मोबाईलचा वापर करून घरबसल्या पैसे कसे कमवायचे?

How to Make Money From Home with Mobile in Marathi

तुमच्या मोबाईलचा वापर करून घरबसल्या पैसे कसे कमवावे? (How to Make Money From Home with Mobile in Marathi)

तुम्ही एक गृहिणी, निवृत्त व्यक्ती, कॉलेजला जाणारे विद्यार्थी किंवा सुशिक्षित बेरोजगार आहात का? फावल्या वेळात काम करून काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची तुमची इच्छा आहे, परंतु फार मोठी गुंतवणूक करायची तयारी नाही, अशा परिस्थितीत तुम्ही आहात का? 

चला तर मग, तुमच्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटचा वापर करून घरबसल्या पैसे कसे कमवायचे याविषयी या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. (How to Make Money From Home with Mobile in Marathi) 

लक्षात घ्या, या लेखामध्ये नेटवर्क मार्केटिंग/चेन मार्केटिंग (एकाखाली तीन जोडा, मग तुमचा चेक येईल) किंवा आमच्याकडे सुरुवातीला १००,००० रुपये गुंतवा आणि दरमहा हमखास १२,००० मिळवा, असल्या फसव्या योजनांचा समावेश केलेला नाही.

जर व्यवसायाची मूलभूत तत्त्वे जाणून घेऊन, मेहनत करण्याची तुमची इच्छा नसेल, तर यापुढे अजिबात वाचू नका. याउलट तुम्ही ठाम निर्धार केलात आणि हा लेख मनापासून वाचलात, तर योग्य प्रशिक्षण, निरंतर मेहनत, आणि थोडीशी गुंतवणूक (वेळ आणि पैसा) यांच्या साहाय्याने नवीन व्यवसाय स्थापन करू शकता किंवा तुमच्या सध्याच्या ऑफलाईन व्यवसायाला ऑनलाईन आणून अजून जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता.

यशस्वी होण्यासाठी योग्य मनस्थिती तयार करणे  (Building the Right Mindset for Success)

सर्वप्रथम, यशस्वी होण्यासाठी आपल्या मनाची योग्य तयारी करणे आवश्यक आहे. घरातून पैसा कमवणे म्हणजे झटपट श्रीमंत होणे नाही. सुरुवातीला कमी उत्पन्न मिळेल, परंतु हळूहळू अक्कलहुशारीने आणि योग्य दिशेने निष्ठापूर्वक काम ते उत्पन्न वाढवता येते. मात्र त्यासाठी सतत नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि नैतिक मार्गाने प्रगती साधण्याची वृत्ती असली पाहिजे.

लक्षात घ्या, इंटरनेटच्या दुनियेत यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

  • दीर्घकालीन दृष्टिकोन (Long-Term Perspective): घरबसल्या पैसा कमवण्यासाठी योग्य प्रशिक्षण, पुरेसा वेळ आणि मेहनतीमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे काहीही काम न करता किंवा कोणतेही शिक्षण/कौशल्य आत्मसात केल्याशिवाय झटपट श्रीमंत होण्याचे आश्वासन देणाऱ्या योजनांपासून दूर राहा.
  • निरंतर शिक्षण (Continuous Learning): यशस्वी होण्यासाठी सतत नवीन कौशल्ये शिकणे आणि तुमच्या निवडलेल्या क्षेत्रातील नवीन ट्रेंड्सशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. 
  • गुणवत्ता महत्त्वाची (Quality Matters): तुमच्या सेवा किंवा उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यासच तुम्ही बाजारात टिकून राहू शकाल. किंमत कमी करून स्पर्धामक बाजारात स्वतःची ओळख करणे हे सोपे वाटत असले, तरी भविष्याचा विचार करता वस्तू किंवा सेवांची गुणवत्ता हाच तुमच्या व्यवसायाचा प्रमुख निकष असावा. 
  • ग्राहकांशी चांगले संबंध (Good Customer Relationships): तुमच्या ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे. आनंदी ग्राहक तुमच्या वस्तू किंवा सेवा पुन्हापुन्हा खरेदी करतात, त्यांच्या अनुभवाविषयी इतरांना सांगतात, परिणामी तुमचा व्यवसाय झपाटयाने वाढतो. 

नोकरी किंवा व्यवसाय? (Job vs. Business)

तुमच्या मोबाईल/लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या पैसे कमावण्याचा जो मार्ग तुम्ही निवडणार आहात, तो नोकरीसदृश्य आहे की संपूर्णतः व्यवसाय आहे, हे ठरवणे महत्त्वाचे आहे.

  • नोकरी (Job): एखाद्या कंपनीसाठी नियमित काम करणे किंवा फ्रिलांसिंग सेवा पुरवणे ही एक प्रकारची नोकरीच आहे. अशा वेळी तुम्हाला वेतन मिळते, पण तुमच्या कामाचे तास आणि जबाबदाऱ्या कंपनी ठरवते.
  • व्यवसाय (Business): स्वतःचा व्यवसाय म्हणजे तुमच्या कौशल्यांचे आणि वेळेचे नियोजन करून फ्रिलांसिंग सेवा पुरवणे, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा स्वतःच्या वेबसाईटवर उत्पादने/ईबुक्स/कोर्सेस विकणे, नवनवीन साहित्य निर्माण करणे आणि त्याद्वारे अफिलिएट कमिशन किंवा ॲड रेव्हेन्यू कमावणे, इत्यादी. इथे तुम्ही स्वतः मालक असता. सुरुवातीला कदाचित उत्पन्न आणि व्यवसाय विस्ताराविषयी अनिश्चितता असू शकते, परंतु योग्य दिशेने प्रयत्न केल्यास दीर्घकालीन यश आणि वेळ/पैसे यांचे स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? (Requirements)

तुमच्या मोबाईल/लॅपटॉपचा वापर करून घरबसल्या पैसे कमावण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता आहे:

१. बँक खाते (Bank Account)

तुमचे उत्पन्न जमा करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्याकडे Visa, Mastercard, and American Express यांपैकी एका कंपनीचे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास सक्षम असलेले क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. स्वतःच्या वेबसाईट साठी डोमेन नेम, वेब होस्टिंग, थीम्स , किंवा सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी किंवा इतर देशांमध्ये सेवा/उत्पादने विक्री केल्यानंतर स्वतःचे पैसे पेपाल किंवा अन्य पेमेंट प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे भारतात मिळवण्यासाठी या गोष्टी तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.  

२. मोबाईल/लॅपटॉप (Mobile/Laptop)

जवळपास सर्व ऑनलाइन कामे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर करू शकता. काही क्षेत्रांसाठी (उदा., व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक डिझाईन) उत्तम टेक्निकल स्पेसिफिकेशन्स असणाऱ्या हाय-एंड कॉम्प्युटरची गरज असू शकते.

३. इंटरनेट कनेक्शन (Internet Connection)

बहुतेक ऑनलाइन कामांसाठी तुम्हाला स्थिर आणि वेगवान इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असते. काही कामे मोबाईल डेटा चा वापर करून करणे शक्य असते मात्र जर दररोज १० जीबी पेक्षा जास्त डेटा वापर होत असल्यास वायफाय किंवा खासगी कंपन्यांचे एअर फायबर सबस्क्रिप्शन फायदेशीर ठरू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमच्या परिसरात इंटरनेटची उपलब्धता/वेग/किंमत आणि तुमच्या कामाची गरज यांनुसार तुम्ही योग्य पर्याय निवडू शकता. 

४. प्रशिक्षण (Training)

जरी तुम्ही घरबसल्या पैसे कमावण्यासाठी उत्सुक असाल, तरीही काही मूलभूत गोष्टींचे आणि ज्या क्षेत्रात काम करणार आहात, त्याविषयी योग्य प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे असते.  

तुमच्याकडे काही विशेष कौशल्य आहे का? (Knowledge/Expertise)

घरबसल्या पैसा कमवण्याच्या काही मार्गांसाठी विशिष्ट कौशल्यांची आवश्यकता नसते. उदाहरणार्थ, जीपीटी साईट्स (Get Paid To) द्वारे मायक्रो-जॉब्स करण्यासाठी किंवा ऑनलाइन सर्वेक्षणांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही खास ज्ञानाची आवश्यकता नाही. परंतु अशा कामांमधून नगण्य उत्पन्न मिळते, ज्यामुळे हा मार्ग मी कोणालाही सुचवत नाही. इतर मार्गांसाठी तुमची संबंधित विषयातील आवड, कौशल्ये, ज्ञान आणि मागील अनुभवांचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला कल्पना यावी यासाठी खाली काही उदाहरणे नमूद केली आहेत. 

  • लेखन (Writing): तुम्हाला लिहिण्याची आवड असल्यास तुम्ही लेखन, संपादन, कॉपीरायटींग इत्यादी क्षेत्रात काम करू शकता.
  • ग्राफिक डिझाईन (Graphic Design): तुमच्याकडे डिझाईनची समज असल्यास तुम्ही लोगो, सोशल मीडिया पोस्ट्स, लग्नपत्रिका, बारसा/मुंज/डोहाळे जेवण/साखरपुडा किंवा सामाजिक/राजकीय कार्यक्रमांसाठी बॅनर्स/पोस्टर्स डिझाईन करू शकता.
  • वेब डिझाईन आणि डेव्हलपमेंट (Web Design and Development): वेबसाइट डिझाईन आणि डेव्हलपमेंटचे कौशल्य असल्यास तुम्ही स्वतःचे किंवा इतरांच्या वेबसाईट्स तयार करू शकता.
  • डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing): सोशल मीडिया मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इत्यादी डिजिटल मार्केटिंग कौशल्यांची मागणी आहे.
  • अनुवाद (Translation): तुम्हाला मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषांचे ज्ञान असल्यास (विशेषतः परकीय भाषा) आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहजतेने अनुवाद करणे शक्य असल्यास तुम्ही अनुवादकाचे काम करू शकता.
  • कोचिंग (Coaching): एखाद्या विषयाची चांगली माहिती असल्यास तुम्ही ऑनलाइन ट्युटोरिंग करू शकता किंवा त्या विषयासंबंधित ईबुक्स/कोर्सेस/मेंबरशिप्स तयार करून पैसे कमवू शकता. 

या यादीमध्ये दिलेल्या फक्त काही उदाहरणे आहेत. तुमच्या आवडी आणि कौशल्यांवर आधारित इतरही अनेक मार्ग आहेत. जर तुमच्याकडे कोणतेही विशेष कौशल्य नसेल, तर तुम्ही ऑनलाइन कोर्सद्वारे नवीन कौशल्ये शिकू शकता.

वेबसाइट/सोशल मीडिया प्रोफाइल तयार करणे (Website/Social Media Profile Building)

घरातून पैसा कमवण्याच्या काही मार्गांसाठी वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्रोफाइल (फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी) असणे आवश्यक नसले तरीही, तुमच्या विश्वासार्हतेत वाढ आणि लोकांशी जोडण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.

  • वेबसाइट (Website): जर तुम्ही फ्रीलांसर असाल, ब्लॉग चालवत असाल किंवा तुमचे स्वतःचे उत्पादन विकत असाल तर वेबसाइट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. यासाठी तुमच्या सेवा, उत्पादने आणि तुमच्या स्वतःबद्दल माहिती देणारी वेबसाइट तयार करा. सध्या वेबसाईट बनवण्यासाठी खूप मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध असले, तरीही तुम्ही काही रुपये खर्च करून एक उत्तम व्यावसायिक आणि वेगवान वेबसाईट तयार करू शकता.
  • सोशल मीडिया प्रोफाइल (Social Media Profile): वेबसाईट सोबतच सोशल मीडिया प्रोफाईल्स असणेदेखील अत्यंत आवश्यक आहे. सध्या अनेक जणांची अगोदरपासूनच सोशल मीडियावर खाती असतात. फक्त त्यांचा व्यावसायिक दृष्टीने वापर कसा करावा हे समजून घेतले पाहिजे. सर्वप्रथम, तुमच्या क्षेत्राशी संबंधित फेसबुक ग्रुप्समध्ये सहभागी व्हा, तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करणारे पोस्ट करा आणि तुमच्या सेवांची जाहिरात करा. त्याशिवाय तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हाट्सॲप वर तुमच्या उत्पादनांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करू शकता.

नक्की वाचा: स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा?

मोफत मार्केटिंग (Free Marketing Methods)

तुमच्या सेवा किंवा उत्पादनांची मोफत जाहिरात करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुमच्या सेवा/उत्पादनांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे मार्ग उपयुक्त ठरू शकतात.

१. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना सांगा (Tell Friends and Family)

तुमच्या सर्वात जवळच्या लोकांना तुमच्या नवीन व्यावसायिक उपक्रमांबद्दल सांगा. तुमच्या सुरुवातीच्या ग्राहकांमध्ये त्यांचा समावेश असू शकतो तसेच ते तुमच्या उत्पादनांचा/सेवांचा प्रचार करू शकतात.

२. ऑनलाइन समुदायांमध्ये सहभागी व्हा (Participate in Online Communities)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित फेसबुक ग्रुप्स, व्हाट्सॲप ग्रुप्स, फोरम आणि ऑनलाइन समुदायांमध्ये सहभागी व्हा. तुमच्या ज्ञानाची देवाणघेवाण करा, इतरांना मनापासून मदत करा आणि तुमच्या सेवांची सुक्ष्म जाहिरात करा.

३. तुमच्या कौशल्यांचे प्रदर्शन करा (Showcase Your Skills)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित ब्लॉगवर गेस्ट पोस्ट लिहा, युट्युबवर तुमच्या ज्ञानाचे/कौशल्यांचे प्रदर्शन करणारे व्हिडिओ बनवा किंवा तुमचे लेख तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवर प्रकाशित करा. तुमच्या कामाची गुणवत्ता लोकांना आकर्षित करेल आणि तुमच्याशी संपर्क साधण्यास प्रवृत्त करेल.

४. सोशल मीडियावर सक्रिय रहा (Be Active on Social Media)

तुमच्या क्षेत्राशी संबंधित माहिती, टिप्स आणि युक्त्या शेअर करून नियमित सोशल मीडियावर सक्रिय रहा. तुमच्या क्षेत्रातील तज्ञ म्हणून तुमची ओळख निर्माण करा. लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.

कमाईचे मार्ग (Earning Strategies)

आता आपण मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटचा सुयोग्य वापर करून घरबसल्या पैसे कमवायचे याबद्दलच्या काही लोकप्रिय मार्गांबद्दल जाणून घेऊ:

१. फ्रीलांसिंग (Freelancing)

फ्रीलांसिंग हा तुमच्या कौशल्यांचा वापर करून पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या वेळेचे नियोजन करून तुम्ही एक स्वतंत्र व्यावसायिक म्हणून काम करू शकता. वेब डिझाईन, ग्राफिक डिझाईन, लेखन, संपादन, अनुवाद, डाटा एंट्री, व्हिडिओ एडिटिंग इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये फ्रीलांसर म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध आहे. तुमची प्रोफाइल बनवून आणि तुमच्या सेवांची जाहिरात करण्यासाठी तुम्ही अपवर्क किंवा फाइव्हर सारख्या वेबसाइट्स वापरा. सुरुवातीला कमी दरात काम मिळण्याची शक्यता असली तरी, चांगली कामगिरी आणि सकारात्मक रिअव्ह्यूज तुमच्या प्रोफाइलला बळकटी देतील आणि तुमच्या कामाला अधिक मागणी निर्माण होईल, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल.

२. ऑनलाइन ट्युटोरिंग (Online Tutoring)

जर तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असेल आणि तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाइन ट्युटोरिंग करू शकता. अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांशी जोडू शकता. सुरुवातीला तुम्ही गुगल मीट, झूम किंवा झोहो मीटिंग इत्यादी मोफत ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स किंवा व्हाट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही शिकवण्या घेऊ शकता. तुमच्या विषयावरील ज्ञान, शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची तुमची क्षमता तुम्हाला यश मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावते.

३. ऑनलाइन विक्री (Online Selling)

तुमच्या स्वतःच्या हस्तनिर्मित वस्तू, प्रिंटेड वस्तू (डायरी, पेन, कपडे, कॉफी मग, भेटवस्तू, इत्यादी), जुन्या/वापरलेल्या वस्तू किंवा इतर उत्पादने ऑनलाइन विकू शकता. खालील काही मार्ग आहेत:

  • स्वतःची वेबसाइट (Your Own Website): जर तुमच्याकडे अनेक उत्पादने असतील किंवा तुमच्या ब्रँडची ओळख निर्माण करायची असेल तर तुमची स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. सुरुवातीला खर्च जास्त असू शकतो, पण दीर्घकालीन यशासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
  • ई-कॉमर्स वेबसाइट्स (E-commerce Websites): ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विक्रेता म्हणून नोंदणी करा आणि तुमची उत्पादने सूचीबद्ध करा. मोठ्या ग्राहकवृंदापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, परंतु यामध्ये स्पर्धा जास्त असू शकते.
  • ऑनलाइन मार्केटप्लेस (Online Marketplaces): फेसबुक मार्केटप्लेस आणि ओएलएक्स (olx.in) सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेसेसवर तुमची नवीन किंवा जुनी/वापरलेली उत्पादने विकू शकता. स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जुन्या वस्तू विकण्यासाठी हा एक उपयुक्त पर्याय आहे. मात्र हल्ली ऑनलाइन मार्केटप्लेसेसवर फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेले आहेत, त्यामुळे आवश्यक सावधगिरी बाळगूनच काम करा आणि पैशांचे व्यवहार शक्यतो बँक खात्याद्वारे करा. रोकड रक्कम देऊन/घेऊन व्यवहार करताना फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त असते आणि काही अनर्थ घडल्यास पोलिसांत तक्रार करताना व्यवहार केल्याचा पुरावा शिल्लक राहत नाही. 

नक्की वाचा: फेसबुक मार्केटप्लेसद्वारे संलग्न विपणन (Affiliate Marketing) कसे करावे?

ऑनलाइन विक्री करताना उत्तम गुणवत्तेचे उत्पादनांचे फोटो, स्पष्ट आणि सविस्तर वर्णन, वेबसाईट वापरण्यात सुलभता आणि चांगली ग्राहक सेवा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्याशिवाय तुमच्या स्पर्धात्मक फायद्यासाठी तुमच्या उत्पादनांमध्ये काहीतरी अनोखी गोष्ट (USP – Unique Selling Proposition) असणेसुद्धा आवश्यक आहे.

४. ब्लॉगिंग आणि व्हिडिओ ब्लॉगिंग (Blogging and Vlogging)

तुमच्या आवडीचा विषय असलेला ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल सुरू करा. तुमच्या ब्लॉग/चॅनेलवर वाचकांची किंवा प्रेक्षकांची संख्या वाढली की, खालील मार्गांनी तुम्ही पैसा कमवू शकता:

  • जाहिराती (Advertising): तुमच्या ब्लॉगवर किंवा YouTube चॅनेलवर जाहिराती दाखवून तुम्ही पैसा कमवू शकता. तुमच्या युट्युब चॅनेलवर किती सब्सक्राईबर्स आणि व्ह्यूज आहेत, प्रेक्षकांची डेमोग्राफी, एंगेजमेंट यावर तुमची कमाई अवलंबून असते. ब्लॉगवर सुद्धा गुगल ऍडसेन्स किंवा इतर प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती दाखवून तुम्ही पैसा कमवू शकता.  
  • संलग्न विपणनाद्वारे कमिशन (Affiliate Commission): तुमच्या ब्लॉगवर किंवा युट्युब चॅनेलवर इतर कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करा आणि विक्री झाल्यावर कमिशन मिळवा. यासाठी तुमच्या आवडीच्या आणि तुमच्या वाचकांना/प्रेक्षकांना उपयुक्त असलेल्या उत्पादनांची/सेवांची जाहिरात करणे आवश्यक असते.
  • डिजिटल उत्पादनांची विक्री (Digital Products Sales): तुम्ही स्वतःचे ईबुक्स, ऑनलाइन कोर्सेस, प्रिंटेबल सामग्री (उदा. कॅलेंडर्स, डायरी, टेम्पलेट्स) इत्यादी विकू शकता. तुमच्या ब्लॉगवर किंवा युट्युब चॅनलवर या उत्पादनांची जाहिरात करा आणि तुमच्या वाचकांना/प्रेक्षकांना विक्री करा.
  • स्पॉन्सरशिप्स (Sponsorships): तुमच्या क्षेत्रातील कंपन्यांकडून तुमच्या युट्युब चॅनेल, सोशल मीडिया प्रोफाईल्स, किंवा वेबसाइटवर त्यांच्या उत्पादने/सेवांची जाहिरात करण्यासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप मिळवू शकता. तुमच्या युट्युब चॅनेलवर किती सब्सक्राईबर्स आणि व्ह्यूज आहेत, सोशल मीडिया प्रोफाईल्सवर किती फॉलोवर्स व एंगेजमेंट आहे, तुमच्या वाचकांची/प्रेक्षकांची डेमोग्राफी (लिंग, वय, स्थान इत्यादी) यावर तुम्हाला मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपची रक्कम अवलंबून असते. 

५. ऑनलाइन सर्वेक्षण (Online Surveys)

अनेक ऑनलाइन संस्था आणि कंपन्या ऑनलाइन सर्वेक्षणांमधून लोकांचे मत जाणून घेतात. या सर्वेक्षणांमध्ये सहभागी होऊन तुम्ही थोडे पैसे कमवू शकता. परंतु ही कमाई खूप कमी असते ज्यामध्ये तुमच्या वेळेचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे फक्त प्रतिष्ठित कंपन्यांच्याच सर्वेक्षणांमध्ये सहभागी व्हा आणि तुमची खासगी माहिती भरताना खूप सावध रहा.

६. डेटा एन्ट्री (Data Entry)

डेटा एन्ट्रीची कामे घरात बसून करता येतात. या कामांमध्ये संगणकावर माहिती टाइप करणे, फॉर्म भरणे, डेटाचे वर्गीकरण इत्यादींचा समावेश असतो. ही कामे जरी सोपी असली तरी ती रटाळवाणी आणि वेळखाऊ असू शकतात. तुमच्या टाइपिंग स्किल्स आणि संगणनाच्या ज्ञानावर तुमची कमाई अवलंबून असते. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बहुतेक खासगी डेटा एन्ट्री जॉब्स फसवे असतात, ज्यामध्ये तुमच्याकडून डिपॉझिटच्या स्वरूपात काही रक्कम मागितली जाते आणि काम पूर्ण केल्यानंतर क्षुल्लक त्रुटी काढून पैसे देण्यास नकार दिला जातो. अशा वेळी तुमचे डिपॉझिटच्या स्वरूपात भरलेले पैसे, अमूल्य वेळ आणि मेहनत वाया जाते. त्यामुळे अत्यंत खात्रीशीर व्यक्ती किंवा कंपनीद्वारे काम दिले जात नसेल, तर अशा प्रकारचे काम स्वीकारू नका. 

७. वर्च्युअल असिस्टंट (Virtual Assistant)

तुम्ही एखाद्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी वर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करू शकता. तुमच्या कौशल्यांवर आधारित, ईमेल व्यवस्थापन, सोशल मीडिया व्यवस्थापन, वेब संशोधन, वेळापत्रक व्यवस्थापन इत्यादी कामे तुम्ही करू शकता. या कामासाठी चांगल्या संवाद कौशल्यांची आणि संगणनाच्या चांगल्या ज्ञानाची आवश्यकता असते.

८. सोशल मीडिया मॅनेजर (Social Media Manager)

सोशल मीडिया मॅनेजर म्हणून तुम्ही कंपन्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईल्सचे उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (पूर्वीचे ट्विटर), लिंक्डईन इत्यादींचे व्यवस्थापन करू शकता. यामध्ये सोशल मीडियासाठी संशोधन तसेच एकत्रित केलेल्या माहितीचे विश्लेषण करणे, नवनवीन पोस्ट्स/व्हिडिओ तयार करणे, जाहिरातींचे नियोजन करणे, ग्राहकांशी संवाद साधणे इत्यादींचा समावेश होतो. तुमच्या डिजिटल मार्केटिंगच्या ज्ञानावर आणि सोशल मीडियाच्या ट्रेंड्सवर तुमची यशस्वीता अवलंबून असते.

९. ऑनलाइन कोर्स तयार करणे (Create Online Courses)

तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली माहिती असल्यास तुम्ही तुमचा स्वतःचा ऑनलाइन कोर्स तयार करू शकता. हा कोर्स तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेबसाइटवर किंवा www.udemy.com सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. तुमच्या कोर्सची गुणवत्ता, तुमचे संबंधित विषयावरील ज्ञान, प्रेझेंटेशन स्किल्स इत्यादी अनेक गोष्टींवर तुमच्या कोर्सचे यश अवलंबून आहे.

घरातून इंटरनेटद्वारे पैसे कमावताना काय करू नये? (What Not To Do)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमावताना काही गोष्टी अजिबात करू नयेत, त्या खाली नमूद केलेल्या आहेत. 

१. झटपट श्रीमंतीचे आश्वासन देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नका (Don’t Invest in Get Quick Rich Schemes)

इंटरनेटवर अनेक झटपट श्रीमंतीचे आश्वासन देणाऱ्या योजना आढळतात, ज्यामधील बहुतांश योजना फसव्या असतात. अशा योजनांमध्ये अजिबात गुंतवणूक करू नका. त्याऐवजी तुमच्या मेहनत आणि कौशल्यांवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्गाने पैसे कमवा. 

२. तुमच्या बँक खाते किंवा खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नका (Don’t Share Your Bank Account or Private Information with Anyone)

फक्त प्रतिष्ठित कंपन्यांशी आणि लोकांशी व्यवहार करा. तुमची बँक खाते किंवा खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नका. उदा. क्रेडिट/डेबिट कार्डचा पिन, बँक खात्याची माहिती, वैयक्तिक/कौटुंबिक माहिती, ओटीपी.

याशिवाय कोणत्याही अनोळखी फोन नंबरवरून पाठवलेल्या एसएमएस किंवा संशयास्पद ई-मेल मधील लिंक्स वर चुकूनही क्लिक करू नका. तुमचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते.  

३. कोणत्याही कामासाठी खूप जास्त ठेव शुल्क/डिपॉझिट आकारणाऱ्या संस्थांपासून सावध रहा (Beware of Scams Charging Upfront Fees)

काही व्यक्ती किंवा कंपन्या ऑनलाइन कामे सुरू करण्यासाठी डिपॉझिट च्या स्वरूपात शुल्क आकारतात. हे शुल्क फसवेगिरीचे फार मोठे लक्षण असते. प्रतिष्ठित कंपन्या सहसा अशाप्रकारचे शुल्क आकारत नाहीत.

४. काम सुरु केल्यानंतर विलंब करू नका (Don’t Procrastinate)

यशस्वी होण्यासाठी तुमच्या वेळेचे नियोजन करणे आणि नियमित काम करणे आवश्यक आहे. तुमच्या कामांमध्ये ढिलाई/चालढकल करू नका. दिरंगाई केल्यास कोणत्याही कामाला नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागेल आणि तुमची कार्यक्षमता कमीकमी होत जाईल. 

५. झटपट यशाची अपेक्षा करू नका (Don’t Expect Overnight Success)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमवणे हा दीर्घकालीन प्रवास आहे. यामध्ये कदाचित झटपट यश मिळणार नाही. त्यामुळे योग्य दिशेने मेहनत करा, शिकत राहा आणि तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करा. यश नक्की मिळेल. 

समारोप (Conclusion)

घरबसल्या मोबाईल/लॅपटॉप आणि इंटरनेटद्वारे पैसे कमवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तुमच्या आवडी, कौशल्यांवर आधारित योग्य मार्ग निवडा आणि यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. सुरुवातीला कमी उत्पन्न मिळेल, परंतु हळूहळू तुमची कमाई वाढत जाईल. शिकत राहा, प्रगती करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीचा तुमच्या घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याच्या प्रवासात तुम्हाला फायदा होईल अशी आशा आहे. तुमचे प्रश्न आणि सूचना खाली असलेल्या कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा!

चॅटजिपीटीद्वारे ईबुक्स लिहून पैसे कसे कमवावे?

चॅटजिपीटीद्वारे ईबुक्स लिहून पैसे कसे कमवावे, How to Earn Money Writing Ebooks in Marathi

आपल्या सर्वांना इंटरनेटद्वारे पैसे कमवायचे आहेत परंतु साधा सोपा मार्ग माहित नाही. आजमितीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या सहाय्याने ईबुक्स लिहीणे आणि त्यांची ऑनलाइन विक्री करणे हा एक फायदेशीर व्यवसाय आहे.

जर तुम्ही थोडी मेहनत करण्यास इच्छूक असाल तर चॅटजिपीटी (ChatGPT) किंवा अन्य एआय साधनांचा (AI Writing Tools) चा वापर करून ईबुक्स कसे लिहावे आणि ऑनलाईन पैसे कसे कमवावे याविषयी सविस्तर माहिती या लेखाद्वारे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

त्यामुळे एआयच्या मदतीने ईबुक्स लिहून पैसे कसे कमवावे, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा. (How to Earn Money Writing Ebooks in Marathi)

१. ईबुक लिहिण्यासाठी फायदेशीर विषय निवडणे

ईबुक लिहिण्यासाठी विषय निवडणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे.

हो, आपण कोणता विषय (Niche) निवडतो यावरसुद्धा आपलं यश अवलंबून असतं. त्यामुळे सर्वांत प्रथम एक फायदेशीर विषय निवडा. तुम्ही निवडलेला विषय तुम्हाला ईबुकमध्ये कोणत्या गोष्टी  समाविष्ट कराव्या लागतील हे निर्धारित करेल आणि तुम्हाला योग्य प्रेक्षकांना लक्ष्य करण्यात मदत करेल.

लक्षात घ्या, सर्व विषय समान फायदेशीर असतीलच असे नाही. ठराविक विषयांमध्ये ईबुक्स लिहिणे इतरांपेक्षा अधिक पैसे मिळवून देऊ शकतात. शक्यतो लोकप्रिय अर्थात जास्त मागणी असलेली आणि कमी स्पर्धा असलेला विषय शोधण्यासाठी संशोधन करावे लागेल.

यासाठी तुम्ही क्वोरा (Quora), गुगल ट्रेंड्स, फेसबुक, ट्विटर अर्थात सध्याचे एक्स (X), इंस्टाग्राम, रेडिट (Reddit) किंवा यांसारख्या अनेक साधनांची मदत घेऊ शकता. परंतु तुमच्या ईबुकसाठी फायदेशीर विषय निवडताना खालील निकष पूर्ण होत असल्याची खात्री करा. 

१. तुमचे विषयासंबंधित ज्ञान आणि निपुणता: तुमच्याकडे ज्या विषयांचे उत्तम ज्ञान आणि कौशल्य आहे, अशा विषयांवर ईबुक लिहिणे तुलनेने सोपे जाईल. शिवाय एखादा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगता येईल. 

त्यामुळे तुम्ही निवडलेल्या विषयाबद्दल तुम्हाला पुरेसे ज्ञान आहे का किंवा ते आत्मसात करण्याची तुमची तयारी आहे का? याविषयी स्वतःला विचारणा करा.

२. आवड: पैसे कमावताना आवड हा विषय जरी गौण असला तर खूप काळासाठी चॅटजिपीटी (ChatGPT) द्वारे ईबुक्स लिहून पैसे कसे कमवायचा तुमचा विचार असेल तर मात्र निवडलेल्या विषयाबद्दल आवड आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असणे खूप गरजेचे असते.

ई-पुस्तक लिहिणे ही एक लांब आणि आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते, त्यामुळे तुम्हाला आवड असलेला विषय निवडणे महत्त्वाचे आहे. आवडीचा विषय तुम्हाला ईबुक लिहिण्यासाठी प्रेरित ठेवेल आणि तुम्ही उच्च-गुणवत्तेची सामग्री तयार करू शकाल.

३. बाजारातील मागणी: तुम्ही लिहिण्याची योजना करत असलेल्या ईबुकच्या प्रकाराला मागणी आहे याची खात्री करा. आपल्या लक्ष्यित प्रेक्षकांचे (target audience) संशोधन करा आणि त्यांना कशात स्वारस्य आहे आणि त्यांना कोणत्या समस्या येत आहेत ते शोधा. या समस्यांचे निराकरण करणारा विषय निवडल्यास आपण जास्त ईबुक्सची विक्री करू शकाल.

उदा. जर तुम्ही निवडलेल्या विषयांतर्गत अनेक व्यक्ती काहीनाकाही समस्या घेऊन येत असतील आणि त्यांना काहीतरी खात्रीशीर उपायाची गरज भासत असेल, तरच तुम्ही त्याविषयी ईबुक्स लिहू शकता आणि त्याची विक्री करू शकता, किंवा अन्य मार्गाने जसे कि संलग्न विपणन, उत्पादन विक्री, किंवा स्पॉन्सरशिप्सद्वारे पैसे कमावू शकता. 

मी येथे काही फायदेशीर विषयांची यादी दिली आहे, ज्यावरुन मला काय सांगायचे आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. 

  • केसगळती
  • अतिरिक्त वजन
  • महिलांमध्ये थायरॉईड किंवा PCOSची समस्या
  • कमी वजन/वजन न वाढणे
  • मुलांचे संगोपन
  • इंटरव्ह्यू तयारी, इत्यादी. 

४. स्पर्धा: स्पर्धा ही नेहमीच वाईट गोष्ट नसली तरी, तुम्ही निवडलेल्या विषयामधील स्पर्धेच्या पातळीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एकाच विषयावर आधीच अनेक ईबुक्स उपलब्ध असल्यास व तुमच्या ईबुकमध्ये नाविन्यपूर्ण काही नसल्यास, तुमच्या ईबुकची  विक्री करणे अधिक आव्हानात्मक असू शकते.

त्यामुळे तुम्ही निवडलेल्या विषयासंबंधित काही ईबुक्स, उत्पादने, किंवा सेवा अगोदरपासूनच बाजारात उपलब्ध आहेत का, याविषयी सखोल संशोधन करा.

एकंदरीत ईबुकसाठी विषय निवडताना, ज्ञान आणि कौशल्य, आवड, बाजाराची मागणी आणि स्पर्धा यांच्यातील योग्य संतुलन शोधणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने, तुम्ही एक ई-पुस्तक लिहू शकाल जे लिहिणे आणि बाजारात यशस्वी होणे दोन्ही शक्य आहे.

२. ईबुक लिहिण्यासाठी मार्केटचे संशोधन करणे

ईबुक लिहिण्यासाठी मार्केटचे संशोधन (market research) करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. यामुळे तुम्हाला तुमचे लक्ष्यित वाचक आणि तुम्ही निवडलेल्या विषयांमधील स्पर्धा समजून घेण्यात मदत होईल. हे संशोधन तुम्हाला तुमच्या वाचकांसाठी उपयुक्त मजकूर/सामग्री तयार करण्यात मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला तुमचे ईबुक मार्केटमधील इतरांपेक्षा वेगळे करण्यात मदत करेल.

तुमच्या मार्केटचे संशोधन करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही पायऱ्या आहेत:

१. तुमचे लक्ष्यित वाचक ओळखा: तुमचा आदर्श वाचक कोण आहे? त्यांच्या आवडी, गरजा आणि वेदना बिंदू (pain points) काय आहेत? हे जाणून घ्या. आपल्या लक्ष्यित वाचकांना समजून घेणे तुम्हाला वाचकांशी सुसंवाद करणारे साहित्य तयार करण्यात मदत करेल.

२. बाजार संशोधन करा: तुम्ही निवडलेल्या विषयांमधील स्पर्धेचे संशोधन करण्यासाठी ऑनलाइन साधने आणि संसाधने वापरा. तुम्‍ही लिहिण्‍याची योजना करत असलेल्‍या विषयांवरील ई-पुस्‍तके शोधा आणि त्‍यांची सामग्री, शैली आणि संरचनेचे विश्‍लेषण करा. यामुळे तुम्हाला इतर लेखकांनी कशाप्रकारे आपल्या ईबुक्सची बांधणी केली आहे  याची कल्पना देईल जेणेकरून तुमचे ईबुक अद्वितीय बनवण्यासाठी तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय करू शकता.

३. ग्राहक पुनरावलोकनांचे (customer reviews) विश्लेषण करा: लोकांना काय आवडते आणि काय आवडत नाही हे समजून घेण्यासाठी संबंधित विषयांवरील ईबुक्सची ग्राहक पुनरावलोकने वाचा. हे तुम्हाला तुमचे लक्ष्यित वाचक काय शोधत आहेत आणि तुमचे ईबुक अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन करेल. .

४. ट्रेंडनुसार अद्ययावत रहा: तुम्ही निवडलेल्या विषयांमधील ट्रेंड्स आणि नवनवीन माहितीसह अद्ययावत रहा. हे तुम्हाला तुमच्या लक्ष्यित वाचकांसाठी उपयुक्त साहित्य तयार करण्यात मदत करेल.

अशाप्रकारे सखोल मार्केट रिसर्च करून, तुम्ही एक ईबुक लिहू शकाल जे स्पर्धेतून वेगळे असेल आणि तुमच्या लक्ष्यित वाचकांच्या गरजा पूर्ण करेल. यामुळे तुमच्या यशाची शक्यता अनेक पटींने वाढेल आणि तुमच्या लेखनातून पैसे कमावण्यास मदत होईल.

ऑनलाइन ईपुस्तके लिहिण्यासाठी आणि विक्रीसाठी अनेक भिन्न विषय आहेत. काही सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक निचेस खाली नमूद केलेली आहेत:

स्वयं-मदत: वैयक्तिक विकास, सजगता आणि उत्पादकता या विषयांना नेहमीच जास्त मागणी असते.

आरोग्य आणि निरोगीपणा: आहार, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन या विषयांवरील ई-पुस्तके अत्यंत फायदेशीर असू शकतात.

पाककला आणि अन्न: पाककृती, स्वयंपाकाच्या टिप्स आणि अन्न-संबंधित मार्गदर्शक या कोनाड्यात लोकप्रिय आहेत.

प्रवास: मार्गदर्शक, प्रवासी जर्नल्स आणि प्रवास टिपा असे विषय खूप लोकप्रिय असू शकतात.

वित्त: वैयक्तिक वित्त व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक हेसुद्धा अत्यंत लोकप्रिय विषय आहेत.

तंत्रज्ञान: विशिष्ट सॉफ्टवेअर, मोबाईल डिव्हाइसेस आणि इतर तंत्रज्ञान वापरण्यावरील मार्गदर्शकांना जास्त मागणी आहे.

प्रणय आणि काल्पनिक कथा: प्रणय कादंबरी, थ्रिलर आणि इतर काल्पनिक शैली यांचा यामध्ये समावेश होतो.

हस्तकला आणि छंद: विणकाम, चित्रकला आणि बागकाम या विषयांवरील ई-पुस्तके अत्यंत लोकप्रिय असू शकतात. विशेषतः स्त्री वर्गामध्ये या विषयाचे वाचक जास्त आढळतात. 

अध्यात्म आणि धर्म: अध्यात्म, धर्म आणि आत्म-शोध यावर मार्गदर्शक आणि ई-पुस्तके लिहिणे सुद्धा खूप फायदेशीर असू शकते. परंतु त्यासाठी मजबूत आध्यात्मिक बैठक आणि पराकोटीचे विषय ज्ञान असणे आवश्यक आहे. .

व्यवसाय आणि उद्योजकता: व्यवसाय सुरू करणे आणि वाढवणे, विपणन आणि विक्री यावरील ईबुक्सचा या निशमध्ये समावेश होतो.

वर दिलेल्या यादीखेरीज इतर अनेक विषय ईबुक लेखकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. संशोधनाअंती अजून खूप विषय आपण निवडू शकता.

३. उत्तम दर्जाची ईबुक्स लिहा  

एकदा तुम्ही कोणत्या विषयावर ईबुक्स लिहिणार हे निश्चित केलं कि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. आजूबाजूच्या लोकांना असणाऱ्या समस्या, त्यावरील उपाययोजना किंवा उत्पादने यांची खात्रीशीर माहिती गोळा करा.

आपल्या ईबुक्स मध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव करायचा आहे त्याची सूची तयार करा. त्यानुसार उच्च दर्जाची ईबुक्स लिहा. 

तुमची ईपुस्तके तयार करण्यासाठी तुम्ही एआय साधनांचा (AI Writing Tools) जसे कि चॅटजिपीटी (ChatGPT) किंवा गुगल बार्ड (Google Bard) चा  वापर करत असलात, तरी तुम्ही लिहिलेले ईबुक माहितीपूर्ण, अचूक, व इतरांना फायदेशीर (ज्ञानवर्धक) असल्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय तुम्ही लिहिलेलं प्रत्येक ईबुक Etsy किंवा अन्य ठिकाणी सूचीबद्ध करण्यापूर्वी काळजीपूर्वक प्रूफरीड करा. त्यामध्ये शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या त्रुटी असणार नाहीत याची खातरजमा करा.

तुमची ईबुक्स Etsy किंवा इतर कोणत्याही वेबसाईटवर सूचीबद्ध करताना संभाव्य खरेदीदारांवर चांगली छाप पाडण्यासाठी तुम्हाला एकच संधी उपलब्ध असते. त्या संधीचे सोने करा.

प्रत्येक ईबुकसाठी आकर्षक सूची तयार करा. याशिवाय ईबुक्समध्ये शीर्षके स्पष्ट व संक्षिप्त, तसेच मजकूरसुद्धा तपशीलवार लिहा. शक्य असेल तेथे उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा किंवा आकृत्या समाविष्ट करा.

४. लक्षवेधी कव्हर्स तयार करा 

तुमचे ईबुक कव्हर लक्षवेधी आणि तुमच्या ईबुकमधील मजकूर/सामग्रीशी संबंधित असावे. तुमची ईबुक कव्हर्स तयार करण्यासाठी तुम्ही कॅन्वा (Canva) सारखे ग्राफिक डिझाइन टूल वापरू शकता.

५. तुमच्या ईबुक्सची स्पर्धात्मक किंमत ठरवा 

जेव्हा तुमची ईबुक्स लिहून पूर्ण होतील तेव्हा तुम्ही घेतलेल्या मेहनतीनुसार तुमच्‍या ईबुक्सची किंमत ठरवा.

लीड मॅग्नेट म्हणून वापरली जाणारी ईबुक्स मोफत दिली जातात, मात्र विक्रीसाठी सूचीबद्ध केलेल्या ईबुक्सद्वारे पुरेसा नफा मिळाला पाहिजे हे लक्षात ठेवा.

या ईबुक्सची किंमत पुरेशी जास्त ठेवायची आहे. खूप स्वस्त ईबुक्सकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं आणि आपल्या मेहनतीचा पुरेसा मोबदला मिळत नाही. याउलट ईबुक्सची किंमत खूप जास्त ठेवून तुम्‍ही खरेदीदारांना परावृत्त करू नका.

इतर ईबुक्स विक्रेते संबंधित विषयावरील ईबुकसाठी काय शुल्क आकारतात आहेत याविषयी संशोधन करा.

६. तुमच्या ईबुकची जाहिरात करा

तुमची ईबुक्स Etsy किंवा अन्य कोणत्याही वेबसाईटवर सूचीबद्ध केल्यानंतर, तुम्हाला त्यांची जाहिरात करणे आवश्यक आहे. हे करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की सोशल मीडिया मार्केटिंग, सशुल्क जाहिराती (Paid ads) किंवा Etsy वर जाहिराती चालवणे. याशिवाय तेच ईबुक तुम्ही ॲमेझॉनवरसुद्धा  (Amazon KDP) प्रकाशित करू शकता. 

ईबुक्सची जाहिरात करण्यासाठी इंस्टाग्राम आणि ट्विटर अर्थात सध्याचे एक्स (X) या दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चा पुरेपूर फायदा करून घ्या. 

जर तुम्ही संबंधित विषयाशी निगडित माहितीपूर्ण पोस्ट्स, व्हिडिओस, पॉडकास्टस नियमित प्रकाशित करत राहिलात, तर नक्कीच अनेकजण आपल्या Etsy पेज किंवा ईबुक स्टोअरला भेट देतील.

अर्थात प्रत्येकजण पहिल्यावेळीच आपले ईबुक खरेदी करेल अशी शक्यता नसते. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या संपर्क यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ई-मेल लिस्ट बनवणे तसेच फेसबुक, टेलिग्राम, किंवा व्हाट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे अशी उपाययोजना करता येते.

जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ईबुक्सची मार्केटिंग आणि विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र आपल्याविषयी माहिती देणारी एक स्वतंत्र वेबसाईट आणि ई-मेल लिस्ट असणे आपल्या व्यवसायाला एक नवीन उंची प्रदान करेल.       

७. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करा

एकदा ईबुकची विक्री झाली कि काम संपलं असं होत नाही. जर तुम्हाला दीर्घकालीन या व्यवसायात टिकून राहायचं असेल तर ग्राहकांच्या चौकशीस प्रतिसाद द्या आणि त्यांच्या कोणत्याही समस्यांचे द्रुतगतीने आणि कार्यक्षमतेने निराकरण करा.

या व्यवसायात यश मिळवण्यासाठी सोशल मीडियावर तसेच Etsy सारख्या मार्केटप्लेसवर सुद्धा चांगली प्रतिष्ठा (Reputation) आवश्यक आहे.

ईबुक्स लिहून पैसे कसे कमवावे यासाठी महत्त्वाच्या टीपा:

विविध ई-पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करा. तुमच्या ईबुक स्टोअरमध्ये जितकी जास्त विविधता असेल, तितकेच नवीन खरेदीदार तुमच्याकडे आकर्षित होतील. जर वाचकांना तुमचे लेखन आवडत असेल किंवा फायदेशीर ठरत असेल तर ते नक्कीच तुमची नवीन ईबुक्स सुद्धा खरेदी करतील. याशिवाय जुनी ईबुक्स वेळोवेळी अद्ययावत करा.   

तुमच्या ईबुक्स वेगवेगळ्या फॉरमॅट्स मध्ये उपलब्ध करून द्या. पीडीएफ (PDF) फॉरमॅट व्यतिरिक्त, तुमची ईपुस्तके EPUB आणि MOBI फॉरमॅट्स मध्ये उपलब्ध करून ते वाचकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. 

तुम्ही तुमची ईपुस्तके एकत्रित करून (Bundle) तुमची विक्री वाढवू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही संबंधित विषयावरील ई-पुस्तकांची एक संपूर्ण मालिकाच विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करू शकता.

सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी प्रमोशनल कॅम्पेन्स चालवा (उदा. स्वातंत्र्यदिन, जागतिक आरोग्य दिन) . याव्यतिरिक्त तुम्ही विशेष जाहिराती चालवून अधिक खरेदीदारांना आकर्षित करू शकता, जसे की प्रथम ५० जणांसाठी ३०% सवलत किंवा मोफत शिपिंग.

या टिपांचे अनुसरण करून, तुम्ही एआय लिखित ई-पुस्तके विकून यशस्वी होण्याची शक्यता वाढवू शकता.

संलग्न विपणनाद्वारे कमाई कशी करावी: भाग १

How to make money with affiliate marketing on Facebook marketplace in Marathi

जर आपण संलग्न विपणनाद्वारे कमाई इच्छित असाल, तर या लेखात नमूद केलेली क्लुप्ती वापरून आपण हमखास काही पैसे कमावू शकता. (How to make money with affiliate marketing on Facebook marketplace in Marathi)

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या उद्योगात आपल्याला कोणतीही प्रगत विपणन कौशल्ये किंवा खूप वर्षांचा अनुभव असणे आवश्यक नाही. तुम्हाला फक्त संलग्न विपणनाची प्राथमिक ओळख, थोडा संयम आणि योग्य मानसिकतेची गरज आहे.

चला तर मग सुरुवात करूया…

सर्वांत प्रथम अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, इट्सी किंवा तत्सम उत्पादनांच्या विस्तृत श्रेणी असणाऱ्या संलग्न विपणन मार्केटप्लेस वेबसाइटवर आपले अफिलिएट अकाऊंट ओपन करा. लक्षात घ्या काही संलग्न विपणन मार्केटप्लेस वेबसाइट्सवर आपले अफिलिएट अकाऊंट ओपन करण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. 

जलद विक्री होईल किंवा ग्राहक आकर्षित होतील अशा उत्पादनांचा समूह जतन करा. जर हा व्यवसाय तुम्हाला दीर्घकालीन करायचा असल्यास, लँडिंग पेज किंवा अफिलिएट वेबसाइट तयार करणे उत्तम. अशा प्रकारे, तुम्ही इतर श्रेणीतील उत्पादनेसुद्धा एकत्रित करून आपल्या संकेतस्थळावर सूचीबद्ध करू शकता.

यानंतर फेसबुक मार्केटप्लेस, क्रेगलिस्ट (Craigslist) किंवा अन्य ठिकाणी तुम्ही निवडलेली उत्पादने सेल किंमतीमध्ये सूचीबद्ध करणे सुरू करा.

जेव्हा ग्राहक तुमच्याशी संबंधित प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी संपर्क साधतील, तेव्हा फक्त “माफ करा! मी नुकतेच संबंधित प्रॉडक्ट विकले आहे, परंतु तुम्हाला अद्याप हे प्रॉडक्ट विकत घेण्यामध्ये स्वारस्य असल्यास, मी मूळतः हे  प्रॉडक्ट येथे खरेदी केले आहे.” असा प्रतिसाद द्या. आपली अफिलिएट लिंक समाविष्ट करणे विसरू नका. 

नवनवीन ट्रेंडिंग किंवा बेस्टसेलिंग प्रॉडक्ट्स विषयी संशोधन करत राहिल्यास, हा व्यवसाय तुम्ही जास्त काळ करू शकता, जेणेकरून तुमची कमाई गगनाला भिडणे सुरू होईल. 

लक्षात घ्या, तुम्ही अफिलिएट लिंक स्पॅम करत राहिल्यास, तुम्हाला मार्केटप्लेसमधून तात्पुरती किंवा कायमची बंदी घातली जाण्याची शक्यता असते.

नवीन खाते तयार करून आपण ही समस्या सहजपणे सोडवू शकता, परंतु हे अत्यंत कंटाळवाणे आहे. त्याऐवजी लँडिंग पेज किंवा अफिलिएट वेबसाइट बनवणे अधिक सोयीस्कर पर्याय होऊ शकेल. 

एकंदरीत, हे कितीही फसवे वाटले तरीही येथे प्रत्येकजण जिंकतो. कारण ग्राहकाला योग्य उत्पादन मिळते, तुम्हाला थोडे अफिलिएट कमिशन मिळते, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, इट्सी इत्यादी संलग्न विपणन मार्केटप्लेस वेबसाईट्स नफा कमावतात, तुम्ही एखाद्याला उत्पादन विकण्यात मदत करता, फेसबुक मार्केटप्लेस, क्रेगलिस्ट (Craigslist) इत्यादी वेबसाईट्स अधिक सक्रिय होतात आणि कोणाचेही फारसे नुकसान होत नाही.

आणि आपण इच्छित असल्यास, आपण स्वत: ला तज्ञ संलग्न विपणनकर्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी संक्षिप्त सारांश किंवा प्रॉडक्ट रिव्ह्यूदेखील लिहू शकता. इंग्रजी भाषेत सारांश किंवा प्रॉडक्ट रिव्ह्यू लिहिण्यासाठी तुम्ही जास्पर.आय सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करू शकता.

वर नमूद केलेल्या विपणन पर्यांयाखेरीज इंस्टाग्राम, टेलिग्राम, आणि ट्विटर इत्यादी माध्मयांचा सुद्धा वापर तुम्ही विक्री वाढवण्यासाठी करू शकता.  

त्यामुळे आजपासून मागे राहण्याची गरज नाही. आजच आपला संलग्न विपणन व्यवसाय सुरु करा. 

तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास, खाली टिप्पणी करा! मी त्यांना उत्तर देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन.

वाचल्याबद्दल धन्यवाद!

ब्लॉग कसा तयार करावा?

How to Start a Blog in Marathi ब्लॉग कसा तयार करावा

आपल्याला इंग्रजी नीट लिहिता-बोलता येत नसेल तरीसुद्धा एक व्यावसायिक ब्लॉग कसा तयार करावा (How to Start a Blog) याविषयी सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

भाषा हे संभाषणाचे एक माध्यम आहे. आपण ज्या भाषेमध्ये ब्लॉग लिहिणार आहात, त्या भाषेबद्दल प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मातृभाषेव्यतिरीक्त इतर भाषांमध्ये व्यावसायिक ब्लॉग लिहू नये.

इंग्रजीसारख्या लोकप्रिय व आंतरजालावरील मुख्य भाषेमध्ये ब्लॉग लिहिल्यामुळे काही फायदे होतात. उदा. आपल्या ब्लॉगसाठी एखाद्या प्रादेशिक भाषेच्या तुलनेत जास्त वाचकवर्ग उपलब्ध असतो. अर्थार्जनाचे अधिक पर्याय खुले होतात.

परंतु आपल्या चुका होतील व आपल्याला अपयश सहन करावे लागेल या भीतीमुळे बरेच ब्लॉगर्स इतर भाषांमध्ये ब्लॉग लिहिण्यास धजावत नाहीत.

हीच भीती नाहीशी करण्यासाठी मी या लेखामध्ये इंग्रजीमध्ये ब्लॉग कसा तयार करावा याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे.

आपण मोबाईल किंवा संगणकाचा वापर करत आहात याचाच अर्थ आपल्याला आपली मातृभाषा व इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान आहे.

त्यामुळे या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टींचे अनुसरण केल्यास आपण नक्कीच इंग्रजीमध्ये व्यावसायिक ब्लॉग तयार करू शकता.

१. कमी स्पर्धात्मक कीवर्ड्स शोधणे

आजमितीला लाखो ब्लॉगर्स इंग्रजीमध्ये ब्लॉग प्रकाशित करतात. इतक्या ब्लॉगर्ससोबत स्पर्धा करत गुगल किंवा अन्य सर्च इंजिनच्या प्रथम पानावर आपले संकेतस्थळ दिसण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. शिवाय आपण लिहिलेला मजकूर अत्यंत उच्च दर्जाचा असावा लागतो. 

त्यामुळे आपले भाषेचे ज्ञान बेताचे असताना कोणतेही संशोधन व अभ्यास न करता इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिल्यास अपयश पदरी पडण्याची दाट शक्यता असते.

या संशोधनाचा प्रमुख टप्पा म्हणजे फायदेशीर विषय व कमी स्पर्धात्मक  कीवर्ड्स शोधणे.

यासाठी आपण semrush.com या संकेतस्थळाला भेट देऊन नवीन खाते (account) तयार करा. 

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण Semrush च्या सर्व फीचर्सचा १४ दिवसांसाठी मोफत अमर्यादित लाभ घेऊ शकता.

आपल्या Semrush खात्यामध्ये लॉगिन करा व डाव्या बाजूच्या एसईओ (SEO) या पर्यायावर क्लिक करा.

तेथील कीवर्ड रिसर्च मेन्यू खालील कीवर्ड मॅजिक टूल (Keyword Magic Tool) हा पर्याय निवडा.

या टूलच्या सर्च बॉक्समध्ये पुढील शब्द क्रमाक्रमाने समाविष्ट करून सर्च बटणावर क्लिक करा. याशिवाय आपण ज्या देशामध्ये आपले संकेतस्थळ रँक करू इच्छिता, तो देश सुद्धा निवडू शकता.

  • review
  • pricing
  • discount
  • coupon
  • coupon code
  • sale
  • worth it
  • tutorial
  • how to use
  • free
  • free trial
  • lifetime
  • lifetime free
  • walkthrough
  • honest opinion
  • demo
  • buy
  • purchase
  • current year
  • vs
  • vs.
  • compare
  • comparison 

सर्च केल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला कीवर्ड्स व संबंधित एसईओ मेट्रिक्सची यादी मिळेल. या कीवर्ड्सपैकी कमी स्पर्धा असणारे कीवर्ड्स निवडण्यासाठी फिल्टरचा वापर करा.

Semrush Keyword Magic Tool Overview
(कीवर्ड मॅजिक टूल) Semrush Keyword Magic Tool Overview

शेवटी सर्व याद्यांमधील कमी स्पर्धात्मक परंतु फायदेशीर कीवर्ड्सची एक सामायिक यादी तयार करा. 

सामायिक यादीमधील कीवर्ड्सपैकी एका ठराविक विषयासंबंधित कीवर्ड्सची आपल्या ब्लॉगसाठी निवड करा. 

कीवर्ड्सची निवड करताना सर्च व्हॉल्युम, ट्रेंड्स, संबंधित कीवर्ड्स व प्रश्न, आणि शोध इंजिन परिणाम पृष्ठ विश्लेषण (SERP Analysis) करणे विसरू नका.

Semrush Keyword Magic Tool: Keyword Overview Pop-up
कीवर्ड मॅजिक टूल: (Semrush Keyword Magic Tool: Keyword Overview)

Semrush इंटरफेसमध्ये यासाठी विशेष पॉप-अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे आपला बहुमूल्य वेळ वाचू शकेल.

२. संकेतस्थळाचा आराखडा तयार करणे 

कीवर्ड्सची अंतिम यादी हाती आल्यानंतर पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे आपल्या संकेतस्थळाचा आराखडा (Site Structure) तयार करणे.

अंतिम यादीमध्ये ५० पेक्षा जास्त कीवर्ड्स असतील तर एकमेकांशी संबंधित कीवर्ड्सची निरनिराळ्या कॅटेगरीजमध्ये मांडणी करा. प्रत्येक कॅटेगरीमध्ये १ ते १० प्रमुख कीवर्ड्स व इतर सहाय्यक कीवर्ड्स, प्रश्न असू शकतात. 

अंतिम यादीमध्ये एकमेकांशी संबंधित ५० पेक्षा कमी कीवर्ड्स असतील तर अनेक कॅटेगरीज बनवण्याची विशेष गरज नसते. 

आता प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकूण किती लेख प्रकाशित करणार आहेत याचे योग्य नियोजन करा. शक्यतो प्रत्येक कॅटेगरीमध्ये १ मुख्य लेख (Pillar Post) व १५ किंवा अधिक सहाय्यक लेख असू शकतात. आपण निवडलेल्या विषयानुसार हि संख्या कमी-जास्त होऊ शकते. 

जर शक्य असेल तर सायलो स्ट्रक्चर (Silo Structure) या आराखडा पद्धतीचा वापर करावा.

Website Silo Structure
सायलो स्ट्रक्चर (Silo Structure)

३. स्वतःचा ब्लॉग तयार करणे: पूर्वतयारी 

स्वतःचा ब्लॉग तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक असते. 

सर्वांत प्रथम आपण ब्लॉगिंगद्वारे ऑनलाईन व्यवसाय करत असून त्यासाठी आपल्या मनाची तयारी असावी. याशिवाय नियमितपणे प्रतिदिन किमान १ तास किंवा आठवड्याला किमान ६ तास ब्लॉगिंगसाठी देणे आवश्यक आहे.

छंद अनुदिनीकारांसाठी (हॉबी ब्लॉगर्स) ही अट नसली तरी त्यांनीही नियमितपणे ब्लॉग लेखन करणे अपेक्षित असते. 

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे उत्तम इंटरनेट जोडणी व संगणक असणे आवश्यक आहे. जर संगणक नसेल तर आपण मोबाईल किंवा टॅबलेटचा वापर देखील करू शकता. 

माझ्या अनुभवावरून सांगतो की संगणक वापरून ब्लॉग लेखन व इतर ब्लॉगिंग संबंधित कामे करणे मोबाईलच्या तुलनेने जास्त सोयीस्कर असते. 

ब्लॉगिंगसाठी मॅकओस की विंडोज वापरावी ( macOS vs Windows for Blogging) हा जरी वैयक्तिक निर्णय असला तरी मॅकओसवर ब्लॉगिंग करणे हा सुखद अनुभव असतो.

कारण आपल्या कामाचा वेग व उत्पादकता वाढल्यामुळे इतर कामांसाठी जास्त वेळ उपलब्ध होतो. अर्थात  यासाठी तुलनेने जास्त गुंतवणूक करावी लागते कारण ॲपल कंपनीची उत्पादने सामान्यतः किंमतीने महाग असतात. 

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नियमितपणे ब्लॉगिंग करणार असाल तर बैठक व्यवस्था अशा प्रकारे असावी की आपल्या शरीरावर जास्त ताण येणार नाही.

शिवाय प्रकाश, तापमान, व्हेंटिलेशन, व आजूबाजूच्या आवाजाची पातळी नियंत्रित असावी, जेणेकरून आपण एकाग्र होऊन ब्लॉगिंग संबंधित कामे करू शकता. 

४. ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडणे 

आपल्याला हाताळणे शक्य होईल असे कोणतेही ब्लॉगिंग व्यासपीठ (Blogging Platform) आपण निवडू शकता. आजमितीला ब्लॉगर, वर्डप्रेस, मिडीअम, क्वोरा, स्क्वेअरस्पेस, विक्स, विबली, टम्बलर इत्यादी अनेक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. 

यांपैकी प्रत्येक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वापरण्याचे काही फायदे व तोटे आहेत. त्याविषयी मी सविस्तर लेख लिहीनच. परंतु या सर्वांमध्ये वर्डप्रेस हा उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे वर्डप्रेस.ऑर्ग मोफत उपलब्ध आहे आणि आपल्याला  हवे तसे बदल आपण यामध्ये करू शकतो. 

आजमितीला आंतरजालावरील ४२% संकेतस्थळे वर्डप्रेसचा वापर करून बनवलेली आहेत. वर्डप्रेस वापरकर्त्यांमध्ये ब्लॉगर्स, व्यावसायिक, यांच्यासोबतच फॉर्च्युन ५०० कंपन्यांचाही समावेश होतो. यावरूनच वर्डप्रेसची प्रचंड लोकप्रियता दिसून येते. 

मी स्वतः माझे सर्व व्यावसायिक ब्लॉग बनवण्यासाठी वर्डप्रेसचाच वापर करतो. त्यामुळे मी आपणासही वर्डप्रेस ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडण्याचा सल्ला देईन. 

५. डोमेन व वेब होस्टिंग खरेदी करणे 

वर्डप्रेस.ऑर्ग वापरण्यासाठी आपल्याला स्वतःचे डोमेन व वेब होस्टिंग सेवा विकत घ्यावी लागते. 

मी यापूर्वीच डोमेन कसे विकत घ्यावे आणि वेब होस्टिंग सेवा कशी विकत घ्यावी याविषयी सविस्तर लेख लिहिले आहेत. अधिक माहितीसाठी आपण ते लेख पुन्हा वाचू शकता. 

लक्षात घ्या स्वतःचे डोमेन व वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यासाठी प्रतिवर्ष सुमारे ३-५ हजार रुपये गुंतवणूक करावी लागू शकते. 

परंतु घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. 

सुरुवातीला स्वतःचे डोमेन व वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यासाठी काही रक्कम आपण गुंतवत असाल परंतु आपल्या ब्लॉगद्वारे अर्थार्जन सुरु झाल्यानंतर हा खर्च आपल्या ब्लॉगच्या उत्पन्नातूनच भागवला जाऊ शकतो. 

फक्त काही रुपये वाचवण्याच्या नादात निकृष्ट दर्जाची वेब होस्टिंग सेवा विकत घेणे टाळावे. 

ज्या सेवांबद्दल माझा आतापर्यंत चांगला अनुभव आहे, अशा निवडक डोमेन व वेब होस्टिंग सेवांच्या लिंक्स मी खाली दिल्या आहेत. 

डोमेन:

१. नेमचीप:

वैशिष्ट्ये: 

  • मोफत गोपनीयता प्रमाणपत्र (Whois Privacy) 
  • माफक किंमत 

२. नेमसिलो: 

वैशिष्ट्ये: 

  • मोफत गोपनीयता प्रमाणपत्र (Whois Privacy) 
  • माफक किंमत 
  • कोणतेही अपचार्ज किंवा अपसेल्स नाहीत 

वेब होस्टिंग 

१. ब्लुहोस्ट (Bluehost) – संपादकीय निवड*

वैशिष्ट्ये: 

  • वार्षिक किंवा त्रैवार्षिक प्लॅनसोबत १ वर्ष मोफत डोमेन 
  • अमर्यादित बॅण्डविड्थ 
  • मोफत सुरक्षा प्रमाणपत्र (SSL)
  • मोफत सीडीएन (CDN) + वेबसाईट हस्तांतरण (Migration)
  • भारतीय डेटा सेंटर उपलब्ध
  • भारतीय चलनात पेमेंट करण्याची सुविधा
  • १००+ मोफत वर्डप्रेस थीम्स
  • ई-मेल सुविधा 
  • उत्तम ग्राहक सेवा 

२. ग्रीनगीक्स:

वैशिष्ट्ये: 

  • मोफत सुरक्षा प्रमाणपत्र
  • ई-मेल 
  • बॅकअप्स + रिस्टोअर्स 
  • नवीनतम तंत्रज्ञान युक्त 
  • उत्तम ग्राहक सेवा 
  • अधिक वेगासाठी मोफत सीडीएन व LSCache कॅशिंग यंत्रणा
  • मोफत वर्डप्रेस इन्स्टॉलेशन किंवा मायग्रेशन 
  • वार्षिक किंवा त्रैवार्षिक प्लॅनसोबत १ वर्ष मोफत डोमेन 
  • ३००% हरित उर्जेचा वापर: पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध  

३. होस्टआर्मडा: 

वैशिष्ट्ये: 

  • मोफत सुरक्षा प्रमाणपत्र
  • ई-मेल सुविधा 
  • बॅकअप्स + रिस्टोअर्स सुविधा 
  • नवीनतम तंत्रज्ञान युक्त 
  • मोफत वेबसाईट ऑप्टिमायझेशन सुविधा 
  • उत्तम ग्राहक सेवा 
  • वार्षिक किंवा त्रैवार्षिक प्लॅनसोबत १ वर्ष मोफत डोमेन 

४. क्लाऊडवेज (वेगवान)

वैशिष्ट्ये: 

  • आपल्या संकेतस्थळाच्या गरजेनुसार आवश्यक संसाधने मिळवण्याची सुविधा 
  • वेगवान होस्टिंग 
  • मोफत सुरक्षा प्रमाणपत्र
  • क्लाऊड प्रदाता (Cloud Provider) निवडण्याची मुभा 
  • स्वयंचलित बॅकअप्स सुविधा

लक्षात घ्या क्लाऊडवेज वेब होस्टिंग वापरण्यासाठी आपल्याला सर्वर व्यवस्थापन, संकेतस्थळ निर्मिती, व वर्डप्रेस इत्यादींचे प्राथमिक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण क्लाऊडवेजची ग्राहक सेवा तितकीशी प्रतिसादक्षम नाही. 

५. रॉकेट.नेट (प्रीमियम)

वैशिष्ट्ये: 

  • प्रीमियम श्रेणीमधील अत्यंत वेगवान होस्टिंग 
  • फुल-पेज कॅशिंग सह एन्टरप्राइझ श्रेणी सीडीएन
  • उत्कृष्ट दर्जाची सुरक्षा व मोफत सुरक्षा प्रमाणपत्र
  • स्वयंचलित बॅकअप्स + रिस्टोअर्स सुविधा
  • २४/७ उत्कृष्ट ग्राहक सेवा 

महत्त्वाचे: ब्लॉगिंग साठी लागणारी संसाधने उदा. डोमेन, वेब होस्टिंग, थीम्स विकत घेण्यासाठी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा चालू पेपाल खाते असणे गरजेचे असते. जर आपल्याकडे अशी सुविधा नसेल तर आपण आपले पालक, मित्र, किंवा सहकारी यांची मदत घेऊ शकता. 

६. नेमसर्व्हर्स बदलणे 

डोमेन व वेब होस्टिंग खरेदी केल्यानंतर पुढची पायरी म्हणजे नेमसर्व्हर्स बदलणे. यासाठी आपल्या डोमेन नेम नोंदणी केलेल्या खात्यात लॉगिन करून कस्टम नेमसर्व्हर्सच्या जोडू शकता. 

जेव्हा आपण वेब होस्टिंग खरेदी करता, तेव्हा आपल्याला वेब होस्टिंग कंम्पानीद्वारे पाठविलेल्या ईमेलमध्ये  नेमसर्व्हर्सविषयी माहिती दिलेली असते. 

जर आपण वर नमूद केलेल्या वेब होस्टिंग सेवेचा लाभ घेतला असेल, तर आपल्याला मोफत डोमेन दिले जाते.

डोमेन व वेब होस्टिंगचे व्यवस्थापन एकच कंपनी करत असल्यामुळे नेमसर्व्हर्स बदलण्याची गरज भासत नाही.

तरीही काही अडचण भासल्यास आपण संबंधित डोमेन नोंदणी व वेब होस्टिंग कंपनीच्या ग्राहक सेवा कक्षाशी संपर्क साधू शकता.

७. सुरक्षा प्रमाणपत्र स्थापित करणे (SSL Certificate Installation)

यामुळे आपले संकेतस्थळ व त्याला भेट देणाऱ्या वाचकांची माहिती सुरक्षित राखण्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्राची मदत होते. 

भविष्यात आपण संकेतस्थळाद्वारे कोणत्याही वस्तू किंवा सेवा विकणे सुरु केले तर ग्राहकांची माहिती (उदा. वैयक्तिक तपशील, पेमेंट डिटेल्स, स्थळ इत्यादी) सुरक्षित राखण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर सुरक्षा प्रमाणपत्र स्थापित करणे अत्यंत आवश्यक असते. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुगल सर्च अल्गोरिदम मध्ये HTTPS हा एक मुख्य रँकिंग सिग्नल आहे

आपण जर वर्डप्रेस ब्लॉग तयार करणार असाल, तर घाबरण्याची काहीच गरज नाही. सध्या बहुतांश नामांकित वेब होस्टिंग कंपन्या एका क्लिकवर मोफत सुरक्षा प्रमाणपत्र स्थापित करण्याची सुविधा प्रदान करतात. 

काही वेब होस्टिंग कंपन्या यासाठी ठराविक रक्कम आकारू शकतात, शिवाय सुरक्षा प्रमाणपत्र स्थापित करण्यासाठी तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळे नवीन ब्लॉगर्सनी अशा कंपन्यांपासून दूर राहिलेलेच उत्तम. 

या लेखामध्ये नमूद केलेल्या सर्व वेब होस्टिंग कंपन्या सुरक्षा प्रमाणपत्र मोफत व सहजरित्या स्थापित करण्याची सुविधा प्रदान करतात, त्यामुळे शक्यतो त्यांचाच वापर करण्याचा सल्ला मी देईन. 

८. वर्डप्रेस स्थापित करणे 

बहुतांश  वेब होस्टिंग कंपन्यांच्या नियंत्रण पॅनेलमध्ये ऑटोमॅटिक वर्डप्रेस इन्स्टॉलेशनची सुविधा असते.

तेथे फक्त आपले डोमेन, युजरनेम, पासवर्ड, व इतर माहिती भरल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने वर्डप्रेस स्थापित होते. 

यानंतर आपल्याला वर्डप्रेस साईट व ॲडमिन पॅनेलचा पत्ता मिळेल ज्याचा वापर करून आपण आपल्या संकेतस्थळामध्ये लॉगिन होऊ शकता. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संकेतस्थळाबद्दल संवेदनशील माहिती, जसे की युजरनेम व पासवर्ड कोणाबरोबरही सामायिक करू नका. यामुळे भविष्यात संकेतस्थळ हॅक होणे किंवा सुरक्षेसंबंधित अन्य प्रश्न येणार नाहीत. 

९. परमालिंक्स रचना बदलणे

वर्डप्रेस स्थापित झाल्यानंतर जेव्हा प्रथम आपण ॲडमिन पॅनेलमध्ये लॉगिन करता, तेव्हा सर्वांत प्रथम एक गोष्ट आवर्जून करा ती म्हणजे परमालिंक्स रचना बदलणे. 

आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग कोणत्या प्रकारचा आहे (उदा. संलग्न विपणन अनुदिनी, वृत्त संकेतस्थळ इत्यादी), यानुसार सुयोग्य परमालिंक्स रचना निवडा. 

या लेखामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून एक संलग्न विपणन अनुदिनी किंवा विषय अनुदिनी बनवण्याचा जर आपण प्रयत्न करत असाल तर सेटिंग्स > परमालिंक्स >  प्रचिती सेटिंग्स > सामान्य सेटिंग्स मध्ये पोस्ट नाव हा  पर्याय निवडा.

WordPress Permalinks Settings
(प्रचिती सेटिंग्स) WordPress Permalinks Settings

१०.  पूर्वस्थापित प्लगिन, टिपण्णी, पृष्ठ व लेख काढून टाकणे

आपण वापरलेल्या वर्डप्रेस इंस्टॉलरनुसार व मूलभूतरित्या वर्डप्रेस काही थीम्स, प्लगिन, टिपण्णी, पृष्ठे, किंवा लेख पूर्वस्थापित करते. 

याचा उद्देश आपल्याला वर्डप्रेसच्या सामान्य वैशिष्ट्यांविषयी माहिती करून देणे असतो. अधिकची पृष्ठे किंवा लेख हे आपण वापरत असलेल्या वेब होस्टिंग कंपनीच्या विपणन रणनीतीचा भाग असू शकतात. 

या पूर्वस्थापित घटकांची आपल्या संकेतस्थळाला आवश्यकता नसल्याने ते घटक काढून टाकणे श्रेयस्कर ठरते.

११. एसईओ-फ्रेंडली वर्डप्रेस थीम स्थापित करणे

यापुढची पायरी म्हणजे आपल्याला आवडणारी परंतु एसईओ-फ्रेंडली वर्डप्रेस थीम स्थापित करणे. कोणतीही वर्डप्रेस थीम निवडताना खालील निकष लक्षात घेतले पाहिजेत. 

  • हलकी-फुलकी परंतु आवश्यक सर्व वैशिष्ट्ये असणारी 
  • मोबाईल-रिस्पॉन्सिव्ह (कोणत्याही डिव्हाईसवर आपले संकेतस्थळ व्यवस्थित दिसले पाहिजे). 
  • सुरक्षित (हॅकपासून धोका टाळण्यासाठी)
  • नवीन तंत्रज्ञान व वैशिष्टयांनी अद्ययावत 
  • सहजरित्या सानुकूल (Customize) करता येण्याजोगी 
  • वाजवी किंमत 

या सर्व निकषांवर खऱ्या उतरणाऱ्या काही  वर्डप्रेस थीम्सची यादी खाली दिली आहे. या थीम्स पूर्णतः मोफत आहेत व वर्डप्रेसच्या अधिकृत निर्देशिकेत उपलब्ध आहेत.

परंतु अधिक वैशिष्ट्ये व सानुकूलन पर्याय मिळवण्यासाठी आपण या थीम्सचे विस्तार (प्रीमियम एक्सटेंशन्स) विकत घेऊ शकता. 

एसईओ-फ्रेंडली वर्डप्रेस थीम्सची यादी (मोफत+प्रीमियम)

वर्डप्रेस थीम स्थापित करण्याची प्रक्रिया सुद्धा खूप सोपी आहे.

प्रथम आपल्या वर्डप्रेस ॲडमिन पॅनेलमध्ये लॉगिन करून डाव्या बाजूला असणाऱ्या पर्यायांपैकी देखावा > थीम्स > नवीन थीम जोडा वर क्लिक करा.

समोर उघडणाऱ्या थीम जोडा या वेबपेजवर थीम शोधण्याचा पर्याय उपलब्ध असेल, ज्याचा उपयोग करून आपण आपल्याला आवडणारी वर्डप्रेस थीम स्थापित करू शकता. 

Add New WordPress Theme
नवीन थीम जोडा (Add Theme)

जर आपण वर्डप्रेसच्या अधिकृत निर्देशिकेत उपलब्ध नसणारी एखादी थीम वर्डप्रेस स्थापित करू इच्छित असाल, तर मात्र आपल्याला थीम अपलोड करा या पर्यायावर जाऊन थीम (.zip) या फॉरमॅट मध्ये अपलोड करावी लागते.

अपलोड किंवा स्थापित केलेली थीम कार्यान्वित (Activate) करायला विसरू नका.

वर्डप्रेस व्यतिरिक्त इतर विक्रेत्यांकडून डाऊनलोड केली थीम अपलोड करण्यापूर्वी व्हायरस टोटल (VirusTotal) या संकेतस्थळावर अपलोड करून वापरासाठी सुरक्षित असल्याची खात्री करा.

कोणत्याही प्रकारच्या अनधिकृतरित्या सानुकूल केलेल्या (Nulled) वर्डप्रेस थीम्स वापरणे टाळा. यामुळे आपल्या संकेतस्थळाच्या सुरक्षेला फार मोठी हानी पोहोचू शकते.

१२. अत्यावश्यक प्लगइन्स स्थापित करणे

प्लगइन्स आपल्या वर्डप्रेस संकेस्थळाची कार्यक्षमता विस्तारण्यास मदत करतात. आपल्या संकेस्थळाची सुरक्षा मजबूत करणे, वेग वाढवणे, सोशल मीडिया शेअरिंग बटण लावणे, ई-मेल मार्केटिंग फॉर्म्स जोडणे, इत्यादी असंख्य गोष्टी प्लगइन्समुळे शक्य होतात. 

आपल्याला माहित आहेच की वर्डप्रेस ही एक माहिती व्यवस्थापन प्रणाली आहे जिचा मुख्य उद्देश कोडींगशिवाय ब्लॉग तयार करणे असा आहे. परंतु विविध प्लगइन्सच्या मदतीने आपण ई-कॉमर्स स्टोअर, व्यावसायिक संकेतस्थळ, ऑनलाईन शिकवणी संकेतस्थळ, इत्यादी तयार  करू शकतो. 

वर्डप्रेस थीम्सप्रमाणे प्लगइन्स निवडण्यासाठीही काही निकष असतात. उदा. 

  • हलके-फुलके परंतु आवश्यक सर्व वैशिष्ट्ये असणारे  
  • सुरक्षित (हॅकपासून धोका टाळण्यासाठी)
  • वर्डप्रेस आवृत्ती, थीम किंवा अन्य प्लगिन्ससोबत सुसंगत असणारे  
  • नवीन तंत्रज्ञान व वैशिष्टयांनी अद्ययावत 
  • वापरण्यास सोपे 
  • वाजवी किंमत

वर्डप्रेस प्लगइन्स स्थापित करणे थीम्स स्थापित करण्याइतकेच सोपे आहे. आपल्या वर्डप्रेस ॲडमिन पॅनेलमध्ये लॉगिन करून डाव्या बाजूला असणाऱ्या पर्यायांपैकी प्लगइन्स > नवीन जोडा वर क्लिक करा.

आपल्याला वर्डप्रेस अधिकृत निर्देशिकेत उपलब्ध असणाऱ्या प्लगइन्सची यादी दिसेल. त्यांपैकी आवश्यक प्लगइन्स आपण स्थापित करू शकता.

याशिवाय इतर प्लगइन्सही अपलोड करण्याची सुविधा वर्डप्रेसमध्ये असते. प्लगइन्स  > नवीन जोडा > प्लगइन अपलोड करा या पर्यायाचा वापर करून आपण कोणतेही थर्ड-पार्टी प्लगइन स्थापित करू शकता. 

आपल्या वर्डप्रेस संकेतस्थळ/ब्लॉगवर असायलाच पाहिजे अशा प्लगइन्सची यादी खाली दिलेली आहे. 

  • All In One WP Security (मोफत)
  • Easy Table of Contents (मोफत)
  • Rank Math SEO (मोफत)
  • WP Rocket (प्रीमियम)
  • Novashare (प्रीमियम)
  • Webpushr (मोफत)

१३. आपल्या ब्लॉगसाठी अक्षरशैली व रंगसंगती निवडणे 

व्यावसायिक ब्लॉग तयार करताना सुयोग्य अक्षरशैली व रंगसंगती निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. हे दोन घटक आपल्या ब्लॉगच्या सौंदर्यामध्ये भर टाकत असतात शिवाय वाचन अनुभव समृद्ध करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतात. 

आपल्याला व वाचकांना आवडेल अशी अक्षरशैली व रंगसंगती निवडल्यास फायदा होईल. इंग्रजी भाषेतील ब्लॉगसाठी खूप अक्षरशैली पर्याय उपलब्ध आहेत. त्यामानाने मराठी भाषेतील ब्लॉगसाठी कमी अक्षरशैली पर्याय उपलब्ध आहेत. 

दोन्ही भाषेतील काही लोकप्रिय अक्षरशैली पर्याय मी खाली नमूद केले आहेत. 

इंग्रजी 

  • Barlow
  • Helvetica
  • Inter
  • Lato
  • Montserrat
  • Open Sans
  • Oswald
  • Proxima Nova
  • Raleway
  • Roboto

मराठी (देवनागरी लिपी)

  • Arya
  • Baloo 2
  • Eczar
  • Glegoo
  • Gotu
  • Halant
  • Mukta
  • Noto Sans
  • Poppins
  • Rhodium Libre

याचबरोबर सुंदर रंगसंगती निवडण्यासाठी आपण Adobe ColorCoolors या संकेतस्थळांचा वापर करू शकता.

ब्लॉगच्या पार्श्वभूमीसाठी हलकी रंगछटा आणि शीर्षके,अक्षरे, व दुवे इत्यादींसाठी ठळक रंगछटा वापरल्यास आपल्या ब्लॉगचे सौंदर्य खुलून दिसेल.

१४. महत्त्वाची पृष्ठे तयार करणे

जेव्हा आपण नवीन संकेतस्थळाची निर्मिती करता, तेव्हा त्यासोबतच महत्त्वाची काही पृष्ठे सुद्धा तयार करणे आवश्यक असते. 

आपल्या वर्डप्रेस ॲडमिन पॅनेलमध्ये लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या पेजेस > नवीन वाढवा या पर्यायावर क्लिक करून आपण आपल्याला हवी असणारी पृष्ठे तयार करू शकता. 

खाली नमूद केलेली पृष्ठे आपल्या ब्लॉगवर असणे व्यावसायिक भूमिकेतून अत्यंत आवश्यक असते. 

  • मुखपृष्ठ (Homepage) 
  • आपल्याविषयी माहिती (About Us)
  • संपर्क (Contact)
  • गोपनीयता धोरण (Privacy Policy)
  • अस्वीकरण (Disclaimer)
  • स्वामित्व हक्क धोरण (Copyright Policy)
  • कमाई प्रकटीकरण (Earning Disclosure)
  • साईटमॅप (Sitemap)

याशिवाय आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपण नियमित विचारले जाणारे प्रश्न (FAQs), अटी व शर्ती (TOS), शिपिंग व रिटर्न पॉलिसी, प्रेस रिलीजेस, मीडिया किट, अकाऊंट साईन अप, साईन इन, शॉप, चेकआऊट इत्यादी अनेक पृष्ठे तयार करू शकता.  

ब्लॉगचे सानुकूलन करताना यांपैकी महत्त्वाची काही पृष्ठे मुख्य नेव्हिगेशन, साईडबार, फूटर इत्यादी ठिकाणी दर्शवू शकता. 

१५. ब्लॉगसाठी लोगो तयार करणे 

लोगो हे आपल्या ब्लॉगचे ओळख चिन्ह असते. आपला ब्लॉग इतरांमध्ये उठून दिसावा यासाठी आपला लोगो दमदार हवाच. 

लोगो बनवणे इतकेसे कठीण नाही. ब्लॉगसाठी निवडलेली अक्षरशैली व रंगसंगती कायम राखत एक सुंदर लोगो आपण रेखाटू शकता. शक्य असेल तर ब्लॉगचे नाव किंवा ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत एखादे चिन्ह आपण लोगोमध्ये रेखाटू शकता. 

कॅन्वा या ऑनलाईन ग्राफिक एडिटिंग टूलच्या साहाय्याने लोगो तयार करणे खूप सोपे असते. आपल्या संभावित ब्लॉग संरचनेनुसार आपल्या लोगोचा आकार व रिझोल्युशन आपण ठरवू शकता. 

शक्यतो ब्लॉगसाठी आडवा (२४० X ६० पि. ) लोगो रेखाटला तर सुंदर दिसतो व मेनूबारवरही चपखल बसतो. 

लोगोसोबतच साईट आयकॉन/फेव्हिकॉन (५१२ X ५१२ पि.), समाजमाध्यम संकेतस्थळांवर अपलोड करण्यासाठी आवश्यक साहित्य सुद्धा कॅन्वा द्वारे रेखाटणे शक्य आहे. 

जर लोगो व इतर ग्राफिक डिझाईन करण्यास आपण सक्षम नसाल तर आपण फ्रीलान्सर्स किंवा फाइव्हरसारख्या फ्रीलान्स संकेतस्थळाची मदत घेऊ शकता.   

जर आपण फ्रीलान्सर्सचे साहाय्य घेणार असाल, तर आपल्या लोगोची संकल्पना, अक्षरशैली, रंगसंगती, ब्लॉगचा विषय, लोगो व इतर ग्राफिक्ससाठी आपण खर्च करू इच्छित असलेली रक्कम याबाबत प्रकल्प सुरु होण्याअगोदरच संवाद साधावा.

जेणेकरून आपल्या  लोगोची सुधारित आवृत्ती वारंवार बनवावी लागणार नाही व प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोगो हा आपल्या ब्लॉगची प्रमुख ओळख असल्यामुळे तो वारंवार बदलावा लागणार नाही याची काळजी लोगो तयार करतानाच घ्यावी. 

उगाचच भपकेदार लोगो बनवण्यापेक्षा साधा परंतु आपल्या वाचकांच्या कायम स्मरणात राहील असा लोगो बनवण्यावर आपला भर असावा. अन्यथा लोगो पुनर्रेखाटन (Logo Redesign) करण्यासाठी वेळ व पैसे विनाकारण खर्च होतात.

१६. ब्लॉगचे सानुकूलन करणे 

अक्षरशैली व रंगसंगती निवडणे, लोगो, फेव्हिकॉन, व महत्त्वाची पेजेस तयार करणे इत्यादी पूर्वतयारी झाली की आपण ब्लॉगचे सानुकूलन करू शकता. 

आवश्यकता असेल तर सानुकूलन करण्यापूर्वी ब्लॉग आकृतीबंधही आपण तयार करू शकता.  

ब्लॉगचे सानुकूलन करताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्या. 

  • योग्य उंचीचा हेडर सेक्शन तयार करणे.
  • लोगो व फेव्हिकॉन अपलोड करणे. 
  • ब्लॉग सेक्शन व कंटेंट सेक्शनची रुंदी, साईडबारची रुंदी किती असावी हे ठरवणे.   
  • वर्डप्रेस मेनूज तयार करणे. 
  • मोबाईल मेनूज तयार करणे.
  • ब्लॉगच्या प्रत्येक घटकासाठी पूर्वनियोजित अक्षरशैली व रंगसंगती स्थापित करणे आणि आपल्या ब्लॉगच्या गरजेनुसार सानुकूलन करणे.  
  • आवश्यक असेल तर साईडबार तयार  करून त्यावर योग्य विजेट्स स्थापित करणे. 
  • फूटर सेक्शन तयार करणे. 
  • सर्च पर्याय मुख्य मेनू किंवा साईडबारच्या वरच्या भागात स्थापित करणे. 
  • सोशल मीडिया शेअरिंग/फॉलो पर्याय स्थापित करणे. 
  • वेब पुश नोटिफिकेशन व लीड जनरेशन फॉर्म्स ब्लॉगवर जोडणे. 

१७. कॅटेगरीजची निर्मिती करणे 

जर आपण एका ब्लॉगवर एक्मेकांसंबंधित निरनिराळया उपविषयांवर लेख लिहिणार असाल तर कॅटेगरीज ची निर्मिती करणे उत्तम. यामुळे आपले वाचक व सर्च इंजिन या दोन्हींना आपल्या ब्लॉगचे अवलोकन करणे सोपे जाते.

सायलो स्ट्रक्चर मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक सायलोसाठी आपण एक कॅटेगरी तयार करू शकता. 

आपल्या वर्डप्रेस ॲडमिन पॅनेलमध्ये लॉगिन करून डाव्या बाजूला असणाऱ्या पोस्ट्स > कॅटेगरीज् या पर्यायावर क्लिक करून नवीन कॅटेगरी बनवणे किंवा पूर्वनिर्मित कॅटेगरी संपादित करणे शक्य असते. 

Add New WordPress Category
नवीन कॅटेगरी जोडा (Add a New Category)

विनाकारण भारंभार पोस्ट कॅटेगरीज तयार करण्यापेक्षा एक कॅटेगरीसाठी पुरेसे (किमान १५) लेख लिहूनच नवीन कॅटेगरी तयार करणे उत्तम. ज्यामुळे एखाद्या उपविषयाशी स्वारस्य असणाऱ्या ब्लॉग वाचकांना पुरेसे लेख वाचण्यास उपलब्ध असतील.

१८. नवीन पोस्ट लिहिणे 

ब्लॉग कसा तयार करावा (How to Start a Blog) याविषयी सविस्तर माहिती आतापर्यंत या लेखामधून आपल्याला मिळाली असेलच याची मला खात्री आहे. आता आपल्या ब्लॉगवर नवीन लेख कसे लिहावे याविषयी जाणून घेऊ. 

जर आपण मराठीमध्ये लेख लिहिणार असाल तर आपल्याला फार समस्या येणार नाही. कारण मराठी आपली मातृभाषा आहे व तीचे पुरेसे ज्ञान आपल्याला असेलच यात शंका नाही. 

परंतु मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर आपण इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिणार असाल तर मात्र थोडी अडचण निर्माण होऊ शकते. नियमित इंग्रजीमध्ये लेख लिहून प्रकाशित करणे थोडे मुश्किल काम आहे, विशेषतः जे लोक नोकरी-व्यवसायामध्ये व्यस्त असतात. 

अजिबात घाबरून जाऊ नका. 

आपल्यासाठी लेख लिहून प्रकाशित करणे शक्य नसेल तर मी दोन कल्पना सुचवतो. 

१. कोणत्याही फ्रीलान्स मार्केटप्लेसवरून इंग्रजीमध्ये लेख लिहून घेणे. 

जर आपल्याकडे थोडी गुंतवणूक असेल तर आपल्याला परवडणाऱ्या कोणत्याही फ्रीलान्स मार्केटप्लेसवरून आपण इंग्रजीमध्ये लेख लिहून घेऊ शकता.

यासाठी प्रत्येक लेख किंवा शब्दसंख्या यानुसार शुल्क आकारले जाते. नेटवर्किंग, सोशल मीडिया ग्रुप्समधूनही काही फ्रीलान्सर्स आपण या कामासाठी नेमू शकता.

लेख लिहिण्याव्यतिरिक्त एसईओ करणे, ग्राफिक्स डिझाईन करणे, वर्डप्रेस व्यवस्थापन करणे इत्यादी कामांसाठीही फ्रीलान्सिंग सेवा उपलब्ध असतात. 

फाइव्हर, अपवर्क, व फ्रीलान्सर ही काही नामांकित मार्केटप्लेसेस आहेत. 

२. कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त (AI-based) लेख निर्मिती साधनांचा वापर करणे. 

आपल्याला कल्पनाही नसेल परंतु सध्या बाजारात अनेक कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त लेख निर्मिती साधने (AI-based Content Creation Tools) उपलब्ध आहेत. 

त्यांपैकीच एक टूल मी आपल्याला सुचवणार आहे, त्याचे नाव आहे जास्पर.एआय (Jasper.ai)

जास्पर.एआय हे एक GPT-3 तंत्रज्ञानावर आधारित लेख निर्मिती साधन आहे. जास्पर.एआयचा बॉसमोड प्लॅन वापरून खूप जलद कंटेंट लिहू शकता.

विशेष म्हणजे यामध्ये लॉंग-फॉर्म असिस्टंट चा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे १००० शब्दांपेक्षा जास्त लांबीचा लेख एकाच वेळेस लिहिणे शक्य होते.

जास्पर.एआय सुमारे ८०%-९०% ओरिजिनल कंटेंट स्वयंचलित पद्धतीने लिहिण्यास सक्षम आहे, परंतु थोडेसे संपादन करून आपण संबंधित लेखाची गुणवत्ता अनेक पटीने वाढवू शकता. 

यासाठी आपण वर्डट्यून (WordTune)ग्रामरली (Grammarly) या दोन ऑनलाईन टूल्सचा वापर करू शकता. 

जास्पर.एआय, वर्डट्यून व ग्रामरली या तीन ऑनलाईन टूल्सचा वापर करून आपण दर महिन्याला ६० पेक्षाही जास्त लेख इंग्रजीमध्ये प्रकाशित करू शकता. 

लक्षात घ्या जास्पर.एआय व ग्रामरली ही प्रीमियम टूल्स असल्यामुळे आपल्याला सुरवातीला काही रक्कम खर्च करावी लागते. त्याचा जलद परतावा मिळण्यासाठी आपण इतरांसाठी लेखनिर्मिती सेवा (Content Writing Services) प्रदान करू शकता. 

जास्पर.एआय, वर्डट्यून व  ग्रामरली या तीन ऑनलाईन टूल्सचा वापर करून लिहिलेल्या लेखाचा नमुना माझ्या इंग्रजी ब्लॉगवर पाहता येईल. 

याशिवाय प्रत्येक लेखासाठी एसईओ कंटेंट टेम्प्लेट तयार करण्यासाठी आपण सेमरश चा आधार घेऊ शकता. सेमरश आपल्या टार्गेट कीवर्ड साठी सर्च इंजिन रिझल्ट पेजवर रँक झालेल्या टॉप १० स्पर्धक वेबपृष्ठांचे विश्लेषण करून आपल्या लेखासाठी एसईओ शिफारसी सुचवेल.

ज्यामध्ये  लेखाची शब्दसंख्या, रिडॅबिलिटी स्कोअर, टार्गेट कीवर्डसंबंधित इतर शब्दार्थ, बॅकलिंक ऑपॉर्च्युनिटीज, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

१९. आपले लेख सर्च इंजिन व वाचकांसाठी ऑप्टिमाईझ करणे 

नवीन लेख लिहून झाल्यानंतर व्याकरण, शुद्धलेखन, वाक्यरचना, व शब्दसंगती यांतील चुका टाळण्यासाठी आपल्याला संपादनाची गरज भासू शकते.

इंग्रजी भाषेतील ब्लॉगसाठी आपण ग्रामरली किंवा प्रोरायटिंगएड इत्यादी ऑनलाईन टूल्सचा वापर करू शकता. मराठीसाठी मात्र हे काम आपल्याला वैयक्तिक पातळीवर करावे लागेल. 

आपले संकेतस्थळ व लेख वाचकांसाठी ऑप्टिमाईझ करणे हा सुद्धा एसईओचा महत्त्वाचा भाग आहे. 

याशिवाय खाली नमूद केलेल्या सोप्या गोष्टींचा वापर करून आपण आपले लेख सर्च इंजिन व वाचकांसाठी ऑप्टिमाईझ करू शकता. 

  • आपला टार्गेटेड कीवर्ड शीर्षक, युआरएल, वर्णन यांमध्ये समाविष्ट करणे. 
  • शीर्षकाची लांबी ५० ते ६० वर्ण आणि जास्तीत जास्त ५८० पि. पर्यंत ठेवणे. 
  • आपला आपला टार्गेटेड कीवर्ड शीर्षकामधे व लेखामध्ये सुरुवातीला वापरणे. 
  • शक्य असेल तिथे शीर्षकामधे अंक किंवा वर्ष यांचा वापर करणे. 
  • युआरएलची लांबी कमीत कमी ठेवणे व कीवर्डचा वापर करणे. 
  • शक्यतो युआरएल इंग्रजी भाषेतच ठेवणे. 
  • लेखामध्ये कीवर्ड्सचा नैसर्गिकरित्या वापर करणे. मुख्य कीवर्ड व्यतिरिक्त इतर कीवर्ड्स व प्रश्न यांचाही वापर करू शकता. 
  • शक्यतो मुख्य कीवर्डची घनता लेखामधील एकूण शब्दसंख्येच्या ३% पेक्षा अधिक नसावी. 
  • कॉम्प्रेस्ड इमेजेस वापरणे व  इमेजचे शीर्षक, Alt Text यांमध्ये टार्गेटेड कीवर्डचा वापर करणे. 
  • शक्य असेल तर व्हिडिओ लेखामध्ये जोडणे. परंतु आपला व्हिडिओ प्रथम युट्युब किंवा अन्य व्हिडिओ शेअरिंग संकेतस्थळांवर अपलोड करून मगच एम्बेड करावा. 
  • ब्लॉगवरील एकमेकांसंबंधित लेख जोडणे (Interlinking) 
  • Schema Markup चा वापर करणे.
  • ब्लॉग जलद लोड होण्यासाठी ऑप्टिमाईझ करणे. 
  • ब्लॉगची क्रॉल होत आहे का, इतर कोणत्या तांत्रिक अडचणी नाहीत ना याची खातरजमा करणे. 
  • ब्लॉग वर सर्व कंटेंट HTTPS ने सुरक्षित आहे याची खात्री करणे.  

सर्च इंजिन ऑप्टिमाईझेशनसाठी आपण Rank Math SEO, Semrush, Ahrefs, आणि गुगलच्या काही साधनांचा (उदा. कीवर्ड प्लॅनर, पेजस्पीड इनसाईट्स, मोबाईल फ्रेंडली टेस्ट इत्यादी) वापर करू शकता.

२०. आपला ब्लॉग गूगल व इतर सर्च इंजिन्समध्ये समाविष्ट करणे

जर आपल्याला गुगल, बिंग, या अन्य सर्च इंजिन मधून रहदारी मिळवायची असेल तर आपला ब्लॉग संबंधित सर्च इंजिन्समध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. 

सर्वांत प्रथम गुगल सर्च कन्सोल मध्ये साईन अप करून आपले डोमेन व्हेरिफाय करा. यासाठी गुगलद्वारे दिला जाणारा कोड आपल्या संकेस्थळाच्या हेडर सेक्शनमध्ये समाविष्ट करावा लागतो. 

ॲस्ट्रा प्रो किंवा जनरेटप्रेस प्रीमियम मध्ये यासाठी विशेष हुक्सची सुविधा असते, जेणेकरून थर्ड-पार्टी कोड स्थापित करणे सोपे होते. 

याशिवाय डोमेन व्हेरिफिकेशन केल्यानंतर ब्लॉगचा साईटमॅप सर्च कन्सोलमध्ये सबमिट करावा. त्यामुळे आपल्या ब्लॉगवर असणाऱ्या व नवीन प्रकाशित होणाऱ्या लेखांची गुगलला जलद माहिती मिळेल व ब्लॉग इंडेक्सिंग प्रक्रिया वेगवान होईल.  

Rank Math SEO प्लगइन मधील साईटमॅप सेटिंग्स (Sitemap Settings) सेक्शनमधून आपल्या ब्लॉगचा साईटमॅप मिळवणे सहज शक्य आहे. 

गुगल व्यतिरिक्त अन्य सर्च इंजिनमध्येही आपला ब्लॉग समाविष्ट करून आपण अधिक रहदारी (Web Traffic) मिळवू शकता. 

सारांश 

ब्लॉग कसा तयार करावा (How to Start a Blog) याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न मी लेखातून केलेला आहे. 

यापुढील लेखांमध्ये रहदारी कशी वाढवावी (How to Increase Website Traffic) व ब्लॉगद्वारे कमाई कशी करावी (How to Make Money From a Blog) याविषयी माहिती देण्याचा मानस  आहे. 

जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर टिपण्णीद्वारे कळवा. तसेच आपले मित्र, सहकारी, व ब्लॉग शिकण्यास इच्छूक व्यक्तींसोबत सामायिक करण्यास विसरू नका. 

मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?

मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे, How to do keyword research tutorial in Marathi, keyword research in marathi

कीवर्ड म्हणजे काय, कीवर्ड स्टफिंग म्हणजे काय, कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय, आणि कीवर्ड्सचे प्रकार कोणते याविषयी सविस्तर माहिती यापूर्वीच्या लेखामध्ये प्रकाशित केली आहे.

या लेखामध्ये आपण मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे (How to do keyword research in Marathi) याविषयी माहिती घेणार आहोत. 

कीवर्ड रिसर्च हा एसईओ प्रक्रियेतील एक मुख्य घटक आहे.

गुगल, बिंग, व अन्य सर्च इंजिनद्वारे जास्तीत जास्त ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर  योग्य कीवर्ड्सचा समावेश करून उत्तम दर्जाचा मजकूर प्रकाशित करणे आवश्यक असते. 

एसईओ कीवर्ड रिसर्च प्रक्रियेमधील महत्त्वाचे मेट्रिक्स (Essential Keyword Metrics for SEO)

या भागात मी एसईओ कीवर्ड रिसर्च प्रक्रियेमधील महत्त्वाच्या मेट्रिक्सची यादी केली आहे.

१. प्रतिमाह शोधसंख्या (Monthly Search Volume)

एखादा कीवर्ड आपल्या ब्लॉगवरील लेखामध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याची प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) किती आहे ते जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते.

जर माहितीपर ब्लॉगवर अत्यंत कमी प्रतिमाह शोधसंख्या असणारे कीवर्ड्स समाविष्ट केले तर मिळणारे ऑरगॅनिक ट्रॅफिक व कमाई दोन्ही खूप कमी असेल.

२. प्रत्यक्ष रहदारी (Actual Traffic/Clicks)

जेव्हा एखादा कीवर्ड गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर शोधला जातो, तेव्हा प्रत्येक वेळी शोधकर्ता वेबसाईटवर जाईलच असे सांगता येत नाही.

काही सर्च क्वेरीजसाठी गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेजवरच शोधकर्त्याला अपेक्षित परिणाम दर्शविते.

अशा सर्च क्वेरीजसाठी संकेतस्थळाला भेट देणारे शोधकर्ते (प्रत्यक्ष रहदारी) खूप कमी असते.

उदा. ‘आजची तारीख‘ असे सर्च केल्यानंतर गुगल त्यादिवशी असणारी तारीख आन्सर बॉक्समध्ये दर्शविते.

Keyword Research in Marathi आजची तारीख in Google SERP
Google SERP – आजची तारीख

त्यामुळे या कीवर्डसाठी सरासरी १०० ते १००० प्रतिमाह शोधसंख्या असतानासुद्धा प्रत्यक्ष रहदारी/क्लिक्स मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असते.

Keyword Research in Marathi आजची तारीख in Google Keyword Planner
Google Keyword Planner – आजची तारीख

कारण शोधकर्त्याला अपेक्षित उत्तर गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेजवरच सापडते आणि शोधकर्त्याचा हेतू पूर्ण होतो.

३. कल (Keywords Search Trend)

जेव्हा आपण मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च करतो, त्यावेळी कीवर्ड रिसर्च टूल्सद्वारे दाखवली जाणारी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) ही १२ महिने किंवा आपण ठरवलेल्या कालावधीमध्ये होणाऱ्या कीवर्ड सर्च व्हॉल्युमची सरासरी असते.

Keyword Research in Marathi Google Trends Interest Over Time
Google Trends Interest Over Time
Keyword Research in Marathi Google Trends Interest by Subregion, Related Topics, Related Queries
Google Trends – Interest by Subregion, Related Topics, and Related Queries

म्हणजेच काही महिन्यांमध्ये कीवर्ड सर्च व्हॉल्युम कमी असेल तर काही महिन्यांमध्ये कीवर्ड सर्च व्हॉल्युम जास्त असेल.

उदा. नाताळ भेटवस्तू या कीवर्डसाठी डिसेंबर महिन्यात इतर महिन्यांपेक्षा कीवर्ड सर्च व्हॉल्युम जास्त असेल.

त्यामुळे शोधसंख्येचा आलेख (Keywords Search Trend) चढता, उतरता कि समतोल आहे यानुसार योग्य कीवर्ड्स शोधून आपल्या मजकुरात समाविष्ट करणे फायदेशीर ठरते.

४. कीवर्ड एसईओ डिफिकल्टी (Keyword SEO Difficulty)

एखाद्या कीवर्ड साठी सर्च इंजिन रिझल्ट पेजवर प्रथम क्रमांकावर असणाऱ्या संकेतस्थळाच्या जागी रँक होण्यासाठी किती स्पर्धा आहे, याला कीवर्ड एसईओ डिफिकल्टी असे म्हणतात.

बहुतांश एसईओ टूल्स एखाद्या कीवर्डसाठी सर्च इंजिन रिझल्ट पेजवर प्रथम १० मध्ये रँक होणाऱ्या डोमेन्सची ऑथॉरिटी, त्या डोमेन्सना मिळणाऱ्या बॅकलिंक्स, टॉप पोझिशनमध्ये होणारे बदल, आणि मजकुराचा दर्जा इत्यादी गोष्टींनुसार कीवर्ड एसईओ डिफिकल्टी ठरवतात.

जितकी कीवर्ड एसईओ डिफिकल्टी कमी, तितकीच कमी मेहनत आपल्याला त्या कीवर्डसाठी आपले संकेतस्थळ सर्च इंजिनमध्ये रँक करण्यासाठी घ्यावी लागेल.

कीवर्ड एसईओ डिफिकल्टी शोधण्यासाठी कीवर्ड रिसर्च टूल्सचा वापर करण्यासोबतच मॅन्युअल रिसर्च करणेही अत्यंत आवश्यक असते.

जेणेकरून संबंधित कीवर्डसाठी प्रत्यक्षात किती स्पर्धा आहे आणि आपण तो कीवर्ड आपल्या एसईओ मोहिमेमध्ये समाविष्ट केला पाहिजे का याबाबत योग्य निर्णय घेता येईल.

५. सीपीसी (CPC)

सीपीसी (Cost Per Click) म्हणजे कोणत्याही डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्मवर प्रत्येक क्लिकसाठी आकारली जाणारी रक्कम.

डिजिटल जाहिरात क्षेत्रात गुगलचा दबदबा असल्यामुळे गुगलद्वारे आकारले जाणारे जाहिरातींचे दर सीपीसी मानक म्हणून वापरले जातात.

ज्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक उपक्रम, खरेदी-विक्री, व गुंतवणूक मोठया प्रमाणावर होत असते, अशा क्षेत्रांमध्ये सीपीसी जास्त असते. उदा. विमा, क्रेडिट कार्ड्स, वाहन उद्योग, इत्यादी.

याउलट ज्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा कमी असते, पर्यायाने व्यवसायाची जाहिरात फारशी करावी लागत नाही, अशा क्षेत्रांमध्ये सीपीसी कमी असते. उदा. मनोरंजन, फॅशन, बागकाम, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इत्यादी.

याशिवाय आपण कोणत्या देशात/भागात व्यवसायाचे विपणन करतो, तेथील लोकांचे दरडोई उत्पन्न व खरेदी करण्याची ऐपत, व्यावसायिक स्पर्धेची तीव्रता, आणि सण/हंगाम इत्यादी गोष्टींनुसारही सीपीसी दरात बदल होत असतो.

जाहिरातीतून मिळणाऱ्या महसुलाचा काही वाटा गुगल ॲडसेन्स प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत संकेतस्थळांच्या प्रकाशकांना देत असते.

त्यामुळे आपण जर गुगल ॲडसेन्सद्वारे दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींचा आपल्या संकेतस्थळाच्या कमाईसाठी वापर करणार असाल, तर कोणत्या विषयांत आणि देशांत जास्त सीपीसी मिळते, यानुसार कीवर्ड्सची निवड करणे फायदेशीर ठरेल.

परंतु लक्षात घ्या की एसईओ टूल्सद्वारे दाखविला जाणारा जाहिरात दर प्रत्येक वेळी मिळेलच असे नाही.

तसेच ज्या कंपन्या आपल्या वस्तू किंवा सेवेच्या विपणनासाठी जास्त जाहिरात दर (सीपीसी) गुगल जाहिरात प्लॅटफॉर्मवर द्यायला तयार असतात, अशा कंपन्यांसाठी संलग्न विपणक (Affiliate Marketer) म्हणून काम केल्यास जास्त कमाई होऊ शकते.

६. SERP वैशिष्ट्ये (SERP Features)

गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेजवरील पारंपरिक ऑरगॅनिक सर्च रिझल्ट्सखेरीज इतर रिझल्ट्सना SERP वैशिष्ट्ये म्हणतात.

यांमध्ये फिचर्ड स्निपेट (Featured Snippet), रिव्ह्यूज (Reviews), साईट लिंक्स (Site Links), इमेज पॅक्स (Image Packs), लोकल पॅक (Local Pack), कॅरोसेल (Carousel), व्हिडिओ कॅरोसेल (Video Carousel), पीपल ऑल्सो आस्क (People Also Ask), एफएक्यू (FAQ), नॉलेज पॅनेल (Knowledge Pnael), आणि शॉपिंग ॲड्स (Shopping Ads) इत्यादींचा समावेश होतो.

कीवर्ड्ससाठी गुगल द्वारे दाखवल्या जाणाऱ्या SERP वैशिष्ट्यांचा अभ्यास करून एखादा कीवर्ड आपल्या एसईओ मोहिमेमध्ये वापरायचा की नाही, वापरल्यास संबंधित SERP वैशिष्ट्ये तसेच पारंपरिक ऑरगॅनिक सर्च रिझल्ट्समध्ये टॉप रँकिंग मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील, आणि कोणत्या SERP वैशिष्ट्यांसाठी आपली वेबसाईट रँक करणे फायदेशीर आहे याचा अंदाज बांधता येतो.

मराठी ब्लॉगसाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे? (How to do Keyword Research in Marathi)

आपल्या संकेतस्थळावर कमाईसाठी आपण जाहिराती, संलग्न विपणन, वस्तू व सेवांची विक्री, प्रायोजकता, इत्यादींपैकी कोणत्या धोरणांचा वापर करता यानुसार योग्य कीवर्ड्स निवडणे अत्यंत आवश्यक असते.  

समजा, जर जाहिराती (उदा. गुगल ॲडसेन्स) हा आपल्या ब्लॉगच्या कमाईचा प्रमुख स्त्रोत असेल, तर आपल्याला जास्त प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) व सीपीसी (cost per click) असणारे कीवर्ड्स निवडावे लागतील. 

याउलट जर संलग्न विपणन हा आपल्या ब्लॉगच्या कमाईचा प्रमुख स्त्रोत असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त व्यावसायिक कीवर्ड्स शोधण्यावर भर द्यावा लागेल. याशिवाय शोधकर्त्याचा हेतू (searcher’s intent) जाणून घेणेही महत्त्वाचे ठरेल, जेणेकरून महसुलामध्ये वाढ होईल.

१. आपला विषय निश्चित करणे

कीवर्ड रिसर्च करण्यापूर्वी आपण कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिणार आहेत किंवा आपला ऑनलाईन व्यवसाय कोणत्या विषयाशी सुसंगत आहे, हे निश्चित करा.

उदा. क्रीडा, प्रवास, अन्नपदार्थ, राजकारण, नोकरी, शिक्षण, मनोरंजन, फॅशन, कृषी, तंत्रज्ञान, इत्यादी.

२. सीड कीवर्ड्स शोधणे

विषय सुनिश्चित झाला की पुढची पायरी म्हणजे सीड कीवर्ड्स शोधणे.

यासाठी काही काळ विचारमंथन करून आपण निश्चित केलेल्या विषयामधील लोकप्रिय/वारंवार वापरल्या जाणाऱ्या शब्दांची यादी करा.

सामान्यतः सीड कीवर्ड्स हे कमी लांबीचे परंतु जास्त प्रतिमाह शोधसंख्या असणारे शब्द किंवा शब्दसमूह असतात.

मराठीमधील सीड कीवर्ड्स शोधण्यासाठी आपण गूगल ट्रेंड्स, क्वेशन हब (हिंदी), ट्विटर ट्रेंड्स, लोकप्रिय सोशल मीडिया चॅनेल्स, इत्यादींचा वापर करू शकता.

याशिवाय गूगल वर आपला विषय सर्च केल्यासही चांगले सीड कीवर्ड्स सापडतील.

३. व्यावसायिक रणनीती (Monetization Strategy) ठरवणे

संकेतस्थळाद्वारे कमाई करण्यासाठी आपण जाहिराती (उदा. गुगल ॲडसेन्स), संलग्न विपणन, वस्तू/सेवांची विक्री, किंवा ब्रँड पार्टनरशिप्स यांपैकी एक किंवा अधिक पद्धतींचा वापर करता, यानुसार योग्य कीवर्ड्सची निवड करणे आवश्यक असते.

कारण जाहिरातींद्वारे कमाई करण्यासाठी जास्त प्रतिमाह शोधसंख्या व सीपीसी, परंतु कमी स्पर्धा असणारे कीवर्ड्स उत्तम मानले जातात.

संलग्न विपणन आणि वस्तू/सेवांची विक्री करून कमाई करण्यासाठी व्यावसायिक हेतू (commercial intent) असणारे, कमी ते मध्यम स्पर्धा असणारे कीवर्ड्स निवडणे जास्त फायदेशीर ठरते.

मला विचाराल तर, कमाईच्या एकाच साधनावर अवलंबून न राहता शक्य असेल तिथे एकापेक्षा अधिक कमाईच्या पद्धतींचा ( monetization strategies) वापर करणे व त्यानुसार कीवर्ड्स शोधणे शहाणपणाचे ठरते.

४. सीड कीवर्ड संबंधित ब्रॉड कीवर्ड्स शोधणे

यापुढील पायरी आहे, आपण निश्चित केलेल्या सीड कीवर्ड संबंधित ब्रॉड कीवर्ड्स शोधणे.

समजा, आपला फूड ब्लॉग सुरु करण्याचा मानस आहे आणि अन्नपदार्थ (food) हा सीड कीवर्ड असेल, तर स्वयंपाकघरातील उपकरणे (kitchen appliances), रेसिपी (recipe) इत्यादी ब्रॉड कीवर्ड्स आपल्या सीड कीवर्डसोबत अत्यंत सुसंगत आहे.

५. लॉंग टेल कीवर्ड्स शोधणे.

ब्रॉड कीवर्ड्स निश्चित झाले की त्यांसंबंधित मिड-टेल आणि लॉंग-टेल कीवर्ड्स शोधणे सुरुवातीच्या काळात अत्यंत गरजेचे असते.

कारण बहुतांश लॉंग-टेल कीवर्ड्ससाठी प्रतिमाह शोधसंख्या कमी असल्यामुळे स्पर्धा कमी असते.

असे कीवर्ड्स आपल्या एसईओ मोहिमेमध्ये समाविष्ट केल्यास सर्च इंजिनमध्ये टॉप रँकिंग तसेच टार्गेटेड ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवणे शक्य असते.

जर आपण संलग्न विपणन किंवा वस्तू/सेवांची विक्री संबंधित व्यावसायिक संकेतस्थळांना योग्य लॉंग टेल कीवर्ड्स टार्गेट करून कामे करणे शक्य असते.

बाजारात उपलब्ध असणारी कीवर्ड रिसर्च टूल्स आपण शोधलेल्या ब्रॉड कीवर्ड्सशी निगडित लॉंग टेल कीवर्ड्सची यादीच आपल्याला देतात.

याशिवाय कीवर्ड मॉडीफायर्सचा (keyword modifiers) वापर करूनही लॉंग टेल कीवर्ड्स शोधता येतात.

कीवर्ड मॉडीफायर्स हे सामान्यतः विशेषणे, क्रियाविशेषणे, शॉपिंग टर्म्स, संबंधित बाजारातील प्रचलित शब्द या स्वरूपात असतात.

उदा. कॅमेरा हा शॉर्ट-टेल कीवर्ड आपण निवडला असेल तर बेस्ट, मिररलेस, ५०००० मध्ये इत्यादी कीवर्ड मॉडीफायर्स वापरून बेस्ट मिररलेस कॅमेरा ५०००० मध्ये हा उत्तम लॉंग-टेल कीवर्ड होऊ शकतो.

Without Keyword Modifiers Keyword-camera
Without Keyword Modifiers Keyword-camera
With Keyword Modifiers Keyword-best mirrorless camera under 50000
With Keyword Modifiers Keyword-best mirrorless camera under 50000

शिवाय या कीवर्डद्वारे शोधकर्त्याला कोणता परिणाम अपेक्षित आहे याबाबत अचूक अंदाज बांधणे शक्य होते.

६. महत्त्वाचे कीवर्ड मेट्रिक्स तपासणे

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करत असताना आपण निवडलेल्या कीवर्ड्सची प्रतिमाह शोधसंख्या, स्पर्धा, काळ, सीपीसी, इत्यादी मेट्रिक्स तपासणे अत्यंत आवश्यक असते.

जेणेकरून आपण ठरवलेल्या व्यावसायिक रणनीतीनुसार योग्य कीवर्ड्स निवडणे आपल्याला शक्य होते.

मोफत किंवा प्रीमियम कीवर्ड रिसर्च टूल्स चा वापर करून महत्त्वाचे कीवर्ड मेट्रिक्स तपासता येतात. उदा. गुगल कीवर्ड प्लॅनर, कीवर्डटूल.आयओ, सेमरश, एएचरफ्स

Keyword Research In Marathi with Google Keyword Planner
Keyword Research In Marathi with Google Keyword Planner

७. एसईओ स्पर्धक संकेतस्थळाचे कीवर्ड ॲनालिसिस (Competitor Keyword Analysis for SEO)

समजा, जर आपल्या विषयाला सुसंगत, परंतु कमी स्पर्धा व जास्त प्रतिमाह शोधसंख्या असणारे व्यावसायिक कीवर्ड्स आयते मिळाले तर किती बरे होईल?

एसईओ स्पर्धक संकेतस्थळाचे ऑरगॅनिक कीवर्ड ॲनालिसिस करून (ही गोष्ट शक्य आहे.

यासाठी सेमरश किंवा एएचरफ्स इत्यादी कीवर्ड रिसर्च टूल्समध्ये आपल्या स्पर्धक संकेतस्थळाचे डोमेन किंवा विशिष्ट युआरएल सर्च करून संबंधित स्पर्धक संकेतस्थळ ज्या कीवर्ड्ससाठी सर्च इंजिनमध्ये रँक झाले आहे, असे कीवर्ड्स शोधता येतात.

Ahrefs - Competitor Keyword Analysis for SEO
Ahrefs – Competitor Keyword Analysis for SEO

रँक झालेले कीवर्ड्स, रिलेटेड मेट्रिक्स, SERP वैशिष्ट्ये, एकंदरीत नफा होण्याची शक्यता इत्यादी बाबींचा अभ्यास करून त्या कीवर्ड्सपैकी काही किंवा सर्व कीवर्ड्स आपण आपल्या एसईओ मोहिमेमध्ये टार्गेट करू शकता.

याशिवाय कीवर्ड गॅप ॲनालिसिस प्रक्रियेमध्ये आपले स्पर्धक संकेतस्थळ ज्या कीवर्ड्ससाठी सर्च इंजिनमध्ये रँक झाले आहे, परंतु आपले संकेतस्थळ रँक झाले नाही असेही कीवर्ड्स चुटकीसरशी शोधता येतात.

अर्थात त्या कीवर्ड्ससाठी आपले संकेतस्थळ किंवा वेबपेज रँक होण्यासाठी उत्तम दर्जाचा मजकूर लिहीणे, योग्य प्रकारे ऑन-पेज एसईओ करणे, बॅकलिंक्स व इतर ऑफ-पेज सिग्नल्स मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, तांत्रिक बाजू मजबूत करणे, इत्यादी गोष्टींकडेही विशेष लक्ष द्यावे लागते.

८. सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे वर्गीकरण करणे

यापूर्वीच्या लेखामध्ये आपण सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे निरनिराळे प्रकार कसे पडतात याविषयी माहिती घेतली. त्याचप्रमाणे आपण शोधलेल्या सर्व कीवर्ड्सचे वर्गीकरण करा.

१. इन्फर्मेशनल कीवर्ड: सँडविच कसा बनवावा
२. नेव्हिगेशनल कीवर्ड: प्रेस्टिज सँडविच मेकर
३. कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड: प्रेस्टिज वि. बजाज सँडविच मेकर
४. ट्रान्झॅक्शनल कीवर्ड: प्रेस्टिज सँडविच मेकर किंमत

इन्फर्मेशनल कीवर्ड्स प्रामुख्याने जाहिरातींद्वारे कमाई करणारी संकेतस्थळे वापरतात. नेव्हिगेशनल व ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स ब्रँड वेबसाईट्स, तर कमर्शिअल इन्वेस्टीगेशन व ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स संलग्न विपणनाद्वारे कमाई करणाऱ्या वेबसाईट्स त्यांच्या मजकुरात वापरतात.

निरनिराळे सर्च इंटेंट असणाऱ्या कीवर्ड्सचे योग्य मिश्रण केल्यास आपल्याला ऑरगॅनिक रँकिंग व ट्रॅफिकमध्ये सकारात्मक बदल जाणवेल.

९. मॅन्युअल रिसर्च

बहुतांश कीवर्ड रिसर्च टूल्स अगोदर गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याआधारे आपण शोधत असलेल्या कीवर्ड्स संबंधित मेट्रिक्स प्रदर्शित करत असतात.

तरीही ही माहिती व कीवर्ड मेट्रिक्स १००% अचूक असणे शक्य नसते.

त्यामुळे फक्त कीवर्ड रिसर्च टूल्सवर विसंबून न राहता मॅन्युअल रिसर्च करणे खूप आवश्यक असते.

यामध्ये आपण खालील गोष्टी नक्की तपासून पहा.

  • आपण सर्च केलेल्या कीवर्ड्ससाठी एकूण सर्च रिझल्ट्सची संख्या.
  • सर्च ऑपरेटर्सचा वापर केल्यानंतर आपण सर्च केलेल्या कीवर्ड्ससाठी एकूण सर्च रिझल्ट्सची संख्या. उदा. allintitle:”your keyword” किंवा allinurl:”your keyword” इत्यादी.
  • आपण सर्च केलेल्या कीवर्ड्ससाठी ऑटोकंप्लिट कीवर्ड्स, रिलेटेड कीवर्ड्स, सर्च ॲड्समधील कीवर्ड्स.
  • SERP वैशिष्ट्ये. उदा. इमेज पॅक किंवा व्हिडिओ पॅक असेल तर आपण विझ्युअल कंटेन्ट निर्मिती व सर्वोत्तमीकरणाकडे विशेष लक्ष द्यावे.
  • आपण टार्गेट करू इच्छित असलेल्या कीवर्ड्ससाठी सर्च रिझल्ट्समध्ये दर्शवलेल्या स्पर्धक संकेतस्थळांची ऑथॉरिटी व इतर मेट्रिक्स. यासाठी आपण मोझबार, एसईओ टूलबार बाय एएचरफ्स इत्यादी ब्राऊझर एक्सटेंशन्स/प्लगिन्सचा वापर करू शकता.
  • सर्च रिझल्ट्समध्ये टॉपला रँक होणाऱ्या वेबसाइट्सच्या कंटेंटची गुणवत्ता. उदा. कंटेंटची लांबी, कीवर्ड स्टफिंग, शोधकर्त्याच्या हेतूचे समाधान होईल का याबाबत अवलोकन, नक्कल/कॉपी केलेल्या मजकुराचे गुणोत्तर, विझ्युअल कंटेन्ट व त्याबाबत माहिती, संबंधित लेख व इंटरलिंकींग, ऑफ-पेज सिग्नल्स, इत्यादी.

१०. नवीन/अनोळखी कीवर्ड्स

अगोदरच जास्त प्रतिमाह शोधसंख्या असणारे फायदेशीर कीवर्ड्स शोधून त्यासंबंधित मजकूर प्रकाशित करणे ही नक्कीच सुंदर कल्पना आहे.

परंतु कीवर्ड रिसर्च टूल्सच्या डेटाबेसमध्ये नसणारे नवीन कीवर्ड्स सुद्धा संकेतस्थळासाठी टार्गेटेड ट्रॅफिक मिळवण्याकरिता खूप उपयुक्त ठरू शकतात.

क्वोरासारख्या प्रश्नोत्तराच्या वेबसाईट्स, समाजमाध्यमे, व्हायरल कंटेंट, ट्रेंडींग सर्चेस, बातम्या इत्यादींचे अवलोकन करून आपण नवीन कीवर्ड्स शोधू शकता.

Bharat E-Market Google Top Stories
Bharat E-Market-Google Top Stories

११. सर्च कन्सोल

कोणत्याही संकेतस्थळ किंवा ब्लॉगवर कमी स्पर्धा असणारे कीवर्ड्स टार्गेट करून योग्यप्रकारे एसईओ केल्यास काही कालावधीनंतर आपले कीवर्ड्स सर्च इंजिनमध्ये रँक होण्यास सुरुवात होते.

हे कीवर्ड्स आपल्याला गुगल सर्च कन्सोल मध्ये पाहता येतात.

त्याशिवाय आपण टार्गेट केलेल्या कीवर्ड्स व्यतिरिक्त रँक झालेल्या अन्य कीवर्ड्सची यादीही आपल्याला पाहता येते.

या यादीमधील योग्य कीवर्ड्स आपल्या संकेतस्थळावर समाविष्ट करून जास्त ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवणे शक्य असते.

सारांश

या लेखात आपण एसईओ कीवर्ड रिसर्च प्रक्रियेमधील महत्त्वाचे मेट्रिक्स आणि मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे (How to do keyword research in Marathi) यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

हा लेख आपल्याला आवडला असेल तर टिपण्णीद्वारे आम्हांला कळवा तसेच आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.

कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड्सचे प्रकार कोणते?

What is Keyword in Marathi, What is Keyword in SEO, कीवर्ड म्हणजे काय,

कीवर्ड म्हणजे काय? (What is Keyword in Marathi)

जेव्हा एखादी व्यक्ती गुगल, बिंग, किंवा अन्य कोणत्याही सर्च इंजिनवर माहिती शोधण्याच्या, प्रश्नाचे उत्तर मिळवण्याच्या, अथवा वस्तू/सेवा खरेदी करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द किंवा शब्दसमूह सर्च बॉक्समध्ये टाईप करते किंवा व्हॉइस सर्चसाठी उच्चारते, त्या शब्दास किंवा शब्दसमूहास सर्च क्वेरी असे म्हणतात. 

सर्च क्वेरी म्हणून वापरलेले शब्द, शब्दसमूह किंवा संबंधित शब्द आपल्या संकेतस्थळावरील मजकुरात वापरले  जातात, अशा शब्दांना एसईओ च्या भाषेत कीवर्ड्स (keywords) असे म्हणतात. 

कीवर्ड हा एक शब्द, शब्दसमूह, वाक्य, अथवा प्रश्न या स्वरूपात असू शकतो. अनेक शब्द किंवा शब्दसमूह (phrase) वापरलेले असले तरी सामान्यतः त्यास कीफ्रेज ऐवजी कीवर्ड असेच संबोधले जाते.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये कीवर्ड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर आपले संकेतस्थळ/ब्लॉग सर्च इंजिनमध्ये रँक करायचे असेल, जास्तीत जास्त ऑरगॅनिक ट्रॅफिक (रहदारी) मिळवायचे असेल, आणि ऑनलाईन विक्री वाढवायची असेल, तर योग्य कीवर्ड्स शोधून आपल्या मजकुरात समाविष्ट करणे आवश्यक असते.

कीवर्ड स्टफिंग म्हणजे काय? (What is Keyword Stuffing)

कीवर्ड स्टफिंग म्हणजे अनावश्यक शब्द (keywords) किंवा संख्या (numbers) अतिरिक्त प्रमाणात वापरून आपल्या वेबपेजच्या सर्च इंजिन रँकिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणे.

कीवर्ड स्टफिंगसाठी प्रामुख्याने खालील तंत्रांचा वापर केला जातो.

  • मजकुरात कीवर्ड्स व संख्या विनाकारण पुनःपुन्हा वापरणे.
  • कोणताही संदर्भ नसलेले कीवर्ड्स मजकुरात समाविष्ट करणे.
  • सांख्यिक माहिती कोणत्याही अतिरिक्त उपयुक्ततेशिवाय मजकुरात समाविष्ट करणे. उदा. दूरध्वनी क्रमांक यादी, परीक्षा क्रमांक यादी, इत्यादी.
  • ज्या शहर किंवा राज्यांसाठी वेबपेज रँक करायचे त्या शहर किंवा राज्यांची यादी वेबपेजवर वारंवार समाविष्ट करणे.

सामान्यतः मजकुरात कीवर्ड्स योग्य ठिकाणी व योग्य प्रमाणात वापरणे महत्त्वाचे असते.

अतिरिक्त प्रमाणात कीवर्ड्स वापरल्यामुळे (keyword stuffing) मजकूर रटाळ व कंटाळवाणा वाटू शकतो.

परिणामतः वाचक आपल्या वेबसाईटपासून दूर जाऊ शकतात किंवा ब्लॉगला अनफॉलो करू शकतात. शिवाय आपले संकेतस्थळ, ब्लॉग, किंवा त्यावरील मजकूर शेअर होण्याचे प्रमाणही घटू शकते.

या गोष्टी टाळण्यासाठी काहीजण अतिरिक्त कीवर्ड्स वाचकांपासून लपवून ठेवतात. उदा. लेखातील फॉन्ट व पार्श्वभूमीसाठी (content background) साठी एकाच रंगाचा वापर करणे, मेटा टॅग्ज किंवा इमेज अल्टरनेटिव्ह टेक्स्ट (alt text) मध्ये कीवर्ड्सचा अतिरेकी वापर करणे.

कीवर्ड स्टफिंगमुळे काही प्रमाणात फायदा होत असेलसुद्धा, परंतु दीर्घकालीन फार नुकसान होण्याची दाट शक्यता असते. उदा. वेबसाईटच्या गुगल रँकिंगवर नकारात्मक परिणाम होणे.

सर्वसाधारणपणे कीवर्ड डेन्सिटी ०.५% ते २% असावी, जेणेकरून कीवर्ड स्टफिंगची समस्या उद्भवणार नाही.

कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय? (What is Keyword Density)

कीवर्ड डेन्सिटी म्हणजे एखादा शब्द एकूण मजकुरात किती प्रमाणात वापरला गेला याची टक्केवारी.

कीवर्ड डेन्सिटी = (कीवर्डमधील शब्दसंख्या x कीवर्डची वारंवारता)/मजकुरातील एकूण शब्दसंख्या

पारंपरिक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये २% पर्यंत कीवर्ड डेन्सिटी योग्य मानली जाते.

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व मशीन लर्निंग (ML) आधारित नैसर्गिक भाषा प्रक्रियेसारख्या (NLP) अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्च इंजिनद्वारे केला जात असल्यामुळे कीवर्ड डेन्सिटीऐवजी सर्च इंटेंट हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे कीवर्ड डेन्सिटी योग्य प्रमाणात हवीच, पण त्यासोबतच आपल्या संकेतस्थळावरील मजकूर माहितीपर, उच्च दर्जाचा, वापरकर्त्यांना उपयुक्त आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शोधकर्त्याच्या हेतूची पूर्तता करणारा असावा.

आणखी वाचा: ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा?

कीवर्ड्सचे प्रकार कोणते? (Types of Keywords)

कीवर्ड्सची लांबी, विपणन प्रक्रियेतील कीवर्ड्सची भूमिका, आणि ऑन-पेज ऑप्टिमायझेशनमधील कीवर्ड्सचे महत्त्व यांनुसार कीवर्ड्सचे निरनिराळे प्रकार पडतात.

योग्य ठिकाणी योग्य प्रकारचे कीवर्ड्स वापरल्यामुळे आपल्या मजकुराची गुणवत्ता वाढते, तसेच ऑरगॅनिक ट्रॅफिक, लीड्स, व विक्री यांमध्येही वाढ होऊ शकते.

लांबीनुसार कीवर्ड्सचे प्रकार

सर्वांत प्रथम आपण कीवर्ड्सच्या लांबीनुसार कोणते प्रकार पडतात, याविषयी माहिती घेऊ.

१. शॉर्ट-टेल कीवर्ड्स/आखूड लांबीचे शब्द (Short-Tail Keywords)

शॉर्ट-टेल कीवर्ड्स म्हणजे सर्वसाधारणपणे रोजच्या वापरातील कीवर्ड्स.

शॉर्ट-टेल कीवर्ड्सची लांबी फक्त एक ते दोन शब्दांपर्यंत मर्यादित असते, परंतु या कीवर्ड्ससाठी होणारी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) खूप जास्त असते.

शॉर्ट-टेल कीवर्ड्सची लोकप्रियता व प्रतिमाह शोधसंख्या जास्त असल्यामुळे, या कीवर्ड्ससाठी रँक करताना मोठया स्पर्धेचा सामना करावा लागतो.

जर आपण नवीन संकेतस्थळ किंवा ब्लॉग सुरु केला असेल, तर सुरुवातीचे काही महिने जास्त स्पर्धा असणारे शॉर्ट-टेल कीवर्ड्स आपल्या मजकुरात टार्गेट करणे शक्यतो टाळावे.

कालांतराने आपण शॉर्ट-टेल कीवर्ड्ससाठी आपली वेबसाईट रँक करण्याबाबत विचार करू शकता.

उदा. smartphone, running shoes, इत्यादी.

२. मिड-टेल कीवर्ड्स/मध्यम लांबीचे शब्द (Mid-Tail Keywords)

मिड-टेल कीवर्ड्समधून शॉर्ट-टेल कीवर्ड्सपेक्षा जास्त माहिती मिळते. त्यामुळे शोधकर्त्याला कोणता परिणाम अपेक्षित आहे याचा सर्वसाधारण अंदाज बांधणे सोपे होते.

मिड-टेल कीवर्ड्समध्ये दोन ते तीन शब्दांचा समावेश होतो.

सामान्यतः मिड-टेल कीवर्ड्ससाठी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) शॉर्ट-टेल कीवर्ड्सपेक्षा कमी असते, परंतु त्याप्रमाणात स्पर्धा सुद्धा कमी होते.

जर कमी स्पर्धा व जास्त प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) असणारे कीवर्ड्स आपण शोधू शकलात, तर कमी कालावधीत फार मोठ्या प्रमाणावर ऑरगॅनिक ट्रॅफिक, लीड्स, व विक्री साध्य करणे आपल्याला शक्य होईल.

उदा. smartphone under १००००, puma running shoes, इत्यादी.

३. लॉंग-टेल कीवर्ड्स/जास्त लांबीचे शब्द (Long-Tail Keywords)

लॉंग-टेल कीवर्ड्समुळे शोधकर्त्याला कोणता परिणाम अपेक्षित आहे याचा अचूक अंदाज बांधणे आपल्याला शक्य होते. लॉंग-टेल कीवर्ड्समध्ये चार किंवा अधिक शब्द असू शकतात.

सामान्यतः लॉंग-टेल कीवर्ड्ससाठी प्रतिमाह शोधसंख्या (monthly search volume) व स्पर्धा (competition) खूप कमी असल्यामुळे या कीवर्ड्ससाठी आपले संकेतस्थळ रँक करणे तुलनेने सोपे असते.

मजकुरात लॉंग-टेल कीवर्ड्स टार्गेट करण्याचा मुख्य फायदा म्हणजे जरी या कीवर्ड्सद्वारे मिळणारे ऑरगॅनिक ट्रॅफिक कमी असले, तरीही कन्व्हर्जन रेट शॉर्ट-टेल कीवर्ड्स व मिड-टेल कीवर्ड्सपेक्षा जास्त असतो.

ब्लॉगच्या विषयाला अनुरूप व्यावसायिक लॉंग-टेल कीवर्ड्स शोधून आपल्या मजकुरात योग्य प्रकारे टार्गेट केल्यास ब्लॉग महसुलामध्ये भरीव वाढ होऊ शकते.

उदा. best smartphone under १०००० rupees, puma running shoes for women, इत्यादी.

विपणन प्रक्रियेतील भूमिकेनुसार कीवर्ड्सचे प्रकार

१. बाजार श्रेणी कीवर्ड्स (Market Segmentation Keywords)

बाजार श्रेणी कीवर्ड्स उत्पादनाच्या प्रकाराशी/बाजारश्रेणीशी संबंधित असतात.

एखाद्या बाजारातील निरनिराळया प्रकारच्या उत्पादनांची, ब्रँड्सची माहिती मिळवण्यासाठी शोधकर्ते सर्वसाधारणपणे ज्या शब्दांचा वापर करतात, त्यांना बाजार श्रेणी कीवर्ड्स म्हणतात.

उदा. office chair, gaming chair, इत्यादी.

२. ग्राहक श्रेणी कीवर्ड्स (Customer Segmentation Keywords)

ग्राहक श्रेणी कीवर्ड्स ग्राहकांशी संबंधित असतात.

हे कीवर्ड्स ग्राहकांचे वय, लिंग, व्यवसाय, उत्पन्न, धर्म/वंश, खरेदीच्या सवयी इत्यादीनुसार आपली विपणन रणनीती तयार करण्यासाठी वापरले जातात.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये योग्य ग्राहक श्रेणी कीवर्ड्सचा उपयोग करून संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते.

उदा. red t-shirts for women, black t-shirts for men, automatic cars for kids under १०, इत्यादी.

३. उत्पादन कीवर्ड्स (Product Keywords)

उत्पादन कीवर्ड्स हे विशिष्ट ब्रॅंडद्वारे तयार केलेल्या उत्पादनाशी निगडित असतात.

जर आपण ब्रँड अवेअरनेस (brand awareness) किंवा लोकसंपर्क मोहीम (PR campaign) राबवत असाल, तर उत्पादन कीवर्ड्स आपल्या वेबसाईटवर, विशेषतः प्रॉडक्ट पेजवर वापरायला विसरू नका.

उदा. iphone १२, mcchicken burger इत्यादी.

४. प्रतिस्पर्धी कीवर्ड्स (Competitors Keywords)

प्रतिस्पर्धी कीवर्ड्स आपल्या प्रतिस्पर्धी व्यवसाय किंवा त्यांच्या एखाद्या ब्रँडशी संबंधित असतात.

प्रतिस्पर्धी कीवर्ड्सचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्धी व्यवसाय आणि त्यांच्या ब्रँड, उत्पादने, सेवा, व लक्ष्यित ग्राहकांविषयी अधिक माहिती गोळा करणे शक्य होते.

या माहितीचा वापर करून आपण अधिक मजबूत व्यावसायिक रणनीती, विशेषतः एसईओ व जाहिरात रणनीती (SEO and PPC strategy) तयार करू शकता.उदा. रिअलमी या ब्रँडसाठी, redmi budget smartphones किंवा mi android tv इत्यादी प्रतिस्पर्धी कीवर्ड्स असू शकतात.

५. भू-लक्ष्यित कीवर्ड्स (Geo Targeted Keywords)

भू-लक्ष्यित कीवर्ड्स एखाद्या भौगोलिक स्थानाशी निगडित असतात.

याप्रकारचे कीवर्ड्स प्रामुख्याने बहुस्थानीय व्यवसाय, निर्देशिका संकेतस्थळे (directory websites), आणि लोकल एसईओमध्ये वापरले जातात.

उदा. cake shop near me, gaming cafe in pimpri, rto in pune, kolhapur dmart, इत्यादी.

सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे प्रकार

या भागात सर्च इंटेंट अर्थात शोधकर्त्याच्या हेतूनुसार कीवर्ड्सचे प्रकार कोणते याविषयी माहिती घेऊ. सर्च इंटेंटनुसार कीवर्ड्सचे प्रमुख चार प्रकार पडतात.

१. इन्फर्मेशनल कीवर्ड्स (Informational Keywords)

ज्या कीवर्ड्समागे एखादी व्यक्ती, वस्तू, घटना, इत्यादींबाबत माहिती मिळवण्याचा उद्देश असतो, त्यांना इन्फर्मेशनल कीवर्ड्स असे म्हणतात.

या कीवर्ड्स साठी मिळणारे उत्तर एका शब्दात किंवा संपूर्ण लेखाच्या स्वरूपात असू शकते.

इन्फर्मेशनल कीवर्ड्समध्ये प्रामुख्याने प्रश्नार्थक शब्द आणि सामान्यनाम/विशेषनामांचा वापर केलेला असतो.

उदा. who is the prime minister of india, blogging, coronavirus symptoms, इत्यादी.

२. नेव्हिगेशनल कीवर्ड्स (Navaigational Keywords)

नेव्हिगेशनल कीवर्ड्स एखादी विशिष्ट वेबसाईट किंवा ब्रँड यांचा शोध घेण्यासाठी वापरले जातात.

ज्या वेबसाईट्स खूप कालावधीपासून सर्च इंजिनमध्ये इंडेक्स आहेत व त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे, अशा वेबसाईट्सचा संपूर्ण पत्ता लिहीत बसण्यापेक्षा नेव्हिगेशनल कीवर्ड्स वापरून सहजपणे संबंधित वेबसाईट्सवर पोहोचणे शक्य असते.

नेव्हिगेशनल कीवर्ड्सना ब्रँडेड कीवर्ड्स असेसुद्धा म्हटले जाते.

उदा. instagram, pizzahut, amazon, इत्यादी.

३. कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स (Commercial Investigation Keywords)

कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स कोणतीही वस्तू अथवा सेवा विकत घेण्यापूर्वी आपल्या निर्णयाचे अवलोकन करण्यासाठी वापरले जातात.

कमर्शिअल इन्वेस्टीगेशन कीवर्ड्स वापरणाऱ्या शोधकर्त्यास योग्य मार्गदर्शन केल्यास कन्व्हर्जन रेट मध्ये भरघोस वाढ होऊ शकते.

अशा कीवर्ड्समध्ये तुलनात्मक, विश्लेषणात्मक शब्द प्रामुख्याने वापरले जातात.

उदा. redmi mi 10i vs. oneplus nord, best fitness band in india, top tourist places in maharashtra, canon 80d review, इत्यादी.

४. ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स (Transactional Keywords)

ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्स वापरणाऱ्या शोधकर्त्याने आपल्याला कोणती वस्तू/सेवा विकत घ्यायचे आहे, हे निश्चित केलेले असते.

फारतर ते किंमत, कुपन किंवा सूट यांसारखे कीवर्ड मॉडीफायर्स वापरून अपेक्षित वस्तू/सेवा स्वस्तात कशी मिळेल याचा प्रयत्न करू शकतात.

संभाव्य महसूल लक्षात घेता लोकप्रिय ट्रान्झॅक्शनल कीवर्ड्ससाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. अशा कीवर्ड्ससाठी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग रँक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

उदा. buy apple watch, cheap air fryer on amazon, elementor pro discount coupon, hyperx cloud 2 price, इत्यादी.

लेखातील भूमिकेनुसार /ऑन-पेज ऑप्टिमायझेशननुसार कीवर्ड्सचे प्रकार

या भागात लेखातील भूमिकेनुसार/ऑन-पेज ऑप्टिमायझेशननुसार कीवर्ड्सचे प्रकार कोणते, याबाबत माहिती घेऊ.

१. प्राथमिक कीवर्ड (Primary Keyword)

पारंपरिक एसईओ प्रक्रियेमध्ये प्राथमिक कीवर्डला खूप महत्त्व दिले जाते.

त्यामुळे प्राथमिक कीवर्ड शीर्षक, परमालिंक, मेटा डिस्क्रिप्शन, उपशीर्षके, मजकुराचा महत्त्वाचा भाग, इमेज अल्ट टेक्स्ट इत्यादी ठिकाणी वापरला जातो.

सर्वसाधारणपणे प्राथमिक कीवर्डची डेन्सिटी ०.५% ते २% असावी असे गृहीतक आहे.

एसईओ प्रक्रियेमध्ये प्राथमिक कीवर्डसाठी प्रतिमाह शोधसंख्या व कन्व्हर्जन रेट जास्तीत जास्त असावा आणि स्पर्धा तुलनात्मकदृष्ट्या कमी असावी, जेणेकरून संबंधित कीवर्ड जलद रँक होईल व खूप ऑरगॅनिक ट्रॅफिक मिळवणे शक्य होईल.

जर आपल्याला लीड जनरेशन किंवा वस्तू/सेवांची विक्री अपेक्षित असेल, तर व्यावसायिक (खरेदी/विक्री संबंधित) कीवर्ड्स टार्गेट करणे आवश्यक असते.

२. दुय्यम कीवर्ड्स (Secondary Keywords)

प्राथमिक कीवर्डशी संबंधित कीवर्ड्सना (related keywords) दुय्यम कीवर्ड्स असे संबोधले जाते.

एकाच लेखात एक किंवा अधिक दुय्यम कीवर्ड्स टार्गेट केले जाऊ शकतात.

दुय्यम कीवर्ड्सची प्रतिमाह शोधसंख्या, स्पर्धा, सीपीसी (cost per click) प्राथमिक कीवर्डपेक्षा कमी-जास्त असू शकते.

वारंवार प्राथमिक कीवर्ड वापरण्याऐवजी दुय्यम कीवर्ड्स वापरल्यामुळे मजकूर नीरस वाटत नाही.

आजमितीला गुगल कीवर्ड प्लॅनर, सेमरश, कीवर्डटूल.आयओ, आणि गुगल ऑटोकंप्लिटसारख्या साधनांचा वापर करून दुय्यम/संबंधित कीवर्ड्स शोधणे सहज शक्य आहे.

३. एलएसआई कीवर्ड्स (LSI Keywords)

एलएसआई कीवर्ड्स (Latent Semantic Indexing Keywords) म्हणजे सुप्तपणे संदर्भ साधणारे शब्द/शब्दार्थ.

उदा. apple या शब्दाशी fruit, jam, cyder vinegar, red यासोबतच iPhone, Watch, iCloud, smartphone, selfie हे शब्दसुद्धा संबंधित आहेत.

परंतु apple हे फळ समजून मजकूर लिहिला असेल तर fruit, jam, cyder vinegar, red हे शब्द जास्त सुसंगत वाटतात.

त्याचप्रमाणे apple ही तंत्रज्ञान कंपनी आहे असे विचारात घेऊन मजकूर लिहिला असेल तर iPhone, Watch, iCloud, smartphone, selfie हे शब्द जास्त सुसंगत वाटतात.

एकूणच काय तर एका शब्दाशी संबंधित/सुप्तपणे संदर्भ साधणारे शब्दार्थ वापरून मजकूरातील एखाद्या घटकांबद्दल कल्पना येऊ शकते.

हाच एलएसआई कीवर्ड्स या संकल्पेनेचा गाभा आहे.

गुगल सार्वजनिकरित्या हा सिद्धांत मानायला नकार देते.

https://twitter.com/JohnMu/status/1156293862681468929

काहीही असो, एलएसआई कीवर्ड्स आपला मजकूर अधिक अर्थपूर्ण व वाचनीय बनवतात हे मात्र नक्की.

सारांश

या लेखात आपण कीवर्ड म्हणजे काय, कीवर्ड स्टफिंग, कीवर्ड डेन्सिटी, आणि कीवर्ड्सचे निरनिराळे प्रकार यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. हा लेख आपल्याला आवडला असेल तर टिपण्णीद्वारे आम्हांला कळवा तसेच आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.

आणखी वाचा: मराठी संकेतस्थळासाठी कीवर्ड रिसर्च कसे करावे?

वेब होस्टिंग म्हणजे काय? योग्य वेब होस्टिंग सेवा कशी निवडावी?

What is Web Hosting in Marathi (वेब होस्टिंग म्हणजे काय)

या लेखात आपण वेब होस्टिंग म्हणजे काय? (What is Web Hosting in Marathi) वेब होस्टिंगचे प्रकार कोणते? (Types of Web Hosting) आणि वेब होस्टिंग खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? इत्यादी गोष्टींबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत.

सर्वांत प्रथम आपण वेब होस्टिंग म्हणजे काय हे पाहू.

वेब होस्टिंग म्हणजे काय (What is Web Hosting in Marathi)

कोणतेही संकेतस्थळ किंवा ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला इंटरनेटवर मजकूर, प्रतिमा, व्हिडिओज किंवा अन्य स्वरूपातील माहिती शेअर करावी लागते.

ही माहिती इंटरनेटवर साठवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी जागा म्हणजे वेब होस्टिंग.

वेब होस्टिंग हा सुद्धा एक संगणक असतो जो आंतरजालासोबत सदैव जोडलेला असतो.

परंतु वेब होस्टिंग सेवा माहितीची साठवणूक करण्यापुरती मर्यादित नसते.

जेव्हा वापरकर्ता आपल्या वेबपेजचा पत्ता (URL) त्याच्या ब्राऊझरमध्ये टाईप करतो आणि एन्टर बटण प्रेस करतो, त्यावेळी जर वापरकर्ता इंटरनेटसोबत जोडलेला असेल, तर वेब होस्टिंगद्वारे संबंधित वेबपेज वापरकर्त्याला दाखवले जाते.

आणखी वाचा: डोमेन म्हणजे काय? डोमेनची खरेदी कशी करावी?

वेब होस्टिंगचे प्रकार कोणते? (Types of Web Hosting)

होस्टिंगचे प्रामुख्याने ४ प्रकार पडतात.
१. शेअर्ड होस्टिंग
२. क्लाऊड होस्टिंग
३. व्हीपीएस होस्टिंग
४. डेडीकेटेड होस्टिंग

१. शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting)

शेअर्ड होस्टिंग या प्रकारच्या वेब होस्टिंग सेवेमध्ये एका सर्व्हर अनेक वापरकऱ्यांमध्ये शेअर केला जातो. ज्या वेबसाईट्स तुलनेने लहान असतात किंवा ज्यांना कमी संसाधनांची (Resources) ची गरज असते, अशा वेबसाईट्स साठी शेअर्ड होस्टिंग विकत घेणे अत्यंत फायदेशीर असते.

एकच सर्व्हर अनेक वेबसाईट्सद्वारे वापरात असल्यामुळे शेअर्ड होस्टिंग सेवा कमी दरात उपलब्ध असते.

गुणवत्ता व ग्राहक सेवा यांनुसार शेअर्ड होस्टिंगची किंमत ₹५० ते ₹५०० प्रतिमाह इतकी असू शकते.

बहुतांश कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी पहिल्या खरेदीवर २०% ते ९९% इतकी सूट देतात. परंतु फक्त किंमत पाहून वेब होस्टिंग खरेदी केल्यास भविष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे हा लेख पूर्ण वाचूनच कोणती वेब होस्टिंग सेवा विकत घ्यावी याबाबत निर्णय घ्या. किंवा आम्ही शिफारस केलेल्या वेब होस्टिंग सेवा विकत घेण्याबद्दलही आपण विचार करू शकता.

आम्ही शिफारस केलेल्या शेअर्ड वेब होस्टिंग सेवा (Our Recommended Shared Hosting Services):

२. क्लाऊड होस्टिंग (Cloud Hosting)

क्लाऊड होस्टिंग साधारण शेअर्ड होस्टिंगपेक्षा थोडी वेगळी असते. या प्रकारच्या वेब होस्टिंग सेवेमध्ये आपली माहिती (Data) एकाच फिजिकल सर्व्हरवर साठवून ठेवण्याऐवजी संगणकीय क्लाऊडमध्ये साठवली जाते व इंटरनेटद्वारे ऍक्सेस केली जाते.

संगणकीय क्लाऊड हा अनेक संगणकाचा आभासी समूह असतो, जो संपूर्ण एका फिजिकल सर्व्हरप्रमाणे कार्य करतो.

सर्वसाधारण शेअर्ड होस्टिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास संबंधित सर्व्हरवरील सर्व वेबसाईट्स (संकेतस्थळे) निष्क्रिय होतात.

याउलट क्लाऊड होस्टिंग सेवेमध्ये आपली माहिती अनेक आभासी सर्व्हरवर साठवली असल्यामुळे एका व्हर्चुअल सर्व्हरमध्ये बिघाड असतानाही वेबसाईट्स सुरु ठेवता येतात.

याशिवाय जास्त वेब ट्रॅफिक (रहदारी) आल्यास आवश्यकतेनुसार अधिक संसाधने प्राप्त करणे शक्य होते.

वेब होस्टिंग व्यवस्थापन न करता येणाऱ्या व्यक्तींसाठी मॅनेज्ड क्लाऊड होस्टिंग सेवा सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.

यामध्ये वेब होस्टिंग कंपनी आपल्या वेब होस्टिंगचे व्यवस्थापन करतेच शिवाय आपल्या वेबसाईटची सुरक्षा, अपटाइम/वेग वाढवण्याची करावे लागणारे बदल, बॅकअप्स/रिस्टोअर्स इत्यादीसंबंधित तांत्रिक साहाय्य प्रदान करते.

आम्ही शिफारस केलेल्या क्लाऊड वेब होस्टिंग सेवा (Our Recommended Cloud Hosting Services):

३. व्हीपीएस होस्टिंग (VPS Hosting)

व्हीपीएस (VPS) अर्थात व्हर्चुअल प्रायव्हेट सर्व्हर. या प्रकारच्या होस्टिंग सेवेमध्ये एका सर्व्हरला ठराविक भागांमध्ये विभागले जाते व प्रत्येक वापरकर्त्याला त्याचा स्वतंत्र भाग वापरण्यास दिला जातो.

अर्थातच व्हीपीएस होस्टिंग सेवेमध्ये प्रत्येक सर्व्हरवर वापरकर्त्यांची संख्या शेअर्ड होस्टिंगच्या तुलनेने कमी असते.

ज्या संकेतस्थळांसाठी अधिक संसाधनांची आवश्यकता आहे किंवा जास्त वेब ट्रॅफिक (रहदारी) आहे, त्या संकेतस्थळांसाठी व्हीपीएस होस्टिंग वापरणे श्रेयस्कर ठरते.

सामान्यतः व्हीपीएस होस्टिंगची किंमत मात्र शेअर्ड होस्टिंगपेक्षा जास्त असते. परंतु आपल्याला डेडीकेटेड सर्व्हर रिसोर्सेस (उदा. रॅम, सीपीयु), अतिरिक्त सुरक्षा, आणि संपूर्ण नियंत्रण प्राप्त होते.

व्हीपीएस होस्टिंग सेवा विकत घेण्यासाठी ₹४०० ते ₹७५०० प्रतिमाह किंवा सर्व्हर कॉन्फिगरेशननुसार अधिक खर्च येऊ शकतो.

४. डेडीकेटेड होस्टिंग (Dedicated Hosting)

डेडीकेटेड होस्टिंग म्हणजे एक किंवा अधिक फिजिकल सर्व्हर्स एका विशिष्ट ग्राहकासाठी समर्पित केलेले असतात. प्रामुख्याने खूप रहदारी असणाऱ्या व्यावसायिक संकेतस्थळांसाठी डेडीकेटेड होस्टिंग सेवेचा वापर केला जातो.

संपूर्ण सर्व्हर विकत घेतल्यामुळे डेडीकेटेड होस्टिंगमध्ये ग्राहकांना अत्युच्च्य नियंत्रण प्राप्त होते. परंतु त्यासोबतच सर्व्हरची सुरक्षा, बॅकअप्स, व्यवस्थापन, आणि परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन या सर्वांची जबाबदारी ग्राहकाची असते.

ग्राहक आपल्या गरजेनुसार सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये बदल करू शकतो.

डेडीकेटेड होस्टिंगची किंमत मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असते. एका उत्तम प्रतीच्या डेडिकेटेड सर्व्हरसाठी महिन्याकाठी ₹१०,००० ते लाखो रुपये मोजावे लागू शकतात.

योग्य वेब होस्टिंग सेवा कशी निवडावी? (How to Choose the Right Web Hosting Service)

आपण किती माहिती आपल्या संकेतस्थळावर अपलोड करणार आहात? आपल्या संकेतस्थळाला अंदाजे किती व्यक्ती भेट देतात? आपल्याला आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टी कोणत्या? यानुसार योग्य वेब होस्टिंग सेवा निवडता येणे अत्यंत आवश्यक आहे.

या भागात आपण आपल्या वेबसाईटसाठी योग्य होस्टिंग सेवा कशी निवडावी याबाबत माहिती घेऊ.

१. उपलब्ध माहिती साठवणूक क्षमता व बँडविड्थ (Storage Space and Bandwidth)

आपण तयार करत असलेली वेबसाईट किंवा ब्लॉगचा आवाका किती असू शकेल, त्यासाठी लागणारी माहिती साठवणूक क्षमता व बँडविड्थ किती असावी याचा सारासार विचार वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यापूर्वी करावा.

याखेरीज माहिती साठवणुकीसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते हेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. उदा. एसएसडी होस्टिंग (SSD Hosting) हे पारंपरिक एचडीडी होस्टिंग (HDD Hosting) पेक्षा किमान दुप्पट वेग प्रदान करते.

आपण ऑन साईट बॅकअप्स किंवा स्टेजिंग यासारख्या फीचर्सचा वापर करणार असाल, तर संबंधित वेब होस्टिंग प्लॅन मध्ये उपलब्ध असणारी माहिती साठवणूक क्षमता पुरेशी आहे का? याचादेखील विचार करा.

लहान आणि कमी रहदारी असणाऱ्या वेबसाईट्स साठी शेअर्ड होस्टिंग चांगला पर्याय आहे ज्यामध्ये १ जीबी ते ४० जीबी इतकी माहिती साठवणूक क्षमता प्रदान केलेली असते.

अधिक रिसोर्सेस ची आवश्यकता भासल्यास आपण क्लाऊड होस्टिंग किंवा व्हीपीएस होस्टिंग चा वापर करू शकता.

लक्षात घ्या अनलिमिटेड स्टोरेज आणि बँडविड्थ ही विपणन अधिक प्रभावी करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती (marketing gimmick) आहे.

प्रत्यक्षात एका ठराविक मर्यादेनंतर अनलिमिटेड होस्टिंग वर होस्ट केलेल्या वेबसाईट्सची गती अत्यंत कमी होते.

प्रत्येक वेब होस्टिंग कंपनी अनलिमिटेड होस्टिंग सेवेबाबत फेअर युज पॉलिसी (FUP) अवलंबत असते, ज्याबाबत अधिक माहिती संबंधित वेब होस्टिंग कंपनीच्या टर्म्स आणि कंडिशन्स पेजवर किंवा एफएक्यू (FAQ) पेजवर नमूद केलेली असते.

२. वेब होस्टिंग फीचर्स (Features)

साठवणूक क्षमता आणि बॅण्डविड्थ सोडून इतर फीचर्ससुद्धा वेब होस्टिंग सेवेचा भाग असतात. ज्यामध्ये ई-मेल सेवा, बॅकअप्स, मालवेअर स्कॅनिंग व रिमूव्हल, सहज वापरता येण्याजोगे कंट्रोल पॅनेल, मोफत सुरक्षा प्रमाणपत्रे, स्क्रिप्ट/ॲप्लिकेशन ऑटो-इंस्टॉलर, पेज बिल्डर, कॅचिंग यंत्रणा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

आपण विकत घेत असलेल्या वेब होस्टिंग प्लॅनमध्ये आपल्याला वरीलपैकी कोणती फीचर्स मिळत आहे, याचा अभ्यास करूनच योग्य निर्णय घ्या.

३. स्पीड आणि परफॉर्मन्स टेक्नोलॉजीज (Speed and Peformance Technologies)

आपले संकेतस्थळ जलद लोड होणे गरजेचे असते. अन्यथा बाऊन्स रेट वाढणे, पोगोस्टीकिंग, वेबसाईट रँकिंगमध्ये उतार इत्यादी परिणामांना सामोरे जावे लागते.

वेब होस्टिंग सेवा आपल्या संकेतस्थळाच्या वेगामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

एसएसडी साठवणूक (SSD Storage), ऑपरेटिंग सिस्टम (OS) व अन्य सॉफ्टवेअर्सच्या नवीनतम आवृत्ती, जलद इंटरनेट जोडणी, कॅचिंग यंत्रणा, HTTP/२ किंवा HTTP/३, QUIC, आणि कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) द्वारे संकेतस्थळ लोड होण्याचा वेग वाढवता येतो.

ज्यावेळी आपण वेब होस्टिंग सेवा खरेदी कराल, त्यावेळी वरील मुद्द्यांचा नक्की विचार करा.

४. सुरक्षा (Security)

कोणत्याही कारणास्तव जर आपली वेबसाईट हॅक झाली किंवा त्यामध्ये संगणकीय व्हायरस आला, तर आपल्या व्यवसायाचे अतोनात नुकसान होऊ शकते.

त्यामुळे आपल्या संकेतस्थळावरील माहिती (Website Data) आणि एकूणच होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरची सुरक्षा याबाबत खात्रीशीर उपाययोजना असणाऱ्या वेब होस्टिंग सेवेचा वापर करणे केव्हाही उत्तम.

सद्यस्थितीत बहुतांश वेब होस्टिंग कंपन्या वेबसाईट्ससाठी मोफत सुरक्षा प्रमाणपत्र (SSL certificate), वेब ॲप्लिकेशन फायरवॉल, डीडीओएस संरक्षण (DDoS Protection), हॅक/मालवेअर रिमूव्हल इत्यादी सुविधा प्रदान करतात.

जे व्यवसाय आपल्या वेबसाईट्सवर ग्राहकांसाठी डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट सुविधा उपलब्ध करून देतात (विशेषतः ई-कॉमर्स वेबसाईट्स), अशा वेबसाईट्ससाठी PCI DSS (Payment Card Industry Data Security Standard) मान्यताप्राप्त असणे अनिवार्य असते. काही नामांकित वेब होस्टिंग कंपन्या ही सुविधासुद्धा उपलब्ध करून देतात.

जर संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत आपल्याला कोणतीही तडजोड करायची नसेल, तर डब्ल्यूपीएक्स होस्टिंग (WPX Hosting) आणि किंस्टा (Kinsta) हे दोन उत्तम वेब होस्टिंग पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.

५. सर्व्हर लोकेशन (Server Location)

वापरकर्ता आणि सर्व्हर यांमधील अंतर जास्त असल्यास लेटन्सी जास्त असते.

लेटन्सी म्हणजे वापरकर्त्याची क्रिया आणि सर्व्हरकडून येणारी प्रतिक्रिया यामध्ये होणारा विलंब.

खाली दिलेल्या इमेजवरून लेटन्सी म्हणजे काय याची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

What is Latency, लेटन्सी म्हणजे काय
लेटन्सी म्हणजे काय (What is Latency)

लेटन्सी कमी करण्यामध्ये नेटवर्क इन्फ्रास्टक्चरमध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानासोबतच सर्व्हर लोकेशनची महत्त्वाची भूमिका असते.

वेब होस्टिंग सर्व्हर आणि संभाव्य वापरकर्ते यांमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यासाठी आपले संकेतस्थळ जलद लोड होईल. परिणामतः वेगासंबंधित समस्या कमी करून वापरकर्त्यांना अधिक समृद्ध अनुभव देणे आपल्याला शक्य होईल.

त्यामुळे संभाव्य वापरकर्त्यांच्या जवळ सर्व्हर लोकेशन असणारी वेब होस्टिंग सेवा निवडणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

उदा. जर आपल्या वेबसाईटचे जास्तीत जास्त वापरकर्ते भारतात असतील तर मुंबई किंवा बंगलोर डेटासेंटर निवडणे अमेरिका किंवा युरोपमधील डेटासेंटर निवडण्यापेक्षा अधिक योग्य निर्णय ठरेल.

कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) द्वारे लेटन्सी काही प्रमाणात कमी करता येत असेल तरीही डायनॅमिक वेबसाईट्ससाठी वापरकर्त्यांच्या जवळ सर्व्हर लोकेशन असणे केव्हाही चांगले.

६. ग्राहक साहाय्य (Customer Support)

वेब होस्टिंग सेवा खरेदी करण्यापासून ते वेबसाईट्स संबंधित तक्रारींचे निवारण करणे यासाठी २४/७ तास ग्राहक साहाय्य (customer support) उपलब्ध असणे गरजेचे असते, विशेषतः ज्या व्यक्तींना वेब होस्टिंगच्या तांत्रिक बाजूबद्दल फारशी माहिती नसते.

याशिवाय कस्टमर सपोर्ट प्रतिनिधी आपल्याला वेबसाईट तयार करणे, सुरक्षा, परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन, वेबसाईटचे स्थलांतर (website migration), बॅकअप्स, ई-मेल सेवा, इत्यादी गोष्टींमध्ये तसेच अनपेक्षित येणाऱ्या तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी मदत करतात.

बहुतांश कंपन्या २४/७ तास जलद ग्राहक सेवा देण्याचे आश्वासन देतात, परंतु त्यांच्यापैकी मोजक्याच कंपन्या वेळेवर तांत्रिक साहाय्य प्रदान करतात.

त्यामुळे फसव्या मार्केटिंग डावपेचांना भुलून वेब होस्टिंग सेवा विकत घेण्यापेक्षा अभ्यासपूर्ण विचाराअंती योग्य वेब होस्टिंग पर्याय निवडणे केव्हाही हितावह ठरेल.

आपल्या सोयीनुसार लाईव्ह चॅट, दूरध्वनी, ई-मेल, सपोर्ट तिकीट, नॉलेजबेस, ब्लॉग, फोरम्स, आणि सोशल मीडिया यांपैकी कोणते ग्राहक साहाय्य पर्याय उपलब्ध आहेत याची खातरजमा करून घ्या.

एखाद्या वेब होस्टिंग कंपनीचा कस्टमर सपोर्ट एक्सपीरियन्स कसा आहे ते जाणून घ्यायचा असेल तर लोकप्रिय रिव्ह्यू वेबसाईट्स, सोशल मीडिया ग्रुप्स, फोरम्स, आणि संबंधित वेब होस्टिंग कंपनीचे विद्यमान ग्राहक हे आपल्याला खूप मदत करू शकतात.

७. किंमत (Price)

कमी खर्चिक व कामचलाऊ वेब होस्टिंग सेवा निवडावी कि उत्तम दर्जाची प्रीमियम श्रेणीतील वेब होस्टिंग सेवा निवडावी हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असतो.

जर वेब होस्टिंग म्हणजे काय आणि वेब होस्टिंग कसे कार्य करते हे समजून घेतले असेल, तर या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे होईल.

वेब होस्टिंग आपल्या वेबसाईटवरील माहिती साठवून ठेवते आणि वापरकर्त्यांच्या विनंतीनुसार योग्य माहिती उपलब्ध करून देते.

ही प्रक्रिया व्यवस्थित चालू राहण्यासाठी होस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सॉफ्टवेअर लायसन्सेस, माहिती व डेटासेंटरची सुरक्षा, अग्निशमन यंत्रणा, वेगवान इंटरनेट जोडणी, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ, कायदेशीर बाबी, विपणन, कस्टमर सपोर्ट यांसारख्या गोष्टींवर प्रचंड खर्च होतो.

वरील कारणांस्तव अत्यंत कमी किंमतीमध्ये उत्तम दर्जाची वेब होस्टिंग सेवा पुरवणे थोडे अवघड असते.

त्यामुळे आपण जी वेब होस्टिंग सेवा वापरतो, त्याचे योग्य मूल्य आपण देतो का याचा विचार करावा.

काही कंपन्या सुरुवातीच्या काळात एकूण विक्री किंमतीवर १०% ते ९९% सूट देतात. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना आपली वेब होस्टिंग सेवा विकणे हा यामागचा मुख्य हेतू असतो.

मात्र १-३ वर्षे किंवा ऑफर कालावधी संपल्यानंतर आपल्याला वेब होस्टिंग मूळ किंमतीमध्येच विकत घ्यावी लागते.

याशिवाय अतिरिक्त सेवा व संसाधने विकून वेब होस्टिंग कंपन्या अधिक फायदा कमावतात. उदा. सुरक्षा प्रमाणपत्रे, ऑफ साईट बॅकअप्स, पेज बिल्डर्स, थर्ड-पार्टी सुरक्षा सेवा, डोमेन रेजिस्ट्रेशन्स, कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN), कस्टमायझेशन सपोर्ट, एसईओ व अन्य डिजिटल मार्केटिंग सेवा.

या सेवा व संसाधनांची आवश्यकता नसेल तर वेब होस्टिंगसाठी आपल्याला कमी खर्च येईल.

जर आपण वेब होस्टिंग विकत घेण्याच्या विचार करत असाल, तर सुरुवातीच्या काळात शेअर्ड होस्टिंग सेवा उत्तम काम पर्याय आहे, ज्यासाठी प्रतिमाह ₹५० ते ₹५०० किंमत मोजावी लागू शकते.

आपल्या वेबसाईटला खूप विझिटर्स भेट द्यायला लागले की मात्र आपण उत्तम दर्जाच्या क्लाऊड होस्टिंग किंवा व्हीपीएस होस्टिंग सेवेचा विचार करावा.

एकूणच वेबसाईटसाठी आवश्यक संसाधने, वेबसाईटचा प्रकार आणि वेबसाईटचे आपल्या ऑनलाईन व्यवसायातील महत्त्व यांनुसार योग्य पर्याय आपण निवडू शकता.

बहुतांश वेब होस्टिंग कंपन्या ३० दिवसांची मनी बॅक गॅरंटी देतात. त्यामुळे एखादी कंपनी खरोखरच उत्कृष्ट दर्जाची वेब होस्टिंग सेवा पुरवते की ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसते हे लक्षात येईल.

जर संबंधित कंपनी उत्कृष्ट दर्जाच्या सुरक्षेसह वेगवान वेब होस्टिंग सेवा आणि जलद ग्राहक साहाय्य प्रदान करत असेल तर ३० दिवसानंतरही ते सेवा वापरणे सुरु ठेवू शकता.

८. विश्वसनीयता (Uptime Reliability)

कितीही वेगवान आणि सुरक्षित असणारी वेब होस्टिंग सेवा जर दिवसातील काही काळ कार्यरत नसेल, तर व्यावसायिकदृष्ट्या खूप नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे विश्वसनीय वेब होस्टिंग सेवाच खरेदी करावी.

१००% अपटाईम प्रदान करणे प्रत्यक्षात संभव नाही.

अनपेक्षित तांत्रिक अडचणी, ठराविक मर्यादेपेक्षा जास्त लोकांनी एकाच वेळी वेबसाईटला भेट देणे, आणि नियोजित देखभाल उपक्रम यामुळे काही काळ वेबसाईट बंद राहू शकते. मात्र इतर वेळी आपली वेबसाईट योग्य रीतीने कार्य करणे अपेक्षित असते.

कोणत्याही वेब होस्टिंग कंपनीने कमीत कमी ९९.९% अपटाईम प्रदान करणे गरजेचे असते, अन्यथा इतर पर्यायांचा विचार केलेला बरा.

लोकप्रिय रिव्ह्यू पोर्ट्लस, सोशल मीडिया समुदाय, आणि स्वतंत्र रिव्ह्यू ब्लॉग्जवरील इतर वापरकर्त्यांचे अनुभव वाचून आपल्याला संबंधित वेब होस्टिंग कंपनीच्या अपटाईम विश्वसनीयतेचा अंदाज बांधता येईल.

सारांश

या लेखामध्ये आपण वेब होस्टिंग म्हणजे काय (What is Web Hosting in Marathi), वेब होस्टिंग कार्य कसे करते, वेब होस्टिंग निरनिराळे प्रकार कोणते, आणि योग्य वेब होस्टिंग सेवेची निवड कशी करावी याविषयी माहिती घेतली.
जर आपल्याला वेब होस्टिंग संदर्भात कोणतीही समस्या असेल तर आपण टिपण्णीद्वारे आम्हाला कळवू शकता.

डोमेन म्हणजे काय? डोमेनची खरेदी कशी करावी?

डोमेन म्हणजे काय, डोमेनची खरेदी कशी करावी, what is domain in marathi

या लेखामध्ये आपण डोमेन म्हणजे काय (what is domain in Marathi) याविषयी माहिती घेऊ.

डोमेन म्हणजे आपल्या संकेतस्थळाचे नाव किंवा अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आपला ऑनलाईन पत्ता. आपल्या ब्लॉग अथवा संकेतस्थळाला भेट देण्यासाठी डोमेनचा उपयोग होतो.

उदा. https://anudinikar.com

डोमेनची रचना

डोमेन हे प्रामुख्याने तीन घटकांमध्ये विभागलेले असते.

१. प्रोटोकॉल

प्रोटोकॉल म्हणजे वेब सर्वर आणि वापरकर्ता (क्लायंट) यांच्यामधील संभाषणाचा नियम आहे.

प्रामुख्याने एचटीटीपी आणि एचटीटीपीएस असे दोन प्रोटोकॉल वापरले जातात. त्यांपैकी

एचटीटीपीचा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे तर एचटीटीपीएसचा अर्थ हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर आहे.

एचटीटीपीएस वरील संभाषण अधिक सुरक्षित असते. त्यामुळे एचटीटीपीएस वापरण्याचा सल्ला दिला जातो.

२. डोमेन (मुख्य भाग)

डोमेन म्हणजे शब्द किंवा अक्षरमाला किंवा अक्षरे, संख्या आणि चिन्हे (-) यांचा संयोग असू शकतो.

  • domainname.com (शब्द)
  • abcde.com (अक्षरमाला)
  • domainname123 (अक्षर + अंक)
  • domain-name.com (अक्षर + चिन्ह)
  • domain-name123.com (अक्षर + अंक + चिन्ह)

डोमेनच्या मुख्य भागामध्ये आपण आपल्या आवडीचे शब्द किंवा अक्षरमाला वापरू शकता. फक्त असे डोमेन खरेदीसाठी उपलब्ध असावे लागते.

३. डोमेन एक्सटेंशन (टॉप लेव्हल डोमेन)

डोमेन एक्सटेंशन किंवा टॉप लेव्हल डोमेन म्हणजे डोमेनपुढे जोडला जाणारा भाग (प्रत्यय) असतो.

आपल्या गरजेनुसार व व्यवसायाच्या स्थळानुरूप कोणतेही डोमेन एक्सटेंशन निवडण्याचे स्वातंत्र वापरकर्त्याला असते.

.कॉम, .नेट, .ऑर्ग ही सर्वांत जास्त वापरली जाणारी डोमेन एक्सटेंशन्स आहेत.

डोमेन एक्सटेंशन्सचेही निरनिराळे प्रकार आहेत.

➤ जेनेरिक (सामान्य) डोमेन एक्सटेंशन्स

सर्वसाधारणपणे वापरली जाणारी डोमेन्स जेनेरिक या प्रकारात मोडतात. उदा., .कॉम (.com), .नेट (.net), .ऑर्ग (.org)

➤ सीसीटीएलडी अर्थात कंट्री कोड (देशासंबंधित) टॉप लेव्हल डोमेन एक्सटेंशन्स

प्रत्येक देशासंबंधित विशेष डोमेन एक्सटेंशन्स असतात. या डोमेन्सचे नियंत्रण ICANN (The Internet Corporation for Assigned Names and Numbers) ही संस्था आणि संबंधित टीएलडीचे कंट्री कोड व्यवस्थापक यांच्या समन्वयाने केले जाते. उदा., .इन (in), .एसजी (.sg), .सीएन (.cn)

➤ एनटीएलडी अर्थात न्यू डोमेन एक्सटेंशन्स

एनटीएलडी या प्रकारात नव्याने अंतर्भाव केलेल्या डोमेन एक्सटेंशन्सचा समावेश होतो. उदा., .ऑनलाईन (.online), .शॉप (.shop), .एक्सवायझेड (.xyz)

डोमेन नाव विकत घेण्यासाठी किती खर्च येतो?

सर्वसाधारणपणे एक सामान्य डोमेन नाव विकत घेण्यासाठी ₹७०० ते ₹१००० इतका खर्च येतो.

जर आपल्याला .कॉम, .नेट किंवा .ऑर्ग वगळता अन्य डोमेन नेम एक्सटेंशन असणारे डोमेन विकत घ्यायचे असेल तर त्यानुसार कमी-अधिक दर आकारला जाऊ शकतो.

डोमेन नाव विकत घेण्यापूर्वी आपण ही रक्कम किती आहे हे पाहू शकता.

खूप प्रसिद्ध असणारी व सामान्यतः कमी वर्णसंख्या असणारी डोमेन नावे प्रीमियम श्रेणीमध्ये दर्शवली जातात व त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आकारली जाते. ही रक्कम ₹५०,००० ते लाखो रुपयांच्या घरातदेखील असू शकते.

डोमेनची उपलब्धता तपासणे

डोमेन नाव खरेदी करायचे असेल तर आपल्याला जे नाव हवे आहे त्या नावाची उपलब्धता तपासून पाहावी.

जर डोमेन नाव उपलब्ध नसेल किंवा प्रीमियम श्रेणीमध्ये असेल तर आपण इतर नावांचा किंवा डोमेन एक्सटेंशन्सचादेखील विचार करू शकता.

यासाठी डोमेन नेम जनरेटर्स खूप उपयोगी पडतात.

प्रसिद्ध डोमेन नेम जनरेटर्सची यादी खाली देत आहे.

याशिवाय एक्सपायर्ड डोमेन नवे शोधण्यासाठी आपण एक्सपायर्डडोमेन्स.नेट (https://www.expireddomains.net) या संकेतस्थळाचा वापर करू शकता.

डोमेनची खरेदी कशी करावी?

जर आपल्याला पाहिजे असणारे डोमेन नाव उपलब्ध असेल तर ते डोमेन नाव आपण योग्य डोमेन रजिस्ट्रार कडून ठराविक कालावधीसाठी विकत घेऊ शकता.

नेमचीप व नेमसिलो हे माझे आवडीचे डोमेन नेम रजिस्ट्रार्स आहेत.

यांपैकी नेमचीप या संकेतस्थळावर डोमेन नाव कसे रजिस्टर करायचे याविषयी माहिती घेऊ.

प्रथम या लिंकवर क्लिक करून नेमचीप च्या डोमेन रजिस्ट्रेशन पेज ला भेट द्या.

Namecheap Domain Registration Page
नेमचीप डोमेन रजिस्ट्रेशन पेज

मोकळ्या शोध रकान्या (सर्च बॉक्स) मध्ये आपले डोमेन नाव लिहा. डोमेन नाव शक्यतो इंग्रजी भाषेतच असावे.

उजव्या बाजूला असणाऱ्या शोधचिन्हावर (मॅग्निफायिंग ग्लास) वर क्लिक करा.

पुढील पानावर आपले डोमेन नाव व त्याची किंमत तपासून पहा. जर सर्व व्यवस्थित असेल तर ॲड टू कार्ट (Add to cart) या पर्यायावर क्लिक करा.

Namecheap Domains Add to Cart
नेमचीप डोमेन्स – ॲड टू कार्ट

डोमेन नोंदणी शुल्क व आयकॅन शुल्क (ICANN fee) यांची बेरीज होऊन आपल्याला मोजावी लागणारी एकूण किंमत उजव्या कोपऱ्यात दर्शवली जाईल.

यानंतर View Item किंवा Checkout या पर्यायांवर क्लिक करून आपण शॉपिंग कार्ट पेज वर जाऊ शकता.

शॉपिंग कार्ट पेजवर उपलब्ध असलेल्या ड्रॉपडाऊनमधून आपण १० वर्षे कालावधीपर्यंत डोमेन नाव विकत घेण्याचा पर्याय निवडू शकता.

Namecheap Shopping Cart Page
नेमचीप डोमेन्स – शॉपिंग कार्ट

याशिवाय नेमचीप ठराविक डोमेन नावांसोबत मोफत गोपनीयता सुरक्षा (WhoisGuard Privacy Protection) प्रदान करते. जोपर्यंत आपण नेमचीपसोबत डोमेन रजिस्टर कराल तोपर्यंत ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल.

कन्फर्म ऑर्डर (Confirm Order) या बटणावर क्लिक करून साइन अप पेजवर पोहोचा. येथे सुरक्षित युजरनेम, पासवर्ड, आपले नाव, व ई-मेल ॲड्रेस वापरून नवीन अकाउंट तयार करा.

Namecheap Create An Account
नेमचीप डोमेन्स – नवीन अकाउंट तयार करा

शेवटी आपला पत्ता व बिलिंग इंफर्मेशन भरून डोमेन नाव विकत घ्या. आंतरराष्ट्रीय कार्ड्स, पेपाल किंवा अकाउंट फंड्सद्वारे आपण देय रक्कमेचा भरणा करू शकता.

अभिनंदन! आपण आपले डोमेन नाव यशस्वीरीत्या रजिस्टर केले आहे.

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा?

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा, ब्लॉगसाठी विषय कसा निवडावा, ब्लॉगचा विषय, ब्लॉग टॉपिक कसा निवडावा

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा (How to Find Profitable Blogging Niche in Marathi) हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे.

विचारपूर्वक निवडलेला ब्लॉगचा विषय आणि उत्तम दर्जाचा मजकूर या गोष्टी आपल्या ब्लॉगच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

सर्वसाधारणपणे ब्लॉगर्स मनात येईल त्या कोणत्याही विषयावर ब्लॉग लिहितात, परंतु यामुळे भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते.

एका विशिष्ट विषयासंबंधित ब्लॉग लिहून आपले ज्ञान किंवा कौशल्य सिद्ध करणे आणि अर्थार्जन करणे हे निरनिराळया विषयासंबंधित ब्लॉग लिहिण्यापेक्षा तुलनेने सोपे असते.

तुम्हाला माहित आहे का?

आजमितीला जगभरात १.८ अब्जपेक्षाही जास्त संकेतस्थळे अस्तित्वात आहेत.

त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असा कारभार करण्यापेक्षा विशिष्ट विषयाचा तज्ञ म्हणून ओळख निर्माण करणे आपल्याला आवडेल आणि आपल्या ब्लॉगच्या वाढीकडेसुद्धा जास्त लक्ष देता येईल.

म्हणजेच आपले ज्ञान किंवा कौशल्य सिद्ध करून अर्थाजन करणे सहजरित्या शक्य होईल.

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा यावर चर्चा करण्यापूर्वी आपण ब्लॉगचा विषय (निश/टॉपिक) म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊ.

ब्लॉगचा विषय (ब्लॉगिंग निश/टॉपिक) म्हणजे काय?

ब्लॉगचा विषय (ब्लॉगिंग निश/टॉपिक) हा आपण निवडलेल्या बाजाराचा एक भाग असतो.

समजा, आपण पर्यटनासंबंधित विषयावर ब्लॉगिंग करण्याचे ठरवले आहे. या परिस्थितीत आपल्याला निरनिराळे विषय निवडण्याचे स्वातंत्र आहे. उदा. पर्यटन व्यवस्थापन, प्रेक्षणीय पर्यटनस्थळे, प्रवासवर्णन, हॉटेल्स, शेती पर्यटन (ॲग्रो टुरिझम), जंगलसफर, इत्यादी.

याशिवाय प्रत्येक विषयाचा उपविषयसुद्धा ब्लॉग लिहिण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. परंतु त्याविषयासंबंधित लेखांना वाचकांकडून मागणी असावी आणि आपल्याला आर्थिक मोबदला मिळेल याची खात्री असावी. उदा. महाराष्ट्रातील हॉटेल्स

ब्लॉगच्या उपविषयाचा अजून लहान भाग निवडून त्यावर आपण सूक्ष्मविषय ब्लॉग (मायक्रो-निश ब्लॉग) तयार करू शकता. उदा. मुंबईतील हॉटेल्स

वर नमूद केलेल्या माहितीचा आपण बाजार ते सूक्ष्मविषय असा पदानुक्रम तयार करू शकतो.

बाजार (इंडस्ट्री/मार्केट): पर्यटन

↳ विषय (निश/टॉपिक): हॉटेल्स

↳ उपविषय (सबनिश): महाराष्ट्रातील हॉटेल्स

↳ सूक्ष्मविषय (मायक्रो-निश): मुंबईतील हॉटेल्स

आता आपल्याला ब्लॉगचा विषय, उपविषय, आणि सूक्ष्मविषय म्हणजे काय याबद्दल माहिती मिळाली असेल याची मला खात्री आहे.

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा?

ब्लॉगसाठी विषय निवडणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. परंतु जर आपल्याला ब्लॉगद्वारे पैसे कमवायचे असतील तर सर्व विषय (निश) फायदेशीर असणार नाहीत.

आपले ज्ञान, संबंधित विषयावरील पकड, बाजार स्थिती, लोकांच्या समस्या व त्यावरील संभाव्य उपाय, आर्थिक उलाढाल, आपण निवडलेल्या विषयावरील ब्लॉगचे आयुष्य आणि एकंदरीत नफा इत्यादींचे गणित करूनच ब्लॉगचा विषय निवडणे जास्त संयुक्तिक ठरेल.

१. आपल्या आवडीचे विषय कोणते यावर विचारमंथन करणे

सर्वांत प्रथम आपल्याला आवडणाऱ्या विषयांची यादी तयार करा. नमुन्यादाखल मी येथे एक यादी बनवली आहे.

यादी क्रमांक १:

  • चित्रपट (★)
  • भ्रमणध्वनी
  • संगणक
  • स्वयंपाक
  • योगासने
  • ब्लॉगिंग (★)
  • पुस्तके
  • संगणकीय खेळ (★)
  • संरक्षण
  • सैन्य उपकरणे (★)
  • राजकारण
  • आधुनिक शेती (★)

यांपैकी मला सर्वांत जास्त आवडणाऱ्या पाच विषयांसमोर मी (★) चिन्ह केले आहे.

आता या विषयांपैकी एक किंवा अनेक विषयांवर मी ब्लॉग लिहिण्याविषयी विचार करू शकेन.

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय निवडणे ही ब्लॉगिंगमधील महत्त्वाची पायरी असल्यामुळे यासाठी पुरेसा वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे.

अजूनही आपल्याला विषयांची यादी तयार करण्यास अडचण येत असेल तर खाली नमूद केलेल्या गोष्टींचा अवलंब करा.

१. आपण कोणती पुस्तकं, कादंबऱ्या, ईबुक्स वाचता हे लक्षात घ्या. आपल्या आवडीचे दूरदर्शनवरील कार्यक्रम, वृत्तपत्रातील बातम्यांचे मथळे, डिजिटल व्यासपीठांवरील कार्यक्रम आणि मालिका यांचा संदर्भ घ्या.

२. आपण कोणत्या क्षेत्रात काम करत होता, आता कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत, आपले छंद, अनुभव यांनुसार आपल्या आवडीचा विषय कोणता असेल याचा अंदाज बंधने सोपे होईल.

३. आपण कोणत्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत यावर ब्लॉग लिहिता येऊ शकेल. उदा. वजन कमी करणे, नवीन भाषा शिकणे, नवीन रुचकर पाककृती तयार करणे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे, इत्यादी.

४. आपल्या आवडीचे रोजच्या व्यवहारातील विषय ज्यामध्ये वेळेनुसार फार बदल होत नाही, असे विषय ब्लॉगसाठी निवडणे फायदेशीर असतेच आणि आपण कमी श्रमात जास्त कालावधीपर्यंत अर्थार्जन करू शकता. उदा. गुंतवणूक सल्ला, विमा, बालसंगोपन (पॅरेंटिंग), वैयक्तिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, स्वयंपाक, नातेसंबंध (रिलेशनशिप), इत्यादी.

५. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आपली संबंधित विषयावर ब्लॉग लिहिण्याची आवड एक-दोन वर्षांनंतरसुद्धा कायम राहील याची आपणां स्वतःला खात्री असावी.

२. आपलं कोणत्या विषयांत प्राविण्य आहे हे ओळखणे

आपण ज्या विषयावर ब्लॉग लिहिता, त्या विषयावर आपले प्रभुत्व असणे खूप महत्त्वाचे असते.

कोणतीही चुकीची किंवा अर्धवट माहिती आपल्या वाचकांना देणे हे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे.

त्यामुळे आर्थिक गुंतवणूक, कायदेशीर बाबी, आरोग्य, औषधे, इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर ब्लॉग लिहिण्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि पुरेसा अनुभव असल्याखेरीज कोणतीही माहिती प्रकाशित करणे किंवा खात्रीशीर सल्ला देणे वाचकांना त्रासदायक ठरू शकते, याचे भान सदैव असले पाहिजे.

अर्थात आपल्या आवडीच्या विषयांत सर्वजण तज्ञ असतील असे नाही. अशावेळी नवनवीन गोष्टी शिकण्याची आपली तयारी असावी.

जेणेकरून आपण संबंधित विषयाचा अभ्यास करून आवश्यक ज्ञान संपादन करता येईल व ते इतरांसोबत सामायिक करता येईल.

पारंपरिक शैक्षणिक संस्था, तज्ञ व्यक्तींची पुस्तके व लेख, ब्लॉग्स, नियतकालिके, डिजिटल व्यासपीठांवरील खात्रीशीर माहिती प्रकशित करणाऱ्या व्यक्ती व संस्था, सरकारी माहिती प्रसारण वाहिन्या व संस्था यांच्याद्वारे आपणांस योग्य माहिती मिळू शकते.

एकूणच काय पुरेसे ज्ञान व अनुभव असल्याशिवाय दुसऱ्याला शिकवायला जाऊ नये हा मंत्र ब्लॉग लिहीतानाही लक्षात ठेवा.

३. ब्लॉगचा विषय अर्थार्जनासाठी अनुकूल असावा

ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा हा प्रश्न आपल्याला सतावत असेल तर आपण नक्कीच अर्थाजन करण्यासाठी अनुकूल असणारा ब्लॉगिंग विषय निवडणे अत्यंत महत्वाचे असते.

अशा परिस्थितीमध्ये आपल्या आवडीपेक्षा संभाव्य नफा किती होईल याचा विचार करावा लागतो. अर्थात त्या विषयावर प्रभुत्व असावे ही आत मात्र कायम राहील.

तसा हा मुद्दा खूप किचकट आहे, परंतु येथे मी आपल्याला अत्यंत सोपी युक्ती सांगणार आहे, जेणेकरून ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा या प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः शोधू शकाल.

१. आपण ब्लॉगसाठी जो विषय निवडत आहात, त्या संबंधित लोकांच्या समस्या आहेत का? असल्यास कोणत्या आहेत? याची योग्य माहिती मिळवणे.

शिवाय त्या समस्येवर उपाययोजना कोणती आहे? ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे की फक्त श्रीमंतांना परवडणारी आहे? याचा अभ्यास करणेसुद्धा आपल्या फायद्याचे असते.

उदा. केसगळती ही समस्या महिला व पुरुष दोघांनाही भेडसावते आणि यामुळे खूप लोक चिंतीत असतात. यावर औषधे, आहारपूरक मात्रा (सप्लिमेंट्स) किंवा केशरोपण सुविधा उपलब्ध आहेत.

प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक ऐपतीप्रमाणे यांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो.

असा विषय निवडल्यास आपल्याला जाहिराती, संलग्न विपणन (Affiliate Marketing), प्रायोजित लेख (Sponsored Posts), स्वतःची वैद्यकीय संस्था असेल तर औषधे किंवा केशरोपण सुविधा पुरवणे, ईबुक्स व नियतकालिके विकणे, केसगळती रोखण्यासाठी शिकवणी कार्यक्रम (Courses) बनवून त्याचे शुल्क आकारणे, इत्यादी मार्गांद्वारे कमाई होऊ शकते.

लक्षात घ्या, या विषयावर ब्लॉग प्रकाशित करून फक्त गुगल जाहिरात व्यासपीठाचा वापर करणाऱ्या ब्लॉगर्सना तुलनेने कमी पैसे मिळतील.

परंतु संलग्न विपणन करणाऱ्या ब्लॉगर्ससाठी किंवा केशरोपण करणाऱ्या डॉक्टर्ससाठी मात्र हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असू शकेल.

त्यामुळे ब्लॉगिंग विषयाला अनुकूल अर्थार्जनाचा मार्ग निवडणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते.

२. आपण जो विषय ब्लॉगिंग साठी निवडणार आहेत त्यामध्ये जास्त वाचक असावे.

शिवाय जर त्या विषयासंबंधित उद्योग-व्यवसाय असतील,खूप आर्थिक उलाढाल होत असेल आणि लोक पैसे खर्च करत असतील तर असा विषय ब्लॉगसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

वाचक वर्ग/कीवर्ड सर्च व्हॉल्युम/वेब ट्रॅफिक जास्त असणारे ब्लॉग जाहिरातींद्वारे चांगलं अर्थार्जन करू शकतात. उदा, मनोरंजन, क्रीडाविश्व इत्यादी.

व्यावसायिक विषयांवरील ब्लॉग्स संलग्न विपणन व वस्तूंच्या विक्रीसाठी उत्तम समजले जातात. उदा. उपकरणे, संगणक, सॉफ्टवेअर इत्यादी.

३. आपण निवडलेला विषय सदाबहार असावा, जेणेकरून कमी लेख लिहून जास्त कालावधीपर्यंत कमाई करता येते.

याउलट सध्या चर्चेत असणाऱ्या विषयांवर (ट्रेंडिंग टॉपिकवर) ब्लॉग लिहिल्यास कमी कालावधीत जास्त वेब ट्रॅफिक आणि कमाई करता येते, परंतु अशा ब्लॉग्सचे आयुष्य कमी असते.

४. आपण निवडलेल्या विषयासंबंधित जाहिराती आहे का हे पहा.

जर एखादा विषय फायदेशीर असेल तर जास्तीत जास्त व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्था या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. यामुळे स्पर्धा वाढते आणि परिणामी जाहिराती करणे भाग पडते.

जर आपल्या विषयासंबंधित जाहिराती आपल्यास दिसत असतील, संलग्न विपणन कार्यक्रम असतील किंवा खूप स्पर्धा असेल तर नक्कीच तो विषय नफा मिळवून देणारा असतो.

अर्थात काही प्रादेशिक भाषांमध्ये डिजिटल मार्केटिंगचा फारसा शिरकाव न झाल्यामुळे आपल्याला तुलनेने कमी जाहिराती व स्पर्धा पाहायला मिळू शकते.

परंतु या संधीचा योग्य फायदा घेतल्यास भविष्यात आपल्या ब्लॉगची खूप भरभराट होऊ शकते.

मला खात्री आहे की हा लेख वाचून ब्लॉगसाठी फायदेशीर विषय कसा निवडावा याची योग्य माहिती मिळाली असेल. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सामायिक करायला विसरू नका.

संबंधित लेख

अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय?

What is Blog Meaning in Marathi, अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय

या लेखामध्ये आपण अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय (What is Blog Meaning in Marathi) आणि ब्लॉगचे प्रकार कोणते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

ब्लॉग म्हणजे काय? (What is Blog Meaning in Marathi)

ब्लॉग या शब्दाचा उगम वेबलॉग या इंग्रजी शब्दापासून झाला आहे. वेब म्हणजे संगणकीय आंतरजाल आणि लॉग म्हणजे एखाद्या माहितीची पद्धतशीर केलेली मांडणी. जेव्हा आपण एखादा विषय, वस्तू, सेवा, अनुभव किंवा प्रसंगाविषयी माहिती आंतरजालावर (इंटरनेटवर) सामायिक करतो, त्या माहितीस ब्लॉग असे संबोधले जाते.  

वेबलॉग या शब्दाचा वापर प्रथम जॉन बार्जर या व्यक्तीने १७ डिसेंबर १९९७ रोजी केला होता. त्यानंतर सुमारे दीड वर्षांनी म्हणजेच मे १९९९ मध्ये पीटर मरहोल्झ यांनी वेबलॉग या शब्दाची फोड वी + ब्लॉग (We + Blog) अशी केली. तेव्हापासून ब्लॉग हा शब्द प्रचलित झाला आहे.

अत्यंत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्लॉग म्हणजे एखाद्या संकेतस्थळाचा नियमितपणे अद्ययावत केला जाणारा भाग, ज्यामध्ये वाचकांसाठी उपयुक्त माहिती, बातम्या, तज्ञ व्यक्तींची मते, चित्रे, ध्वनी, आणि ध्वनीचित्रफितींचा समावेश असतो. 

ब्लॉग मध्ये असणाऱ्या पोस्ट्स वेळेच्या उलट क्रमाने (रिव्हर्स क्रोनोलॉजिकल पद्धतीने) मांडलेल्या असतात. जेणेकरून आपण नवीन लेख सर्वांत प्रथम वाचू शकता. 

अनुदिनीचे (ब्लॉगचे) प्रकार कोणते? 

याअगोदरील भागात आपण अनुदिनी अर्थात ब्लॉग म्हणजे काय याविषयी माहिती घेतली. आता आपण ब्लॉगचे विविध प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पाहू. 

१. छंद अनुदिनी (हॉबी ब्लॉग) 

ज्याप्रमाणे आपण दैनंदिनी लिहितो, त्याप्रमाणेच आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, कविता, लेख, आपले अनुभव, प्रवासवर्णने आपण आपल्या छंद अनुदिनीद्वारे आंतरजालावर सामायिक करू शकता. 

२. व्यवसाय अनुदिनी (बिझनेस ब्लॉग) 

एखादी व्यक्ती किंवा संस्था व्यावसायिक कारणासाठी वाचकांसाठी उपयुक्त माहिती आंतरजालावर सामायिक करते, त्या माहितीस व्यवसाय अनुदिनी असे संबोधले जाते. शक्यतो बिझनेस ब्लॉग हा संबधित व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्थेच्या अधिपत्याखाली असतो आणि यामध्ये वस्तू व सेवांविषयी विस्तृत माहिती प्रकाशित केली जाते. 

जास्तीत जास्त ग्राहकवर्ग गोळा करणे आणि त्यांना आपल्या वस्तू, सेवा, व व्यवसाय इत्यादींविषयी अद्ययावत माहिती पुरवणे हा व्यवसाय अनुदिनीचा मुख्य उद्देश असतो. 

तुम्हाला माहित आहे का?

नियमित ब्लॉग प्रकाशित करणाऱ्या कंपन्या, ब्लॉग प्रकाशित न करणाऱ्या कंपन्यांपेक्षा प्रतिमाह सरासरी ५५% अधिक रहदारी (वेब ट्रॅफिक) आणि ६७% जास्त संभाव्य ग्राहक (लीड्स) आकर्षित करतात. 

३. विषय अनुदिनी (निश ब्लॉग)

जेव्हा आपण फक्त एका विशिष्ट विषयासंदर्भात माहिती आंतरजालावर सामायिक करतो, तेव्हा त्याला विषय अनुदिनी अर्थात निश ब्लॉग असे संबोधले जाते. 

उदा. तंत्रज्ञान अनुदिनी (टेक्नॉलॉजी ब्लॉग), पाककला अनुदिनी, क्रीडा अनुदिनी इत्यादी. 

एखादी व्यक्ती आणखी खोलवर जाऊन संबंधित विषयाचा एक भाग ब्लॉगसाठी निवडू शकते. अशा लहान उपक्रमांना मायक्रो-निश ब्लॉग्स असे म्हटले जाते. शक्यतो मायक्रो-निश ब्लॉग्ससाठी संभाव्य रहदारी (वेब ट्रॅफिक), कमाई, स्पर्धा इत्यादी गोष्टी पाहून निर्णय घ्यावा लागतो.   

४. संलग्न विपणन अनुदिनी (अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग)

जो ब्लॉग इतर व्यक्ती व व्यावसायिक संस्थांच्या वस्तू व सेवांचे विपणन करण्याच्या उद्देशाने बनवलेला असतो, त्यास अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग असे म्हटले जाते.

यामध्ये ब्लॉगर्स ग्राहकांना उपयुक्त माहिती आपल्या ब्लॉग किंवा संकेतस्थळावर प्रकाशित करतात. जेव्हा एखादी व्यक्ती ती माहिती वाचून, प्रकाशकाने शिफारस केलेली वस्तू व सेवा त्याच्या अफिलिएट लिंकमार्फत विकत घेते, तेव्हा संबंधित व्यापारी किंवा ईकॉमर्स कंपनी काही रक्कम मोबदला (अफिलिएट कमिशन) म्हणून प्रकाशकास देते.

अशाप्रकारे सर्वांना फायदा होत असल्यामुळे संलग्न विपणन अनुदिनी अर्थात अफिलिएट मार्केटिंग ब्लॉग हा ब्लॉगिंगचा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. 

शिवाय वस्तू व सेवांच्या यादीचे व्यवस्थापन (इन्व्हेंटरी मॅनेजमेंट), प्रत्यक्ष विक्री, वाहतूक, ग्राहक सहकार्य, इत्यादी गोष्टी कराव्या लागत नसल्यामुळे बरेच प्रकाशक संलग्न विपणन अनुदिनी हा पर्याय निवडतात. 

५. सूक्ष्म अनुदिनी (मायक्रो ब्लॉग) 

सूक्ष्म अनुदिनीचा वापर अत्यंत कमी शब्दांत माहिती आंतरजालावर प्रकाशित करण्यासाठी केला जातो. उदा. ट्विटर, फेसबुक

६. वापरकर्त्यांची अनुदिनी (यूजर जनरेटेड ब्लॉग)

या प्रकारामध्ये ब्लॉगला भेट देणारे वापरकर्ते आपले अनुभव, तसेच एखाद्या विषयावरील माहिती, चित्रे, ध्वनी, व ध्वनिचित्रफिती ब्लॉगवर सामायिक करतात. येथे प्रकाशकाला साहित्य निर्मितीपेक्षा ब्लॉगवर कोणते साहित्य प्रकाशित व्हावे याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. सुरुवातीला व्यक्तींद्वारे माहितीचे पुनरावलोकन व नियंत्रण केले जाते. मात्र कामाचा व्याप वाढला की यूजर जनरेटेड ब्लॉग मॉडरेशनसाठी तंत्रज्ञानाचे साहाय्य घ्यावे लागते.  

क्वोरा हे वापरकर्त्यांची अनुदिनीचे उत्तम उदाहरण आहे. 

याशिवाय ब्लॉगवर किती व्यक्तींचे प्रत्यक्ष नियंत्रण आहे यानुसार ब्लॉगचे वैयक्तिक ब्लॉग, सहयोगी अथवा गट ब्लॉग, आणि संस्थात्मक ब्लॉग असे प्रकार पडतात. 

मला खात्री आहे की हा लेख वाचून आपल्याला ब्लॉग म्हणजे काय (What is blog meaning in Marathi) याबाबत पुरेशी माहिती मिळाली असेल. जर हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी व सहकाऱ्यांसोबत शेअर करायला विसरून नका.

संबंधित लेख

Don`t copy text!