया करण्यासाठी त्या माहितीची गरज असते. या ॲक्सेस असलेले कोणीही कठोर गोपनीयता दायित्त्वाच्या अधीन असेल आणि शिस्तबद्ध असेल किंवा या दायित्त्वाची पूर्तता करू शकत नसल्यास काढले जातील.

तुमची माहिती हटवणे

तुम्ही कोणत्याही वेळी तुमच्या अनुदिनीकार खात्यातून हटवू शकता

तुमची माहिती राखून ठेवणे

डेटा काय आहे, आम्ही तो कसा वापरतो आणि तुम्ही तुमची सेटिंग्ज कशी कॉंफिगर करता यानुसार आम्ही गोळा केलेला डेटा वेगवेगळ्या कालावधीसाठी राखून ठेवतो:

  • तुम्ही तयार किंवा अपलोड केलेला आशय यासारखा काही डेटा तुम्हाला हवा तेव्हा हटवू शकता. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये सेव्ह केलेली ॲक्टिव्हिटी माहिती देखील हटवू शकता किंवा ठराविक वेळेनंतर ती आपोआप हटवण्याचे निवडू शकता.
  • काही वेळानंतर इतर डेटा आपोआप हटवला जातो किंवा अनामित केला जातो जसे की सर्व्हर लॉगमधील जाहिरात डेटा.
  • तुम्ही तुमचे अनुदिनीकार खाते हटवेपर्यंत आम्ही काही डेटा ठेवतो, जसे की तुम्ही आमच्या सेवा कितीवेळा वापरता ती माहिती.
  • आणि कायदेशीर व्यवसाय किंवा कायदेशीर उद्देशांनी आम्ही काही डेटा जास्त वेळ राखून ठेवतो जसे की सुरक्षा, फसवणूक आणि गैरवर्तनापासून प्रतिबंध किंवा आर्थिक रेकॉर्ड ठेवणे.

तुम्ही डेटा हटवता तेव्हा, तुमचा डेटा आमच्या सर्व्हरवरून सुरक्षितपणे आणि पूर्णपणे काढला गेला आहे किंवा फक्त अनामित स्वरूपात राखून ठेवला गेला आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही हटवण्याच्या प्रक्रियेचे पालन करतो. आमच्या सेवा आकस्मिक किंवा दुर्भावनेने हटवण्यापासून माहितीचे संरक्षण करते याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यामुळे, जेव्हा तुम्ही काही हटवता आणि तुमच्या अ‍ॅक्टिव्ह आणि बॅकअप सिस्टममधून कॉपी हटवता तेव्हा यादरम्यान विलंब होऊ शकतो.

अनुपालन आणि नियामकांसह सहकार्य

आम्ही या गोपनीयता धोरणाचे नियमितपणे पुनरावलोकन करतो आणि याचे पालन करणार्‍या मार्गाने आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया करतो.

डेटा ट्रांसफर

आम्ही जगभरातील विविध देशांमधील सर्व्हर्सचा वापर करतो आणि तुम्ही राहत असलेल्या देशा बाहेरील सर्व्हरवर तुमच्या माहितीची प्रक्रिया केली जाऊ शकते. डेटा संरक्षण कायदे देशांनुसार बदलू शकतात काही देश इतरांपेक्षा अधिक संरक्षण देतात. तुमच्या माहितीवर कुठेही प्रक्रिया केली असली तरीही, या धोरणामध्ये वर्णन केलेली संरक्षणे आम्ही लागू करतो. आम्ही विशिष्ट डेटा ट्रांसफरशी संबंधित कायदेशीर फ्रेमवर्क चे देखील पालन करतो.

जेव्हा आम्हाला लिखित तक्रारी प्राप्त होतात तेव्हा आम्ही तक्रार केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधून प्रतिसाद देतो. आम्‍हाला थेट आमच्‍या वापरकर्त्‍यांसह तुमच्या डेटाच्‍या स्‍थानांतरणासंबंधित ज्‍याही तक्रारींचे निराकरण करणे शक्य झाले नाही त्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी, आम्‍ही स्‍थानिक डेटा संरक्षण अधिकार्‍यांसह, योग्‍य नियामक अधिकार्‍यांसोबत कार्य करतो.

या धोरणाबद्दल

हे धोरण कधी लागू होते

हे गोपनीयता धोरण अनुदिनीकार आणि अनुषंगिक सर्व सेवांना लागू होते, ज्यात अनुदिनीकार आणि तृतीय पक्षाच्या साइटवर दिलेल्या सेवा यांचा समावेश आहे, जसे की जाहिरात सेवा. हे गोपनीयता धोरण विभक्त गोपनीयता धोरणे असलेल्या सेवांना लागू होत नाही जे या गोपनीयता धोरणाला अंगभूत करत नाही.

हे गोपनीयता धोरण याला लागू होत नाही:

  • अन्य कंपन्या आणि संस्थांच्या माहिती पद्धती ज्या आमच्या सेवांची जाहिरात करतात
  • तुम्हाला शोध परिणामांमध्ये दाखलेल्या उत्पादन किंवा साइटच्या, अनुदिनीकार सेवांचा समावेश करू शकणार्या साइटच्या किंवा आमच्या सेवांमधून लिंक केलेल्या इतर साइटच्या समावेशासह इतर कंपन्या किंवा व्यक्तींद्वारे ऑफर केलेल्या सेवा

या धोरणातील बदल

आम्ही हे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलतो. आम्ही तुमच्या स्पष्ट संमतीशिवाय या गोपनीयता धोरणाअंतर्गत तुमचे हक्क कमी करणार नाही. आम्ही बदल शेवटी प्रकाशित केलेल्याची तारीख नेहमी सूचित करतो. बदल महत्त्वाचे असतील तर, आम्ही अधिक स्पष्ट सूचना देऊ (ज्यात विशिष्ट सेवा, गोपनीयता धोरण बदलांच्या ईमेल सूचनेचा समावेश आहे).

(शेवट संपादित केल्याचा दिनांक: ३१ जानेवारी २०२१)