नमस्कार, मी अंकित माईण, अनुदिनीकारवर आपलं सहर्ष स्वागत करतो. आजघडीला मी पूर्णवेळ अनुदिनीकार (फुलटाईम ब्लॉगर) आणि कन्टेन्ट मार्केटर म्हणून काम करतो.
रत्नागिरीमध्ये अभियांत्रिकी पदविकेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मी पुणे येथे दोन वर्षे प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी – बजाज येथे कार्यरत होतो. परंतु दरम्यान ब्लॉगिंग आणि डिजिटल मार्केटिंग कडे जास्त कल वाढल्याने मी पूर्णवेळ ब्लॉगिंग या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीचा काहीकाळ यश-अपयश असा प्रवास पाहिल्यानंतर आणि स्वतः हे क्षेत्र एक्सप्लोर केल्यामुळे खूप काही शिकायला मिळालं.
२०१९ हे वर्ष माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं.
पहिल्यावहिल्या SEMrush India Big Blogging Contest मध्ये विजेतेपद मिळाल्यानंतर मी अधिक जोमाने काम करू लागलो.
आज विविध विषयांवर ब्लॉग्स लिहीत असून वर्डप्रेस, डिजिटल मार्केटिंग, आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी मला विशेष आवड आहे.
याखेरीज मी ब्लॉगिंग मार्गदर्शन व कन्टेन्ट मार्केटिंग कन्सल्टिंग सुद्धा करतो. अनुदिनीकार या ब्लॉगद्वारे माझे अनुभव आणि ब्लॉगिंग विषयी मला आत्मसात ज्ञान मराठीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतोय.
आपल्याला जर हा ब्लॉग आवडला तर आम्हाला नक्की कळवा तसेच मित्रांसोबत शेअर करा.